iQOO Z9s Pro भारतात लवकरच लाँच होणार (फोटो सौजन्य-iQOO )
टेक कंपनी iQOO लवकरच त्यांची नवीनतम स्मार्टफोन सिरीज iQOO Z9s भारतात लाँच करणार आहे. iQOO Z9s सिरीजमध्ये कंपनी iQOO Z9s Pro 5G आणि iQOO Z9s 5G असे दोन्ही मॉडेल भारतात लाँच करणार आहे. 21 ऑगस्ट रोजी, कंपनी iQOO Z9s Pro आणि iQOO Z9s 5G लाँच करणार आहे. लाँच इव्हेंटपूर्वीच कंपनीने या दोन्ही डिवाइसच्या अनेक फीचर्सची माहिती शेअर केली आहे. iQOO ने या फोनचे डिझाईन, चिपसेट, डिस्प्ले, बॅटरी इत्यादीबद्दल माहिती दिली आहे.
हेदेखील वाचा- फ्लिपकॉर्टने सुरु केली Flipkart Minutes सर्विस! आता 15 मिनिटांत मिळणार सामानाची डिलीवरी
तसेच iQOO Z9s सिरीजमधील फोन्सची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांना बजेट किंमतीतiQOO Z9s सिरीजमधील iQOO Z9s Pro 5G आणि iQOO Z9s 5G या स्मार्टफोनची खरेदी करता येणार आहे. कंपनी काही खास अपडेट्ससह ही नवीन सिरीज भारतात लाँच करणार आहे. सिरीजमधील दोन्ही फोनच्या कॅमेरा क्वालिटीकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. त्यामुळे iQOO Z9s Pro 5G आणि iQOO Z9s 5G एका जबरदस्त कॅमेऱ्यासह लाँच केला जाणार असल्याचे सांगितलं जात आहे.
हेदेखील वाचा- ChatGPT च्या मदतीने तुमचे असाइनमेंट पूर्ण करताय? या टूलमुळे काही क्षणातच होईल पोल खोल
डिस्प्ले
iQOO Z9s Pro मध्ये 120Hz 3D वक्र AMOLED डिस्प्ले आहे. iQOO Z9s Pro 5G 4500nits च्या पीक ब्राइटनेसला आणि iQOO Z9s 1800nits ला सपोर्ट करते. दोन्ही फोनचा लूक अतिशय प्रमियम आहे.
प्रोसेसर
iQOO Z9s Pro 5G मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. याचा Antutu स्कोर 8 लाखपेक्षा अधिक आहे. तर जर आपण QOO Z9s 5G बद्दल बोललो तर त्यात MediaTek Dimensity 7300 चिपसेट आहे.
बॅटरी
iQOO Z9s Pro मध्ये 5,500mAh ची मोठी बॅटरी आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ही सिरीज AI इरेजर आणि AI फोटो एन्हांस फीचरसह लाँच केली जाणार आहे. iQOO Z9s Pro तुम्ही ऑरेंज आणि मार्बल कलरमध्ये खरेदी करू शकता. तर iQOO Z9s 5G च्या बॅटरी बद्दल अद्याप अपडेट्स समोर आले नाहीत.
कॅमेरा
iQOO Z9s Pro 5G आणि iQOO Z9s 5G या दोन्ही फोन्सच्या कॅमेरा क्वालिटीकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. QOO Z9s Pro 5G आणि iQOO Z9s 5G मध्ये सर्वोत्तम कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. दोन्ही उपकरणांमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS), 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि सुपर नाईट मोडसाठी सपोर्ट असलेला 50-MP सोनी IMX882 कॅमेरा आहे. प्रो मॉडेलमध्ये 8-MP अल्ट्रा-वाइड लेन्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. कंपनीने नवीन फोनसोबत कॅमेरा अपडेट्सवर विशेष लक्ष दिलं आहे. या फोन्समध्ये संतुलित डायनॅमिक रेंज आणि उत्कृष्ट एक्सपोजर लेव्हल लक्षात घेऊन कॅमेरे लावण्यात आले आहेत.