Mark Zuckerberg ने तयार केला त्याच्या पत्नीचा 7 फूट उंचीचा पुतळा (फोटो सौजन्य - Mark Zuckerberg Instagram)
मेटा सीईओ Mark Zuckerberg नेहमीप्रमाणे आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे त्याने त्याच्या पत्निचा 7 फूट उंचीचा पुतळा बनवला आहे. Mark Zuckerberg ने त्याची पत्नी प्रिसिला चॅनला हा पुतळा भेट दिला आहे. त्यांच्या घराच्या अंगणामध्ये हा पुतळा ठेवण्यात आला आहे. याबाबत Zuckerberg ने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंट इंंस्टाग्रामवर माहिती दिली आहे. त्याने इंस्टाग्रामवर त्याच्या पत्निचा पुतळ्यासोबतचा फोटो आणि एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रिसिला चॅनचा वाढदिवस फेब्रुवारी महिन्यात असतो. तसेच Mark Zuckerberg आणि प्रिसिला चॅन यांच्या लग्नाचा वाढदिवस देखील मे महिन्यात असतो. त्यामुळे ही भेट कोणत्याही प्रसंगावर आधारित आहे, असं वाटत नाही.
हेदेखील वाचा – Mark Zuckerberg च्या Meta ला मोठा झटका; भरावा लागणार 1.4 अब्ज डॉलरचा दंड
Mark Zuckerberg पोस्ट शेअर करत त्याच्या इंस्टाग्रामवर म्हटलं आहे की, ‘पत्नीचे पुतळे बनवण्याची रोमन परंपरा परत आणत आहे. धन्यवाद डॅनियल अर्शम.’ डॅनियल अर्शम हा अमेरिकन कलाकार आहे ज्याने हा पुतळा तयार केला आहे. हा पुतळा निळ्या रंगाचा असून त्याच्याभोवती चांदीचे आवरण आहे. Mark Zuckerberg ने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी मजेशीर प्रितिक्रिया दिल्या आहेत.
मॅसॅच्युसेट्सच्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट इसाबेल मोर्ले यांनी ह्या भेटवस्तूबाबत धोक्याची घंटा दिली आहे. इसाबेल मोर्ले हे कपल्स थेरपीमध्ये विशेषज्ञ आहेत. मोर्ले यांनी सांगितलं आहे की, अशी भव्य भेट देखील एक चेतावणी चिन्ह असू शकते. महागड्या भेटवस्तूंना नेहमीच समान महत्त्व नसते, विशेषत: जे अत्यंत श्रीमंत आहेत त्यांच्यासाठी. काही लोक या भेटवस्तूंचा वापर वाईट वागणूक किंवा अपमानास्पद वागणूक देण्यासाठी करतात. भेटवस्तू देण्यामागे एक विशेष उद्देश असतो, मग तो माणूस कितीही श्रीमंत असला तरी.
हेदेखील वाचा – नायजेरियाने Meta ला ठोठावला 22 कोटी रुपयांचा दंड; नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई
या भेटवस्तूनंतर Mark Zuckerberg च्या कल्पनेने सोशल मीडिया वापरकर्तेही प्रभावित झाले आहेत. एका यूजरने गंमतीत म्हटले की, ‘या पोस्टनंतर नवरे सगळीकडे हादरत आहेत.’ दुसरी म्हणाली, ‘मुलींनो, स्वतःला असा माणूस शोधा जो तुमचे पुतळे बनवेल.’ एका यूजरने लिहिले – ‘हे खूप छान आहे. तुमची पत्नी देवीसारखी दिसत आहे.’ एका युजरने म्हटलं आहे की, हे खरोखरच त्याचे तिच्याबद्दलचे प्रेम आणि कृतज्ञता दाखवण्यासाठी होते की तिला इतरांसमोर चांगले दिसण्यासाठी आणि तिच्याकडून विशेष प्रेमळ प्रतिसाद मिळावा यासाठी होतं.
मार्क झुकरबर्ग आणि प्रिसिला चॅन यांच्या लग्नाला 12 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. ते मॅक्सिमा, ऑगस्ट आणि ऑरेलिया या तीन मुलींचे पालक आहेत. 2003 मध्ये जेव्हा ते हार्वर्ड येथे एका कॉलेज पार्टीमध्ये भेटले तेव्हा त्यांच्या नात्याची सुरुवात झाली.