फोटो सौजन्य - pinterest
नायजेरिया सरकारने सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय सोशल मीडिया कंपनी Meta ला 22 करोड अमेरिकन डॉलरचा दंड ठोठावला आहे. वारंवार नियमांचे उल्लंघण केल्याप्रकरणी मेटावर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत Meta ने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. नायजेरियन सरकारने सांगितले की त्यांच्या तपासणीत कंपनीने फेसबुक आणि व्हॉट्सॲपशी संबंधित देशातील डेटा संरक्षण आणि ग्राहक हक्क कायद्यांचे अनेक वेळा उल्लंघन केले असल्याचे आढळले आहे. याबबात Meta ला अनेकवेळा चेतावणी देऊनही, त्यांच्या कामात कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे आता अखेर नायजेरिया सरकारने Meta ला 22 करोड अमेरिकन डॉलरचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
हेदेखील वाचा- फ्लिपकार्टचा बहुप्रतिक्षित GOAT सेल सुरु! भरगोस डिस्काऊंट आणि ऑफर्ससह आताच खरेदी करा
याप्रकरणी सरकारने एक निवदेन जारी केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, कंपनीने फेसबुक आणि व्हॉट्सॲपशी संबंधित देशाच्या डेटा संरक्षण आणि ग्राहक हक्क कायद्यांचे अनेक वेळा उल्लंघन केल्याचे आढळल्यानंतर हा दंड ठोठावण्यात आला आहे. नायजेरियाच्या फेडरल कॉम्पिटिशन अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन कमिशन (FCPC) ने आपल्या अहवालात मेटाने पश्चिम आफ्रिकन देशात डेटा कायद्यांचे 5 मार्गाने उल्लंघन केल्याचे सांगितले आहे.
हेदेखील वाचा- Honor 200 5G vs Poco F6 5G: कोणता स्मार्ट फोन तुम्हाला देईल सर्वोत्तम फिचर्स
या पद्धतींमध्ये नायजेरियन लोकांचा डेटा अधिकृततेशिवाय शेअर करणे, वापरकर्त्यांना त्यांच्या डेटाचा वापर निर्धारित करण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवणे आणि भेदभावपूर्ण पद्धती तसेच बाजारातील वर्चस्वाचा गैरवापर यांचा समावेश आहे. रेकॉर्डवरील महत्त्वपूर्ण पुराव्यांबद्दल समाधानी झाल्यानंतर आणि मेटा कंपनीला त्यांचे मत स्पष्ट करण्यासाठी प्रत्येक संधी प्रदान केल्यानंतर, आयोगाने आता अंतिम आदेश जारी केला आहे आणि मेटाला दंड ठोठावण्यात आला आहे.
नायजेरियन सरकारच्या म्हणण्यानुसार, मेटा कंपनी नागरिकांच्या गोपनीयतेच्या आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करत होती. उल्लंघनाची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मेटाने अद्याप याप्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली नाही. FCCPC ने Meta ला 22 करोड अमेरिकन डॉलरचा दंड ठोठावला आहे. FCCPC ने कंपनीला स्थानिक कायद्यांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.