(नीरज चोप्राच्या हातात दिसलं प्रीमियम घड्याळ)फोटो सौजन्य - The Olympic Games
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने मंगळवारी दुसऱ्या गटामधील पहिला थ्रो करून चमत्कार करून दाखवला. भारतीय स्टार नीरज चोप्राचा पहिला थ्रो त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टाकला आणि त्याच्या भाल्याने ८९.३४ मीटर अंतर पार करून फायनल गाठली. पॅरिस ऑलिंपिकमध्ये केवळ नीरज चोप्राच्या थ्रोनेच नाही तर त्याच्या हातातील घड्याळाने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भालाफेक स्पर्धेच्या पात्रता फेरी वेळी नीरज चोप्राच्या हातात Omega Seamaster Aqua Terra Ultra Light वॉच पाहायला मिळालं. या घड्याळाचे फिचर्स ऐकून तुम्ही हैराण व्हाल.
हेदेखील वाचा- OnePlus चा ‘हा’ टॅबलेट झाला प्रचंड स्वस्त! जबदरस्त डिस्प्ले आणि भन्नाट फीचर्सने सुसज्ज
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भालाफेक स्पर्धेच्या पात्रता फेरीत मंगळवारी भारतीय स्टार नीरज चोप्राने शानदार थ्रो केला. त्याने पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर भालाफेक केली. अशी कामगिरी केल्यानंतर तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. आता नीरज चोप्र 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत गोल्डन थ्रो करण्यासाठी सहभागी होणार आहे. मंगळवारी निरजने जेव्हा थ्रो केलं तेव्हा त्याच्या हातात एक महागडा घड्याळ पाहायला मिळालं. Omega Seamaster Aqua Terra Ultra Light असं या घड्याळाचे नाव आहे. या घड्याळाचे फिचर्स अत्यंत कमाल आहेत. चला तर मग Omega Seamaster Aqua Terra Ultra Light घड्याळाच्या फिचर्स वर नजर टाकुया.
Omega Seamaster घड्याळे स्वित्झर्लंडमध्ये तयार केली जातात. 1848 मध्ये ला चॉक्स-डे-फॉन्ड्स येथे लुई ब्रँडट यांनी स्थापन केलेली ही कंपनी प्रथम ला जनरल वॉच या नावाने कार्यरत होती. कालांतराने कंपनीचं नाव Omega करण्यात आलं.
हेदेखील वाचा- iQOO Z9s Pro लवकरच भारतात होणार लाँच! स्मार्ट फीचर्ससह मिळणार खास अपडेट्स
Omega Seamaster Aqua Terra Ultra Light अनेक फिचर्ससाह लाँच करण्यात आलं आहे. ह्या घड्याळात ॲनालॉग डिस्प्ले आहे. Omega Seamaster Aqua Terra Ultra Light वॉच 150 मीटर खोल पाण्यातही काम करते. या घड्याळात टेलिस्कोपिक फिचर आहे. घड्याळ अतिशय हलक्या वजनाचे आहे. तसेच ह्या घड्याळाचे स्ट्रॅप देखील अतिशय मऊ आणि हलक्या वजनाचे आहे. Omega Seamaster Aqua Terra Ultra Light एक स्पोर्ट वॉच आहे.
कोणत्याही खेळात हे घड्याळ तुमचा साथीदार म्हणून काम करते. घड्याळाला एक क्लासी लूक देण्यात आला आहे. घड्याळाचे डिझाईन देखील अतिशय आकर्षक आहे. घड्याळाचा डायल सँडब्लास्टेड ग्रेड 5 टायटॅनियमपासून बनविला गेला आहे. तुम्ही सलग 72 तास या घड्याळाचा वापर करू शकता. Omega Seamaster Aqua Terra Ultra Light वॉच 150 मीटर खोल पाण्यातही काम करते. त्यामुळे प्रत्येक कामात तुम्ही Omega Seamaster Aqua Terra Ultra Light घड्याळाचा वापर करू शकता.
नीरज चोप्राच्या हातातील Omega Seamaster Aqua Terra Ultra Light घड्याळाची किंमत सुमारे 6 लाख रुपये आहे. कंपनीच्या फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये अनेक घड्याळे ऑफर केली जातात. ज्याची किंमत लाखाचया घरात आहे. कंपनीच्या दुसऱ्या Omega-SEAMASTER AQUA TERRA 150M ची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.