WhatsApp वर आले एकूण 5 नवे फीचर (फोटो सौजन्य- pinterest)
Meta च्या मालकिचा WhatsApp सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे. WhatsApp त्यांचा युजर्सचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी नेहमीच नवीन फीचर लाँच करत असते. WhatsApp च्या नवीन फीचर्समुळे युजर्सची अनेक कामं अगदी सहज सोपी होतात. एकूणच काय तर WhatsApp चे प्रत्येक फीचर युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर ठरते. गेल्या काही दिवसांतच WhatsApp ने अनेक नवीन फीचर लाँच केले आहेत.
हेदेखील वाचा-ChatGPT वर आलं नवीन अपडेट, आता युजर्स विनामुल्य तयार करू शकतील AI इमेज
ज्यामध्ये इव्हेंट फीचर, Meta AI व्हॉईस सर्च, इवेंट ड्यूरेशन मॅनेजर, व्हेरिफिकेशन रंगात बदल आणि चॅनेल कॅटेगरी यांचा समावेश आहे. यापैकी इव्हेंट फीचर आणि व्हेरिफिकेशन रंगात बदल हे फीचर आधीच लाँच झाले आहेत. तर इतर विकासाच्या टप्प्यात असून लवकरच लाँच केले जाणार आहे. या सर्व फीचर्सबाबत WebtaInfo ने माहिती जारी केली आहे. या नवीन फीचर्समुळे युजर्सचा WhatsApp वापरण्याचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. युजर्सना WhatsApp चा वापर करणं अधिक सोपं वाटू लागेल. युजर्सची अनेक कामं अगदी सहज केली जाऊ शकतात.
इव्हेंट फीचर
iOS 24.15.79 अपडेटसह, WhatsApp ने युजर्ससाठी ग्रुप चॅटसाठी Events in Groups फीचर लाँच केलं आहे. हे फीचर आता ऍपल उपकरणांच्या सर्व युजर्ससाठी देखील उपलब्ध आहे. WhatsApp Events द्वारे तयार करण्यात आलेल्या मॅसेज कॅलेंडर इन्वाइट्ससारखं असणार आहे. या मॅसेजमध्ये तुम्हाला तारीख, वेळ आणि ठिकाण यांसारखी माहिती देता येणार आहे. तसेच यामध्ये तुम्ही ग्रुपच्या इतर सदस्यांना इव्हेंटसाठी व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉलसाठी देखील सूचित करू शकता.
Meta AI व्हॉईस सर्च
WhatsApp च्या नवनवीन अपडेटविषयी माहिती देणारे प्लॅटफॉर्म WebtaInfo च्या रिपोर्टनुसार, Meta ने या आठवड्यात Android 2.24.17.3 अपडेटसाठी WhatsApp Beta ची घोषणा केली आहे. यामध्ये WhatsApp Meta AI व्हॉईस सर्च या फीचरवर काम करत आहे. सध्या, हे फीचर विकासाच्या टप्प्यात आहे आणि भविष्यात ते नवीन अपडेटससह रिलीज केलं जाणा आहे.
हेदेखील वाचा- लवकरच लाँच होणार YouTube Sleep Timer फीचर; एका विशिष्ट वेळी आपोआप थांबणार व्हिडीओ
इवेंट ड्यूरेशन मॅनेजर
कंपनीने या आठवड्यात Android 2.24.17.11 अपडेटसाठी WhatsApp बीटा देखील घोषित केला आहे. या अपडेटमध्ये, व्हॉट्सॲप कम्युनिटी ग्रुप चॅटसाठी इव्हेंट कालावधी व्यवस्थापित करण्यासाठी एक नवीन फीचर लाँच केलं जाणार आहे. इवेंट ड्यूरेशन मॅनेजर असं हे फीचर आहे.
व्हेरिफिकेशन रंगात बदल
WhatsApp एक नवीन अपडेट लाँच केलं आहे. या नवीन अपडेटनुसार WhatsApp व्हेरिफिकेशन टीकचा रंग बदलण्यात आला आहे. WhatsApp व्हेरिफिकेशन टीक आता निळ्या रंगाची झाली आहे. यापूर्वी WhatsApp व्हेरिफिकेशन टीक हिरव्या रंगाची होती. निळ्या रंगाची टीक व्हेरिफिकेशन झालेल्या सर्व कंपन्यांना उपलब्ध असेल.
चॅनेल कॅटेगरी
WhatsApp लवकरच त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन अपडेट लाँच करणार आहे, ज्याच्या मदतीने युजर्स त्यांच्या पसंतीनुसार चॅनेलची कॅटेगरी निवडू शकतात.