Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“भारत सोडून जा, नाहीतर…”; सर्वोच्च न्यायालयाने WhatsApp ला फटकारले; जाणून घ्या काय आहे प्रकरण

भारतीयांच्या डेटा गोपनीयतेवरून सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सअ‍ॅप आणि मेटाला कठोर शब्दांत फटकारले आहे. संविधानाचे पालन न केल्यास भारत सोडून जाण्याचा इशारा न्यायालयाने दिला असून २१३ कोटींच्या दंडाचा पेच वाढला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 03, 2026 | 05:55 PM
सर्वोच्च न्यायालयाने WhatsApp ला फटकारले; जाणून घ्या काय आहे प्रकरण (Photo Credit- X)

सर्वोच्च न्यायालयाने WhatsApp ला फटकारले; जाणून घ्या काय आहे प्रकरण (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • संविधान पाळता येत नसेल तर भारत सोडा…
  • डेटा प्रायव्हसीवरून सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सअ‍ॅपला झापले
  • २१३ कोटींच्या दंडाचा काय आहे पेच?
Supreme Court WhatsApp Privacy Case: मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने मेटा (Meta) आणि व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) या कंपन्यांना अत्यंत कठोर शब्दांत फटकारले आहे. भारतीयांच्या वैयक्तिक डेटाचा गैरवापर आणि गोपनीयतेशी होणारी छेडछाड कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. “जर तुम्ही भारतीय संविधानाचा आदर करू शकत नसाल आणि कायद्यांचे पालन करणे शक्य नसेल, तर खुशाल देश सोडून जा,” अशा सडेतोड शब्दांत न्यायालयाने आपली नाराजी व्यक्त केली.

नेमका काय आहे ‘डेटा’चा वाद?

हा संपूर्ण वाद व्हॉट्सअ‍ॅपच्या २०२१ च्या प्रायव्हसी पॉलिसीशी संबंधित आहे. सक्तीचे धोरणया धोरणानुसार, व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती फेसबुकची मूळ कंपनी ‘मेटा’सोबत शेअर करणे अनिवार्य केले होते. वापरकर्त्यांना हे धोरण नाकारण्याचा (Opt-out) कोणताही पर्याय देण्यात आला नव्हता. म्हणजेच, जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वापरायचे असेल, तर तुम्हाला तुमचा डेटा मेटासोबत शेअर करण्यास संमती द्यावीच लागेल.

#BREAKING: The Supreme Court reprimanded WhatsApp and Facebook (Meta) over data-sharing practices, emphasizing that user privacy cannot be compromised. The court clarified that WhatsApp cannot share any user information with other companies. CJI Surya Kant questioned the clarity… pic.twitter.com/NrR65PM3z5 — IANS (@ians_india) February 3, 2026

WhatsApp Update: मुलांची सुरक्षा वाढणार! अ‍ॅपवर लवकरच येणार नवं फीचर, पालकांना मिळणार खास कंट्रोल

CCI चा मोठा दंड

भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) याला वर्चस्वाचा गैरवापर मानत व्हॉट्सअ‍ॅपला ₹२१३.१४ कोटींचा मोठा दंड ठोठावला होता. या दंडाविरोधात मेटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

“लोकांच्या खाजगी आयुष्यावर जाहिरातींचा वर्षाव”; CJI संतापले

सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी एक धक्कादायक अनुभव मांडला. ते म्हणाले, “जर व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्या आजाराबद्दल डॉक्टरांना मेसेज पाठवला, तर लगेच संबंधित औषधांच्या जाहिरातींचा वर्षाव सुरू होतो. हा डेटा वापरकर्त्याच्या संमतीशिवाय जाहिरातींसाठी कसा वापरला जातो?” न्यायालयाने व्हॉट्सअ‍ॅपच्या धोरणावर ताशेरे ओढताना म्हटले की, “तुमचे धोरण इतके गुंतागुंतीचे आहे की ते आम्हालाही समजत नाही. मग देशातील गरीब जनता, रस्त्यावरील विक्रेते किंवा प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या महिलांना ते कसे समजणार? तुम्ही देशाच्या गोपनीयतेच्या अधिकाराशी छेडछाड करू शकत नाही.”

मेटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने मेटाला स्पष्ट आदेश दिले आहेत की, जोपर्यंत कंपनी “आम्ही वापरकर्त्यांचा डेटा गैरमार्गाने वापरणार नाही” असे लेखी प्रतिज्ञापत्र (Affidavit) न्यायालयात सादर करत नाही, तोपर्यंत ही सुनावणी पुढे जाणार नाही. न्यायालयाने मेटाला त्यांच्या डेटा सुरक्षिततेच्या धोरणाबाबत पारदर्शकता आणण्यास सांगितले आहे.

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर

Web Title: The supreme court reprimanded whatsapp learn what the case is about

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • meta
  • Supreme Court
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Supreme Court News: न्यायालयाच्या निकालावर टीका करणे म्हणजे ‘अवमान’ नाही; सर्वोच्च न्यायालयाचे मोठे विधान
1

Supreme Court News: न्यायालयाच्या निकालावर टीका करणे म्हणजे ‘अवमान’ नाही; सर्वोच्च न्यायालयाचे मोठे विधान

Supreme Court News: ‘तारीख पे तारीख’ बंद: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; सुनावणी पुढे ढकलण्याच्या नियमांत मोठे बदल
2

Supreme Court News: ‘तारीख पे तारीख’ बंद: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; सुनावणी पुढे ढकलण्याच्या नियमांत मोठे बदल

Meta च्या ‘या’ घोषणेमुळे 3,000,000,000 इन्स्टाग्राम युजर्सची Privacy धोक्यात, काय आहेत नेमकं बद्दल?
3

Meta च्या ‘या’ घोषणेमुळे 3,000,000,000 इन्स्टाग्राम युजर्सची Privacy धोक्यात, काय आहेत नेमकं बद्दल?

Maternity Leave वर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; ‘दत्तक’ घेणाऱ्या मातांनाही मिळणार प्रसूती रजेचा हक्क!
4

Maternity Leave वर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; ‘दत्तक’ घेणाऱ्या मातांनाही मिळणार प्रसूती रजेचा हक्क!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.