फोटो सौजन्य - pinterest
टेक कंपनी OnePlus ने OnePlus Pad Go टॅबलेटची किंमत कमी केली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये OnePlus Pad Go टॅबलेट लाँच करण्यात आला होता. लाँचिगनंतर वर्ष पूर्ण होण्याआधीच कंपनीने ह्या टॅबलेटची किंमत कमी केली आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन टॅबलेट घेण्याच्या विचारात असाल तर OnePlus Pad Go तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण ह्यामध्ये तुम्हाला कमी किंमतीत जबरदस्त डिस्प्ले आणि अनेक भन्नाट फीचर्स मिळणार आहेत.
हेदेखील वाचा- ChatGPT च्या मदतीने तुमचे असाइनमेंट पूर्ण करताय? या टूलमुळे काही क्षणातच होईल पोल खोल
OnePlus Pad Go मध्ये 11.3 इंचाचा डिस्प्ले आहे, जो 2.4K च्या उत्कृष्ट रिझोल्यूशनसह येतो. या स्क्रीनची कमाल ब्राइटनेस 400 nits आहे आणि ती इंटेलिजेंट ब्राइटनेस फंक्शनसह येते, जी बाहेरील प्रकाशानुसार स्क्रीन ब्राइटनेस ऑटोमॅटिकली ॲडजस्ट करण्यात मदत करते.
OnePlus Pad Go मध्ये EIS सपोर्टसह 8MP रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे.
OnePlus Pad Go मध्ये 8000mAh बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हेदेखील वाचा- Portable Clothes Dryer: आता पावसाळ्यात कपडे सुकवण्याचं टेंशन मिटलं? ‘या’ गॅझेटमुळे तुमचं काम होईल सोपं
OnePlus Pad Go मध्ये MediaTek Helio G99 चिपसेट देण्यात आली आहे. 8GB LPDDR4X RAM आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज सह OnePlus Pad Go लाँच करण्यात आला.
OnePlus Pad Go 3 व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8GB + 128GB, 8GB+128GB LTE, 8GB+256GB LTE या तिघांचा समावेश आहे.
पहिला प्रकार: 8GB + 128GB वाय-फाय- जुनी किंमत: 19,999 रुपये – नवीन किंमत: 17,999 रुपये
दुसरा प्रकार: 8GB+128GB LTE- जुनी किंमत: 21,999 रुपये – नवीन किंमत: 19,999 रुपये
तिसरा प्रकार: 8GB+256GB LTE- जुनी किंमत: 23,999 रुपये – नवीन किंमत: 21,999 रुपये
OnePlus ने आपल्या टॅबलेटच्या या तीन्ही व्हेरियंटची किंमत प्रत्येकी 2,000 रुपयांनी कमी केली आहे. तसेच कंपनीने काही बँक ऑफर्स देखील ठेवल्या आहेत. या ऑफर्समध्ये टॅबलेट खरेदी केल्यास तुम्हाला 2000 रुपयांचं अतिरिक्त डिस्काऊंट मिळणार आहे. म्हणजेच OnePlus Pad Go खरेदी करताना तुम्ही 4000 रुपयांची बचत करू शकता. तुम्ही हा टॅबलेट ICICI बँक किंवा Onecard क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करून खरेदी केल्यास, तुम्हाला नवीन किंमतीसह 2000 रुपयांचे झटपट डिस्काऊंट देखील मिळणार आहे.
तुम्ही हा उत्तम टॅबलेट OnePlus च्या अधिकृत वेबसाईटवरून फक्त 15,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता. लाँचिगनंतर वर्ष पूर्ण होण्याआधीच कंपनीने ह्या टॅबलेटची किंमत कमी केली आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन टॅबलेट घेण्याच्या विचारात असाल तर OnePlus Pad Go तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण ह्यामध्ये तुम्हाला कमी किंमतीत जबरदस्त डिस्प्ले आणि अनेक भन्नाट फीचर्स मिळणार आहेत.