Meta च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी रोल आऊट झालं नवं इमेज टूल! Imagine Me म्हणताच समोर उभं राहणार आश्चर्यकारक दृश्य
जगातील मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेली Meta कंपनी आता पुन्हा एकदा एक नवीन सरप्राईज घेऊन आली आहे. फेसबूक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Meta च्या मालकीचे आहेत. त्यामुळे कंपनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी सतत नवीन फीचर घेऊन येत असते. आता देखील कंपनीने असंच एक नवीन फीचर रोल आऊट करण्याची तयारी केली आहे. हे नवीन फीचर AI-पावर्ड टूल Imagine Me आहे. हे फीचर अद्याप सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आलेलं नाही. मात्र येत्या काळात नवीन टूल सर्वांसाठी उपलब्ध केलं जाणार आहे.
फेसबुक पेरेंट कंपनी Meta ने त्यांचे लेटेस्ट AI-पावर्ड टूल Imagine Me भारतात लाँच केलं आहे. या टूलच्या मदतीने युजर्स त्यांचे फोटो वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आणि अवतारात बदलू शकतात. मेटाने यापूर्वीच अमेरिकेत Instagram, WhatsApp, Messenger, आणि Meta AI अॅपसाठी हे टूल लाँच केलं आहे. आता हे टूल भारतात देखील लाँच करण्यात आलं आहे. सध्या भारतात हे टूल Instagram, WhatsApp आणि Facebook केवळ याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी लाँच करण्यात आलं आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फीचर टप्प्याटप्प्याने रिलीज केलं जात आहे. त्यामुळे सर्व युजर्सना हे फीचर मिळण्यासाठी काही वेळ लागू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
Imagine Me टूलच्या मदतीने युजर्स साधारण टेक्स्ट प्रॉम्प्टच्या मदतीने इमेज जेनरेट करू शकणार आहेत. यूजर्सना केवळ Imagine me as असा प्रॉम्प्ट द्यावा लागणार आहे, त्यानंतर तुमच्यासमोर एक आश्चर्यकारक दृश्य उभं राहणार आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही Imagine me as a superman असे लिहून प्रॉम्प्ट दिला तर Meta चे हे टूल तुमची इमेज Superman सारखी बनवेल. यूजरला त्याचे तीन सेल्फी द्यावे लागतील – समोर, डावीकडे आणि उजवीकडे. यानंतर तुमची ईमेज तयार असणार आहे. मेटाच्या Imagine Me टूलने तयार केलेल्या सर्व फोटोंवर AI वॉटरमार्क असेल, ज्यावर इमॅजिन्ड विथ AI असे लिहिले असेल.