Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

McDonald’s India आणि CSIR-CFTRI ने मल्‍टी-मिलेट बन लाँच करण्‍यासाठी केली हातमिळवणी, मेन्यूमध्‍ये करणार पौष्टिकतेची भर

मॅकडोनाल्‍ड्स इंडिया (वेस्‍ट अँड साऊथ) या वेस्‍टलाइफ फूडवर्ल्‍डद्वारे संचालित कंपनीने उल्‍लेखनीय मल्‍टी-मिलेट बन लाँच करण्‍यासाठी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत प्रतिष्ठित खाद्य तंत्रज्ञान संशोधन संस्‍था सीएसआयआर-सेंट्रल फूड टेक्‍नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (CFTRI) सोबत हातमिळवणी केली आहे. याद्वारे आता ते आपल्या मेन्यूमध्ये पौष्टिकतेची भर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2024 | 05:57 PM
McDonald's India आणि CSIR-CFTRI ने मल्‍टी-मिलेट बन लाँच करण्‍यासाठी केली हातमिळवणी, मेनूमध्‍ये करणार पौष्टिकतेची भर

McDonald's India आणि CSIR-CFTRI ने मल्‍टी-मिलेट बन लाँच करण्‍यासाठी केली हातमिळवणी, मेनूमध्‍ये करणार पौष्टिकतेची भर

Follow Us
Close
Follow Us:

मॅकडोनाल्‍ड्स इंडिया (वेस्‍ट अँड साऊथ) या वेस्‍टलाइफ फूडवर्ल्‍डद्वारे संचालित कंपनीने उल्‍लेखनीय मल्‍टी-मिलेट बन लाँच करण्‍यासाठी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत प्रतिष्ठित खाद्य तंत्रज्ञान संशोधन संस्‍था सीएसआयआर-सेंट्रल फूड टेक्‍नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (सीएफटीआरआय) सोबत सहयोग केला आहे. हा विशेष व पहिलाच सहयोग फूड इनोव्‍हेशनमधील नवीन युगाला सादर करतो, जेथे सीएसआयआर-सीएफटीआरआयचे कौशल्‍य आणि मॅकडोनाल्‍ड्सची पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करण्‍याप्रती कटिबद्धता एकत्र आले आहेत. राष्‍ट्रीय पोषण सप्‍ताहानिमित्त हा महत्त्वपूर्ण पुढाकार मॅकडोनाल्‍ड्सच्‍या पोषण प्रवासाशी संलग्‍न आहे, ज्‍यामुळे ब्रँडची आपल्‍या ऑफरिंग्‍जची पौष्टिकता वाढवण्‍याप्रती कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.

सीएसआयआर-सीएफटीआरआयचे आघाडीचे फूड सायण्टिस्‍ट्स आणि मॅकडोनाल्‍ड्स इंडिया (W&S) यांच्‍याद्वारे सह-निर्मिती करण्‍यात आलेल्‍या नवीन मल्‍टी-मिलेट बनमध्‍ये पाच पौष्टिक मिलेट्स बाजरी, रागी, ज्‍वारी, प्रोसो व कोडो, तसेच प्रमुख व किरकोळ मिलेट्सचे पोषण समाविष्‍ट आहे. पौष्टिक फायद्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे सुपरफूड्स देशातील गुजरात, महाराष्‍ट्र, कर्नाटक, राजस्‍थान, तामिळनाडू, मध्‍यप्रदेश व छत्तीसगड अशा विविध राज्‍यांमधून स्रोत मिळवले जातात, ज्‍यामधून मॅकडोनाल्‍ड्स इंडियाची स्‍थानिक व शाश्‍वत सोर्सिंगप्रती कटिबद्धता दिसून येते.

सीएसआयआर-सीएफटीआरआयच्‍या सखोल कौशल्‍याने मिलेट्सचे पौष्टिक फायदे एकीकृत करण्‍यामध्‍ये, तसेच चव, पोत व दर्जाचे उत्तम संतुलन संपादित करण्‍यामध्‍ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्‍यासाठी मॅकडोनाल्‍ड्स ओळखले जाते. परिणामत: बनमध्‍ये आवश्‍यक व्हिटॅमिन्‍स, मिनरल्‍स व नॅच्‍युरल डाएटरी फायबर आहे, जे प्रत्‍येक बाइटमध्‍ये पोषण व उत्तम आस्‍वादाची खात्री देते.

हेदेखील वाचा – 24 तासांत अशी फिरते पृथ्वी; सॅटेलाइटने टिपला अप्रतिम व्हिडिओ

सीएसआयआर-सीएफटीआरआयच्‍या संचालक डॉ. श्रीदेवी अन्‍नपूर्णा सिंग म्‍हणाल्‍या, ”मॅकडोनाल्‍ड्स इंडिया (W&S) सोबतच्‍या आमच्‍या सहयोगामधून प्रगत खाद्य तंत्रज्ञान आणि उद्योग-अग्रणी सर्वोत्तम पद्धतींचे धोरणात्‍मक एकीकरण दिसून येते. हा संयुक्‍त प्रयत्‍न पौष्टिक मूल्‍य देण्‍यासोबत उत्तम चवीचा आस्‍वाद देणारे मेनू तयार करण्‍याच्‍या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. सीएसआयआर-सीएफटीआरआयच्‍या अत्‍याधुनिक संशोधन क्षमता आणि मॅकडोनाल्‍ड्स इंडियाचे कार्यरत कौशल्‍य व दर्जाप्रती कटिबद्धता यांच्‍या एकत्रिकरणासह आम्‍हाला विश्‍वास आहे की, आम्‍ही आहाराला उत्तम भविष्‍य देणाऱ्या नवीन युगाच्‍या दिशेने वाटचाल करत आहोत.”

