मायक्रो यूएसबी की टाईप सी, कोणता चार्जर आहे बेस्ट?(फोटो सौजन्य - pinterest)
प्रत्येक फोन कंपनी आपल्याला खरेदी केलेल्या फोनसोबत फोनचा चार्जर देते. काही चार्जर Micro USB असतात तर काही Type C असतात. काही वर्षांपूर्वी प्रत्येत साध्या फोन किंवा स्मार्टफोन सोबत ग्राहकांना Micro USB चार्जर दिला जायचा. पण आता हे प्रमाणात काहीस कमी होताना पाहायला मिळत आहे. आता सर्वच कंपन्यांमध्ये Type C चार्जरची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. कंपन्या त्यांच्या फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फोन सोबत Type C चार्जर देतात. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल सध्या निम्म्याहून अधिक फोनसाठी Type C चार्जर उपयुक्त ठरतो.
हेदेखील वाचा- Samsung ने परत मागवले 10 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक स्टोव्ह; 250 आगीच्या घटना, 40 लोक जखमी
सध्या अनेक स्मार्टफोन्ससोबत जरी Type C चार्जर मिळत असला तरी Micro USB चार्जरचे फायदे देखील मोठ्या प्रमाणात आहेत. Micro USB चार्जरला आपण ऑल ईन वन देखील बोलू शकतो कारण हा चार्जर आपण हेडफोन्स किंवा बॅटरी चार्ज करण्यासाठी देखील वापरू शकतो. त्यामुळे दोन्ही पैकी नक्की कोणता चार्जर बेस्ट आहे, यासाठी नेहमीच आपला गोंधळ उडतो. पण आता आम्ही तुम्हाला दोन्ही चार्जरचे फायदे सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही अगदी सहज ठरवू शकाल की कोणता चार्जर बेस्ट आहे. अलीकडच्या काळात, स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट चार्ज करण्यासाठी Micro USB आणि Type C अशा दोन प्रकारचे चार्जिंग पोर्ट वापरले जातात. दोन्ही चार्जर दिसायला सारखेच आहेत.
सुरुवातीला, कंपनी फोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट चार्ज करण्यासाठी फक्त Micro USB पोर्ट वापरत होती. पण जसजशी टेक क्षेत्रात प्रगत होत गेली Micro USB चा वापर कमी होत गेला. सध्या, हे चार्जिंग पोर्ट बजेट स्मार्टफोनमध्ये वापरले जाते. मात्र, त्याला स्वतःच्या काही मर्यादा आहेत. Micro USB चे काही तोटे देखील आहेत. Micro USB पोर्ट नवीन Type C च्या तुलनेत कमी चार्जिंग गती देते. डेटा ट्रान्सफर करताना, Micro USB चा वेग कमी असतो, ज्यामुळे युजर्सला खूप प्रतीक्षा करावी लागते. अनेक कंपन्या देखील हळूहळू नवीन उपकरणांमधून Micro USB काढून टाकत आहेत.
हेदेखील वाचा- WhatsApp वर Meta AI व्हॉईससह आले एकूण 5 नवे फीचर! युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार
स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट चार्ज करण्यासाठी अलीकडच्या काळात Type C पोर्ट हे नवीनतम तंत्रज्ञान आहे. मायक्रो यूएसबी पोर्टच्या तुलनेत, Type C गॅझेटला अधिक वेगाने चार्ज करते. याशिवाय, युजर्स Type C चार्जर कोणत्याही दिशेने स्थापित करू शकतात, कारण त्याची रचना दोन्ही बाजूने सारखीच आहे.
Micro USB आणि Type C पोर्ट चार्जर दोन्ही बाजारात उपलब्ध आहेत. परंतु हे मान्य करावे लागेल की Type C पोर्ट हा प्रत्येक बाबतीत Micro USB पोर्टपेक्षा वेगवान आहे. जलद चार्जिंग असो किंवा जलद डेटा ट्रान्सफर Type C युजर्सना नेहमीच चांगला अनुभव देते. याशिवाय Type C चार्जर अनिवार्य करण्याचे कामही केंद्र सरकारकडून सुरू आहे. या संदर्भात, असा अंदाज आहे की 2025 पर्यंत, स्मार्टफोन निर्मात्यांसाठी सरकारकडून Type C चार्जर अनिवार्य केले जाईल.