Barbie गर्ल्ससाठी Nokia ने लाँच केला Pink Barbie Flip Phone! डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल व्वा! (फोटो सौजन्य -Nokia )
तुम्हाला लहानपणीचा Barbie फोन आठवतोय का? हा तोचा फोन ज्याच्यासाठी आपण सर्वच जण हट्ट करत होतो. पण आता स्मार्टफोन्सच्या दुनियेत तो Barbie फोन कुठे तरी हरवला आहे. हल्ली प्रत्येकालाच टच स्क्रिन, सुपर कॅमेरा आणि पावरफुल फिचर्स असणारा स्मार्टफोन आवडतो. पण या ट्रेंडिंग स्मार्टफोन्सच्या जगात टेक कंपनी Nokia ने आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी स्मार्ट Pink Barbie Flip फोन लाँच केला आहे. NOKIA ची फोन निर्माता कंपनी HMD ने Barbie गर्ल्ससाठी Barbie फोन लाँच केला आहे. फोनचा लूक आणि डिझाइन बार्बी कॅरेक्टरवर आधारित आहे.
हेदेखील वाचा- Samsung लवकरच लाँच करणार डबल फोल्डेबल स्मार्टफोन! लाँचिंगपूर्वी डिटेल्स लिक
फोनमध्ये दोन स्क्रीन, मोठी बॅटरी यासह अनेक पावरफुल फिचर्स आहेत. फोनचे डिझाईन पाहून तुम्हालाही लहानपणीचा Barbie फोन नक्कीच आठवेल. HMD Global ने हा फोन वर्षाच्या सुरुवातीला आयोजित मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2024) मध्ये सादर केला होता. Human Mobile Device (HMD) चा हा फ्लिप फोन बार्बी कॅरेक्टर थीमवर आधारित आहे. फोनची बॉडी गुलाबी रंगाची आहे. कंपनी या फोनसोबत ज्वेलरी बॉक्स, दोरी यांसारख्या ॲक्सेसरीजही देत आहे. कंपनी फोनसोबत दोन अतिरिक्त बॅक कव्हर, स्टिकर्स आणि जेम्स देखील देत आहे.
Barie या नावाने लॉन्च झालेल्या या फ्लिप फोनमध्ये दोन स्क्रीन आहेत. HMD Barbie Flip फोन अमेरिकेत लाँच झाला आहे. फोनची किंमत 129 डॉलर्स म्हणजेच सुमारे 10,800 रुपये आहे. हा फोन 1 ऑक्टोबरपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची महिती कंपनीने दिली आहे. कंपनी 23 सप्टेंबरपासून या फोनची विक्री सुरू करणार आहे. हा HMD फोन फक्त एका रंगात येतो आणि रंग म्हणजे Barbie गर्ल्सचा आवडता गुलाबी रंग. Pink Barbie Flip फोन सोबत कंपनी बॅटरी आणि इन-बॉक्स यूएसबी टाइप सी चार्जर देत आहे.
हेदेखील वाचा- Smartphone Tips: स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? ‘या’ खास टीप्स कायम लक्षात ठेवा
एचएमडीचा हा Pink Barbie Flip फोन दोन डिस्प्लेसह येतो. यात 2.8 इंचाचा QVGA मुख्य डिस्प्ले आहे. याशिवाय, फोनमध्ये 1.77 इंचाची QQVGA दुय्यम कव्हर स्क्रीन आहे. या फ्लिप स्मार्टफोनमध्ये Unisoc T107 प्रोसेसर उपलब्ध आहे. यात 64MB रॅम आणि 128MB स्टोरेज देण्यात आलं आहे, जे microSD कार्डद्वारे 32GB पर्यंत वाढवता येते.
हा फ्लिप स्मार्टफोन S30+ ऑपरेटिंग सिस्टम आणि बार्बी थीम असलेला यूजर इंटरफेससह येतो. फोनमध्ये आयकॉनिक Barbie पिंक शेड असलेला कीपॅड आहे. फोनमध्ये प्री-इंस्टॉल केलेला Malibu स्नेक गेमही देण्यात आला आहे. या फोनमध्ये 0.3MP रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये LED फ्लॅश लाइट उपलब्ध आहे.
HMD Barbie मध्ये 1,450mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये USB टाइप C चार्जिंग फीचर उपलब्ध असेल. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G, Bluetoot 5.0, 3.5mm ऑडिओ जॅक सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की फोनची बॅटरी एका चार्जवर 9 तासांचा सतत टॉकटाइम देते. त्यामूळे तुम्हाला जर लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील एचएमडीचा हा Pink Barbie Flip फोन तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. या फोनबाबत कंपनीने त्यांच्या X अकाऊंटवर देखिल पोस्ट केली आहे. अनेक युजर्सने या पोस्टवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.