किती रुपयांच्या डाउनपेमेंटवर मिळणार iPhone 16 Pro Max? किती असणार EMI? खरेदीपूर्वी जाणून घ्या सर्वकाही
Apple चा iPhone खरेदी करणं आजही अनेकांचं स्वप्न आहे. भारतात प्रत्येक 10 पैकी 8 व्यक्तींकडे आयफोन आहे. त्यामुळे आयफोन खरेदी करणं अवघड नसलं तरी देखील प्रचंड किंमतीमुळे हा फोन ऑन कॅश खरेदी करणं प्रत्येकाला परवडत नाही. iPhone 16 Pro Max ची किंमत देखील लाखोंच्या घरात आहे. हा प्रिमियम कॅटेगिरीमधील फोन ऑन कॅश खरेदी करणं प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे तुम्ही डाऊन पेमेंट आणि ईएमआयच्या ऑप्शनसह iPhone 16 Pro Max खरेदी करू शकता.
सध्या अनेक कंपन्या आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स iPhone 16 Pro Max च्या खरेदीवर EMI ची सुविधा देतात. त्यामुळे हल्ली कोणीही डाऊन पेमेंट आणि ईएमआयच्या ऑप्शनसह iPhone 16 Pro Max खरेदी करू शकतात. आता प्रश्न असा उद्भवतो की हा फोन खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट द्यावे लागेल आणि त्याचा मासिक हप्ता म्हणजे EMI किती असेल? (फोटो सौजन्य – Pinterest)
iPhone 16 Pro Max ची सुरुवातीची किंमत भारतात 1,29,900 रुपये आहे. ही किंमत फोनच्या बेस व्हेरिअंटसाठी आहे. जसे जसे स्टोरेज वाढते त्याचप्रमाणे फोनची किंमतही वाढते. पण सामान्य ग्राहकांसाठी, ईएमआय पर्याय सर्वात आकर्षक आहे कारण तो एकाच वेळी खिशावर मोठा भार टाकत नाही. याशिवाय या पर्यायासह तुम्ही तुमचा ड्रीम फोन देखील खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्हाला देखील हा ड्रीम फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही हा पर्याय वापरू शकता.
जर तुम्ही देखील हा फोन EMI वर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही बँक आणि फाइनेंस कंपन्या या फोनच्या खरेदीवर 0% डाउनपेमेंट आणि नो-कॉस्ट EMI चा देखील पर्याय देतात. म्हणजेच तुम्ही कोणत्याही अॅडवांस पेमेंटशिवाय फोन खरेदी करू शकता आणि यानंतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला एक ठरावीक रक्कम द्यावी लागणार आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही 12 महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआयवर 1,29,900 रुपये किमतीचा iPhone 16 Pro Max खरेदी केला तर तुम्हाला दरमहा सुमारे 10,800 ते 11,000 रुपये ईएमआय भरावा लागेल.
जर तुम्ही डाऊनपेमेंटसह फोन खरेदी केला तर तुमच्या फोनचा EMI आणखी कमी होणार आहे. म्हणजेच जर तुम्ही रकमेच्या 20 टक्के म्हणजेच 26,000 रुपयांचं डाउनपेमेंट केलं तर 1,03,000 रुपयांसाठी तुम्हाला EMI लागू केला जाणार आहे. यावेळी, 12 महिन्यांसाठी EMI सुमारे 8,500 ते 9,000 रुपये असेल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही 33% म्हणजेच सुमारे 43,000 रुपये डाउनपेमेंट केले तर EMI आणखी कमी होऊन 6,500 ते 7,000 रुपयांपर्यंत येऊ शकतो.
काही ई-कॉमर्स वेबसाइट्स जसे Flipkart आणि Amazon फोनच्या खरेदीवर विशेष ऑफर्स आणि एक्सचेंज डिस्काऊंट देखील देत आहे. यासोबतच HDFC, ICICI, Axis सारख्या बँक देखील कॅशबॅक आणि इन्स्टंट डिस्काउंटसह फोन खरेदी करण्याची संधी देत आहेत. थोडक्यात, iPhone 16 Pro Max खरेदी करणे आता फक्त श्रीमंतांचा छंद राहिलेला नाही. ईएमआय योजना आणि डाउन पेमेंट पर्यायांमुळे मध्यमवर्गीय ग्राहकांनाही ते शक्य झाले आहे.