मुकेश अंबानींची खास दिवाळी ऑफर! केवळ 699 रुपयांच्या किंमतीत खरेदी करा Jio Bharat 4G फोन
मुकेश अंबानी यांनी सर्वांसाठी दिवाळी ऑफर सुरु केली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना केवळ 699 रुपयांच्या किंमतीत Jio Bharat 4G फोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर JioBharat 4G फोनची किंमत कमी करण्यात आली आहे. हा 999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. मात्र आात दिवळीच्या निमित्ताने या फोनची किंमत कमी करण्यात आली आहे.
दिवाळी ऑफरमध्ये ग्राहक केवळ 699 रुपयांच्या किंमतीत Jio Bharat 4G फोन खरेदी करू शकणार आहेत. यामध्ये एका महिन्याचे रिचार्ज फक्त 123 रुपयांमध्ये केले जाते. फोनमध्ये ऑनलाइन पेमेंट करण्याच्या सुविधेसह अनेक विशेष फीचर्स उपलब्ध आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
हेदेखील वाचा- Poco C75 लाँच, 5000 mAh बॅटरी आणि 256GB स्टोरेज सारखे फीचर्स केवळ इतक्या किंमतीत उपलब्ध
मुकेश अंबानी यांनी ग्राहकांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. आता तुम्ही Jio Bharat 4G फीचर फोन फक्त 699 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. दिवाळीच्या मुहूर्तावर कंपनीने Jio Bharat 4G फोनच्या किमती 30 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. मर्यादित कालावधीच्या ऑफरमध्ये तुम्ही Jio Bharat 4G फीचर फोनच्या खरेदीवर 300 रुपयांची बचत करू शकता. त्यामुळे जर तुम्ही नवीन फीचर फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.
मर्यादित काळासाठी केवळ 699 रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या या फीचर फोनमध्ये फक्त 123 रुपयांचे एका महिन्याचे रिचार्ज आहे. या एका महिन्याचे टॅरिफ प्लॅनमध्ये अमर्यादित मोफत व्हॉईस कॉल आणि 14 जीबी डेटा देखील उपलब्ध असेल. Jio चा 123 रुपयांचा मासिक रिचार्ज प्लॅन इतर ऑपरेटरच्या तुलनेत 40 टक्के स्वस्त आहे. कारण इतर नेटवर्क फीचर फोनच्या मासिक रिचार्जसाठी 199 रुपये इतके कमी शुल्क आकारतात.
हेदेखील वाचा- Laptop Care Tips: लॅपटॉप वर्षानुवर्षे नवीन राहील, फक्त या 5 गोष्टी करा
हा फक्त फोन नाही तर 2G वरून 4G वर शिफ्ट होण्याची संधी आहे. यामध्ये 455 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनल, मूव्ही प्रीमियर आणि नवीन चित्रपट, व्हिडिओ शो, लाईव्ह स्पोर्ट्स प्रोग्रॅम, जिओसिनेमा हायलाइट्स, डिजिटल पेमेंट्स, क्यूआर कोड स्कॅन अशा सुविधा दिल्या जात आहेत.
या फोनमध्ये JioPay आणि JioChat सारखे प्रीलोडेड ॲप्स देखील उपलब्ध असतील. जवळच्या दुकानांव्यतिरिक्त, फोन JioMart किंवा Amazon वरून देखील खरेदी केला जाऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी जिओने इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC 2024) मध्ये स्वस्त किमतीत आपले दोन नवीन फीचर फोन लाँच केले होते. JioBharat V3 आणि V4 फोन परवडणाऱ्या किमतीत चांगल्या वैशिष्ट्यांसह लाँच करण्यात आ होते. V3 आणि V4 हे दोन्ही 4G फीचर फोन JioBharat सीरीज अंतर्गत लॉन्च केले गेले आहेत. Jio च्या नवीन 4G फीचर आले. फोन JioBharat V3 आणि V4 ची किंमत फक्त 1,099 रुपये आहे. हे सर्व मोबाईल स्टोअर्स तसेच JioMart आणि Amazon वरून खरेदी केले जाऊ शकतात.