Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Netflix च्या अडचणीत वाढ, वांशिक भेदभाव आणि करचुकवेगिरीच्या आरोपांमुळे निर्माण झाल्या समस्या

युजर्सच्या आवडत्या व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म Netflix वर आता काही आरोप करण्यात आले आहेत, त्यामुळे Netflix च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Netflix च्या भारतातील ग्राहकसंख्येमध्ये वाढ झाली आहे.Netflix वर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली तर त्याचा युजर्सवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 23, 2024 | 08:16 AM
नेटफ्लिक्सच्या अडचणीत वाढ, वांशिक भेदभाव आणि करचुकवेगिरीच्या आरोपांमुळे निर्माण झाल्या समस्या

नेटफ्लिक्सच्या अडचणीत वाढ, वांशिक भेदभाव आणि करचुकवेगिरीच्या आरोपांमुळे निर्माण झाल्या समस्या

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Netflix वर अनेक आरोप करण्यात आले आहेत, त्यामुळे या आरोपांची चौकशी झाल्या नंतर Netflix वर कोणत्या प्रकारची कारवाई केली जाणार आणि यामुळे Netflix युजर्सवर काय परीणाम होणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

हेदेखील वाचा- Tecno PoP 9 5G: 48MP Sony AI कॅमेरा असलेला Tecno फोन या दिवशी होणार लाँच

Netflix चे लाखो युझर्स आहेत. भारतात वीकेंड आणि Netflix असं एक खास कनेक्शन आहे. वीकेंड आला की अनेकजण Netflix वरील सिरीज आणि शो बघून त्यांचा वीकेंड एन्जॉय करतात. Netflix वरील शो आणि सिरीजना युजर्सची मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. त्यामुळे Netflix युजर्सच्या आवडत्या आणि टॉप व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. पण या सर्वांच्या आवडत्या व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर आता काही आरोप करण्यात आले आहेत, त्यामुळे Netflix च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Netflix वर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये व्हिसाचे उल्लंघन, बेकायदेशीर रचना, कर चुकवणे आणि वांशिक भेदभाव यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix इंडियाला भारतात समस्या येऊ शकतात. एका अहवालानुसार, Netflix भारत सरकारच्या चौकशीत आहे. स्थानिक हालचालींमुळे Netflix चा तपास सुरू करण्यात आला आहे. यामध्ये व्हिसाचे उल्लंघन, वांशिक भेदभाव यासह अनेक आरोपांचा समावेश आहे. ह्या आरोपांमुळे Netflix समोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

हेदेखील वाचा- Netflix ने घेतला मोठा निर्णय! युजर्सना दिला मोठा झटका, ‘या’ डिव्हाइसमधील स्ट्रिमिंग केलं बंद

व्यावसायिक पद्धतींमुळे Netflix या तपासाला सामोरे जात आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने Netflix मध्ये काम करणाऱ्या नंदिनी मेहता यांना प्लॅटफॉर्मच्या क्रियाकलापांबाबत एक मेल लिहिला होता. जो या तपासाचाही आधार आहे.

रॉयटर्सने ही माहिती दिलेल्या सरकारी मेलचा हवाला देत असे लिहिले आहे की, “आम्हाला Netflix च्या व्यवसाय पद्धतींशी संबंधित व्हिसा आणि कर उल्लंघनांबद्दल बरेच तपशील मिळाले आहेत. यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे ज्याचा वापर Netflix भारतात आपला व्यवसाय चालवण्यासाठी करत आहे. जसे व्हिसाचे उल्लंघन, बेकायदेशीर रचना, करचोरी आणि वांशिक भेदभाव जे चुकीचे आहे.

या प्रकरणावर Netflix च्या प्रवक्त्याने सांगितले की, Netflix विरुद्ध भारतात कोणत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे याबद्दल त्यांना माहिती नाही. त्यामूळे या संपूर्ण प्रकरणात Netflix ने अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस प्रतिक्रिया दिली नाही.

एका अहवालानुसार, Netflix चे भारतात 12 दशलक्ष सशुल्क सदस्य आहेत. नियामक फाइलिंगनुसार, Netflix एंटरटेनमेंट सर्व्हिसेस इंडियाच्या महसुलात 24 टक्क्यांनी वाढ होऊन आर्थिक वर्ष 23 मध्ये 2,214 कोटी रुपये झाले, तर निव्वळ नफा 75 टक्क्यांनी वाढून 35 कोटी रुपयांवर पोहोचला. ‘हीरामंडी’, ‘महाराज’ आणि ‘अमर सिंह चमकिला’च्या यशानंतर भारतात Netflix चा व्यवसाय तेजीत होताना दिसत आहे. Netflix च्या भारतातील ग्राहकसंख्येमध्ये वाढ झाली आहे. 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत जोडलेल्या नवीन सशुल्क सदस्यांच्या बाबतीत भारत Netflix साठी दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. त्यामुळे आता Netflix वर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली तर त्याचा युजर्सवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.

Web Title: Netflix india faces scrutiny over alleged racial discrimination visa violations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 08:16 AM

Topics:  

  • Netflix India

संबंधित बातम्या

Haq OTT Release: यामी गौतमचा सुपरहिट चित्रपट ‘हक’ ओटीटीवर प्रदर्शित; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट
1

Haq OTT Release: यामी गौतमचा सुपरहिट चित्रपट ‘हक’ ओटीटीवर प्रदर्शित; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.