मॅकडानोल्‍ड्स इंडिया (W&S) आणि सीएसआयआर-सीएफटीआरआय यांच्‍यामधील या दीर्घकालीन सहयोगाचा पौष्टिक नाविन्‍यतेमधील नवीन मार्गांचा शोध घेण्‍याचा, तसेच ग्राहकांना पौष्टिक फायदे देण्‍याचा मनसुबा आहे. सहयोगाने, दोन्‍ही कंपन्‍या ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक आहार पसंतींची पूर्तता करणारे पौष्टिक व स्‍वादिष्‍ट मेनू तयार करण्‍याप्रती कटिबद्ध आहेत. तसेच मिलेट्स सारख्‍या पारंपारिक घटकांना आधुनिक खाद्य विज्ञान व तंत्रज्ञानासोबत एकत्र करण्‍यावर भर देण्‍यात आला आहे.

मॅकडोनाल्‍ड्स इंडिया (W&S)चे कार्यकारी संचालक अक्षय जाटिया म्‍हणाले, ”मॅकडोनाल्‍ड्स इंडिया (W&S)मध्‍ये आमचा ‘रिअल फूड दॅट इज रिअल गुड’चा अनुभव देण्‍याचा दीर्घकालीन दर्जा आहे. सादर करण्‍यात आलेल्‍या मल्‍टी-मिलेट बनमधून आमच्‍या ऑफरिंग्‍जचे पौष्टिक मूल्‍य वाढवण्‍याप्रती आमचे प्रयत्‍न दिसून येतात, तसेच आम्‍ही आमच्‍या ग्राहकांना आवडणाऱ्या स्‍वादांची पूर्तता करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. आम्‍ही या अद्वितीय उत्‍पादनाला प्रत्‍यक्षात आणण्‍यास मदत करण्‍यामध्‍ये बहुमूल्‍य कौशल्‍य देण्‍यासाठी सीएफटीआरआयचे आभार व्‍यक्‍त करतो, यामुळे पौष्टिक आहार पर्याय प्रदान करण्‍याप्रती आमच्‍या मिशनला अधिक चालना मिळाली आहे.”

हेदेखील वाचा – BSNL ने वाढवले Jio-Airtel-Vi चे टेन्शन! स्वस्त केले हे तीन प्लॅन

मल्‍टी-मिलेट बनचे लाँच सहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्‍या मॅकडोनाल्‍ड्स इंडियाच्‍या ‘रिअल फूड रिअल गुड’ प्रवासामधील महत्त्वपूर्ण टप्‍पा आहे. या तत्त्वामधून ब्रँडचा दर्जावरील अविरत फोकस दिसून येतो, जेथे मेनूमधील खाद्यपदार्थांमध्‍ये आर्टिफिशियल कलर्स, आर्टिफिशियल फ्लेवर्स आणि आर्टिफिशियल प्रीझर्व्‍हेटिव्‍ह्ज नसण्‍याची खात्री मिळते, तसेच चिकन ऑफरिंग्‍जमध्‍ये कोणतेही अतिरिक्‍त एमएसजी नाही. जवळपास तीन दशकांपासून मॅकडोनाल्‍ड्स इंडिया जागतिक स्‍तरावर मान्यताकृत पुरवठादारांकडून ताजे, स्‍थानिक स्रोत मिळवलेल्‍या घटकांचा वापर करण्‍याप्रती कटिबद्ध आहे, ज्‍यामुळे बहुमूल्‍य ग्राहकांसाठी विश्‍वसनीय सहयोगी आहे.

ग्राहक आता पश्चिम व दक्षिण भारतातील त्‍यांच्‍या जवळचे मॅकडोनाल्‍ड्स रेस्‍टॉरंट्स, ड्राइव्‍ह-थ्रूच्‍या माध्‍यमातून चालता-फिरता आणि मॅकडिलिव्‍हरी अॅपच्‍या माध्‍यमातून ऑर्डर करत नवीन मल्‍टी-मिलेट बनची निवड करत पौष्टिक व अतिरिक्‍त पोषण असलेल्‍या क्‍लासिक मॅकआलू टिक्‍की ते मसालेदार मॅकस्‍पाइसी पनीरपर्यंत त्‍यांच्‍या आवडत्‍या बर्गर्सचा आस्‍वाद घेऊ शकतात.

Web Title: Mcdonalds india and csir cftri join hands to launch multi millet bun which will add more nutrition in the menu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 05:56 PM

Topics:  

  • Nutrition

संबंधित बातम्या

“तुमचं पोषण आहे अपूरं, मग नका करू उशीर”; जाणून घ्या शरीरातील लक्षणं अन् खाण्यात करा ‘असे’ सुधार
1

“तुमचं पोषण आहे अपूरं, मग नका करू उशीर”; जाणून घ्या शरीरातील लक्षणं अन् खाण्यात करा ‘असे’ सुधार

सकाळची पौष्टीक सुरुवात! मटकीचे घावन कधी खाल्ले आहेत का? चवीला अप्रतिम, घरचेही होतील खुश
2

सकाळची पौष्टीक सुरुवात! मटकीचे घावन कधी खाल्ले आहेत का? चवीला अप्रतिम, घरचेही होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.