
शेवटी सर्वांना उत्सुकता असलेली iPhone 14 ची सीरीज सादर करण्यात आली. या सीरीज अंतर्गत लॉन्च केलेल्या iPhone 14 Plus मध्ये 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले आहे, तर iPhone 14 मध्ये 6.1-इंच स्क्रीन आहे. या दोन्ही मॉडेल्सची बॅटरी एक दिवस चालू शकेल. दोन्ही फोन्स मध्ये A15 बायोनिक चिपसेटचे अपडेटेड व्हर्जन देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे iPhone 14, iPhone 14 Plus US मॉडेल्समध्ये सिम कार्ड स्लॉट नाही. यामध्ये ई-सीम कार्ड वापरले जाणार आहे.
वॉच सिरीज 8 प्रमाणे Apple iPhone 14 आणि iPhone 14 Plus मध्ये क्रॅश डिटेक्शन उपलब्ध आहे. कंपनी सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीद्वारे iPhone 14 सिरीजमध्ये आपत्कालीन SOS क्षमता जोडत आहे. हे फिचर iPhone 14 आणि iPhone 14 Plus या दोन्हींमध्ये उपलब्ध असेल. सध्या, iPhone 14, iPhone 14 Plus मधील सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फिचर यूएस आणि कॅनडाच्या बाजारपेठेपुरते मर्यादित असेल. तुम्हाला iPhone 14 आणि iPhone 14 Plus मध्ये 12 मेगापिक्सेलचे दोनच कॅमेरा सेन्सर पाहायला मिळतील.
Apple ने काल Apple iPhone 14 Pro आणि Apple iPhone 14 Pro Max देखील सादर केले. आयफोन 14 प्रो मॉडेल्समध्ये A16 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे. ऍपलचा दावा आहे की हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली चिपसेट आहे. iPhone 14 Pro मध्ये 48MP मुख्य कॅमेरा आहे. iPhone 14 Pro ची किंमत $999 आणि iPhone 14 Pro Max ची किंमत $1099 पासून सुरू होते. या फोन्सची विक्रीदेखील 16 सप्टेंबरपासून सुरू होईल.
काल अॅपलचा (Apple) बहुप्रतीक्षित इव्हेंट पार पडला. Apple ने त्याच्या क्युपर्टिनो-कॅम्पसमध्ये फार आऊट इव्हेंट आयोजित केला होता. नवीन आयफोन मॉडेल्स, नवीन अॅपल वॉच आणि नवीन अॅपल एअरबड्स लॉन्च केले गेले. अॅपल इव्हेंटची सुरुवात अॅपल वॉचच्या (Apple Watch Series 8) लॉन्चसह झाली.
बॅटरीबाबत कंपनीचा दावा आहे की हे घड्याळ 36 तास चालेल. यासोबतच इंटरनॅशनल रोमिंगचाही सपोर्ट याला मिळणार आहे. याच्या GPS व्हर्जनची किंमत $399 पासून सुरू होईल, तर सेल्युलर व्हर्जनची किंमत $499 पासून सुरू होईल. आजपासून, हे नवीनतम घड्याळ प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध केले जाईल, परंतु विक्री 16 सप्टेंबरपासून सुरू होईल.
काल इव्हेंटमध्ये नवीन ऍपल वॉच एसई 2022 (Apple Watch SE 2022) व्हर्जन नवीन रंगांसह आणि बॅककेस डिझाइनसह सादर करण्यात आले. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, GPS आवृत्तीची किंमत $249 आणि सेल्युलर आवृत्तीची किंमत $299 निश्चित करण्यात आली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Apple Watch SE 2022 ची विक्री 16 सप्टेंबरपासून सुरू होईल. नवीन ऍपल वॉचमध्ये इतके उच्च तंत्रज्ञान आहे, की त्यात उपस्थित असलेल्या नवीन सेन्सरच्या मदतीने वापरकर्ते डायव्हिंग दरम्यान पाण्याचे तापमान आणि पाण्याची खोली इत्यादी तपासू शकतात.
काल Apple AirPods Pro 2 देखील सादर करण्यात आले. कंपनीने नवीन Apple Airpods Pro 2 ची किंमत $249 निश्चित केली आहे. हे Apple इयरबड्स 9 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डर बुकिंगसाठी उपलब्ध केले जातील आणि 23 सप्टेंबरपासून विक्री सुरू होईल.