Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयुष्मान खुराणा आणि मेटाची ‘स्कॅम से बचलो’ मोहिम लॉंच ! मोहिमेद्वारे ऑनलाइन घोटाळ्यांविरोधात जनजागृती

मेटाने ‘स्‍कॅम्‍स से बचो' मोहिम अभिनेता आयुष्मान खुराणासोबत लाँच केली आहे. मेटाची ही मोहिम  देशभरात घोटाळे व सायबर फसवणूकांच्‍या वाढत्‍या केसेसचे निराकरण करण्‍याच्‍या शासनाच्‍या ध्‍येयाला पाठिंबा देते.

  • By नारायण परब
Updated On: Oct 15, 2024 | 10:30 PM
फोटो सौजन्य- फेसबुक

फोटो सौजन्य- फेसबुक

Follow Us
Close
Follow Us:

मेटाने सुरक्षिततेसाठी ‘स्‍कॅम्‍स से बचो’ मोहिम अभिनेता आयुष्मान खुराणासोबत  लाँच केली आहे. सर्वसामान्यांना  ऑनलाइन घोटाळ्यांपासून सुरक्षित राहण्‍याच्‍या पद्धतींबाबत जागरूक करण्‍यासाठी, तसेच सुरक्षित डिजिटल पद्धतींना चालना देण्‍यासाठी ही मोहिम लॉंच केली आहे. मिनिस्‍ट्री ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी (एमईआयटीवाय), इंडियन सायबरक्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (आय४सी) आणि मिनिस्‍ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग (एमआयबी) सोबत या मोहिमेत सहयोग आहे. मेटाची ही मोहिम  देशभरात घोटाळे व सायबर फसवणूकांच्‍या वाढत्‍या केसेसचे निराकरण करण्‍याच्‍या शासनाच्‍या ध्‍येयाला पाठिंबा देते.

ही माहितीपूर्ण मोहिम व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या दैनंदिन जीवनात सामना कराव्‍या लागणाऱ्या काही सामान्‍य घोटाळ्यांना दाखवते, तसेच व्‍यक्‍तींना दक्ष राहण्‍यास आणि कोणतीही कृती करण्‍यापूर्वी खबरदारी घेण्‍यास प्रेरित करते. ही जाहिरात फेसबुक, इन्‍स्‍टाग्राम व व्‍हॉट्सअ‍ॅपवरील अनेक सुरक्षितता वैशिष्‍ट्यांना दाखवते, जे वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या ऑनलाइन सुरक्षिततेवर नियंत्रण ठेवण्‍यास सक्षम करतात. तुम्ही पूर्ण चित्रपट येथे पाहू शकता : https://www.facebook.com/MetaIndia/videos/1082499483221216/

या जाहिरातीमध्‍ये आयुष्‍मान खुराणा यांना जागरूक वेडिंग गेस्‍ट म्‍हणून दाखवण्‍यात आले आहे, जो व्‍यक्‍तींना घोटाळ्यांना बळी पडण्‍यापासून जागरूक करतो आणि त्‍याच्‍या द्रुत विचारसरणी व विनोदी स्‍वभावासह त्‍यांचे घोटाळ्यांपासून संरक्षण करतो. मेटाची सुरक्षितता वैशिष्‍ट्ये, जसे टू-फॅक्‍टर ऑथेन्टिकेशन, ब्‍लॉक अँड रिपोर्ट, व्‍हॉट्सअ‍ॅपच्‍या ग्रुप प्रायव्‍हसी सेटिंग्‍जना दाखवत ही मोहिम महत्त्वपूर्ण आठवण करून देते की, मेटाची इन-बिल्‍ट उत्‍पादन वैशिष्‍ट्ये व सुरक्षितता टूल्‍स लोकांना ऑनलाइन घोटाळे, फसवणूका आणि खात्‍यामध्‍ये छेडछाड होणाऱ्या जोखीमांपासून संरक्षण करण्‍यासाठी आवश्‍यक सुरक्षिततांसह सुसज्‍ज करतात.

वैयक्तिक खाती व गोपनीय माहितीचा समावेश असलेले ओटीपी घोटाळे, घोटाळे करणारे लोकांना त्‍यांचे पैसे देण्‍यास भुरळ पाडू शकणारे तोतयागिरी घोटाळे, मोठे परताव्‍यांची खात्री देणारे ट्रेडिंग व गुंतवणूक घोटाळे आणि बनावटी कर्ज अ‍ॅप्‍स व ऑफर्स अशा अनेक घोटाळ्यांना दाखवत ही मोहिम निदर्शनास आणते की मेटाची साधी, पण प्रभावी सुरक्षितता वैशिष्‍ट्ये व्‍यक्‍तींचे ऑनलाइन घोटाळे आणि फसवणूकांपासून संरक्षण करू शकतात.

ऑनलाइन सुरक्षिततेला गती देण्‍यासाठी ५० हून अधिक सुरक्षितात टूल्‍स व वैशिष्‍ट्ये लाँच केली आहेत

मेटाचे जागतिक स्‍तरावर ४०,००० हून अधिक कर्मचारी सुर‍क्षा व सुरक्षिततेवर काम करत आहेत, जेथे कंपनीने २०१६ पासून टीम्‍स व तंत्रज्ञानामध्‍ये २० बिलियन डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे. यामध्‍ये १५,००० कन्‍टेन्‍ट रिव्‍ह्यूवर्सचा समावेश आहे, जे २० भारतीय भाषांसह ७० हून अधिक भाषांमध्‍ये फेसबुक, इन्‍स्‍टाग्राम व थ्रेड्समधील कन्‍टेन्‍टचे पुनरावलोकन करतात. गेल्‍या तीन वर्षांमध्‍ये मेटाने ऑनलाइन सुरक्षिततेला गती देण्‍यासाठी ५० हून अधिक सुरक्षितात टूल्‍स व वैशिष्‍ट्ये लाँच केली आहेत आणि आम्‍ही ग्राहकांना ऑनलाइन सुरक्षिततेबाबत जागरूक करण्‍यासाठी, तसेच घोटाळेयुक्‍त कन्‍टेन्‍टविरोधात आमच्‍या सिस्‍टम्‍स प्रबळ करण्‍यासाठी नवीन मार्गांचा शोध घेत आहोत.

Web Title: Meta launch scam se bachalo campaign with ayushmann khurrana public awareness against online scams through campaigns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 10:30 PM

Topics:  

  • Ayushmann Khurrana

संबंधित बातम्या

HP New Brand Ambassador: Ayushmann Khurrana बनला HP इंडियाचा नवा चेहरा, आगामी जाहिरातीत भावासोबत झळकणार!
1

HP New Brand Ambassador: Ayushmann Khurrana बनला HP इंडियाचा नवा चेहरा, आगामी जाहिरातीत भावासोबत झळकणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.