स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? खास टीप्स कायम लक्षात ठेवा (फोटो सौजन्य - pinterest)
सध्या अनेक टेक कंपन्या विविध फीचर्स आणि नवीन अपडेट्ससह स्मार्टफोन लाँच करत आहेत. प्रत्येक स्मार्टफोनचे डिझाईन, कॅमेरा क्वालिटी, फीचर्स आणि अपडेट्स वेगवेगळे असतात. प्रत्येकाचा लूक वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकजण त्याच्या आवडीनुसार स्मार्टफोनची खरेदी करतो. हल्ली कमी बजेटमध्ये देखील दमदार फीचर्सवाले स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. ज्यामुळे लोकं त्यांना परवडणाऱ्या किंमतीत स्मार्टफोनची खरेदी करू शकतील.
हेदेखील वाचा- पुढे पोलीस आहे, हेल्मेट घाला! वाहतूकीच्या दंडापासून वाचण्यासाठी आता Google Map देणार सूचना
अनेकदा असं होतं की आपण स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर आपल्याला पश्चाताप होता. हा नाही दुसरा स्मार्टफोन खरेदी करायला पाहिजे होता, असं आपल्यााल वाटतं. तुमच्याबाबतीत देखील असचं होतं का? मग आता आम्ही तुम्हाला काही खास टीप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर तुम्हाला स्मार्टफोनची खरेदी करताना होणार आहे. या टीप्सचा वापर करून जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागणार नाही. कोणताही स्मार्टफोन खरेदी करताना प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज, परफॉर्मन्स, कॅमेरा क्वालिटी, बॅटरी लाइफ, डिझाइन, कनेक्टिव्हिटी आणि सॉफ्टवेअर अपडेट्स या गोष्टींबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं असतं. चला तर मग जाणून घेऊया काही खास टीप्स.
प्रोसेसर फोनचा वेग आणि मल्टीटास्किंग क्षमता निर्धारित करतो. तुम्ही गेमिंग किंवा हेवी ॲप्लिकेशन्स वापरत असाल तर तुम्ही हाय-एंड प्रोसेसर असलेला फोन निवडू शकता.
आजकाल, तुम्ही कमीत कमी 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेला फोन विकत घ्यावा, कारण त्याचा तुमच्या फोनच्या परफॉर्मन्स आणि डेटा स्टोरेज क्षमतेवर परिणाम होतो. तुमच्याकडे वापरण्यासाठी अधिक एप्लिकेशन आणि फाइल्स असल्यास, अधिक स्टोरेज आणि RAM असलेला फोन निवडा.
हेदेखील वाचा- रियल लाइफ टर्मिनेटर! डोळा काढला आणि लावला वायरलेस कॅमेरा, जाणून घ्या सविस्तर
कॅमेरा आज खूप महत्त्वाचा झाला आहे. तुम्हाला फोटोग्राफी आवडत असल्यास, कॅमेरा गुणवत्ता, लेन्स आणि मेगापिक्सेलकडे लक्ष द्या. मल्टिपल कॅमेरा सेटअप (वाइड-एंगल, मॅक्रो, टेलिफोटो) हा देखील चांगला पर्याय असू शकतो.
फोन खरेदी करताना, बॅटरी क्षमता आणि जलद चार्जिंग सपोर्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही दिवसभर फोन वापरत असाल, तर किमान 4000mAh क्षमतेचा फोन निवडा.
डिस्प्ले रिझोल्यूशन (फुल एचडी, 4K), स्क्रीन आकार आणि प्रकार (AMOLED, OLED) महत्वाचे आहेत. विशेषत: जर तुम्हाला ओटीटीची आवड असेल तर याची विशेष काळजी घ्या.
फोनची रचना, साहित्य (काच, धातू, प्लास्टिक) याकडेही लक्ष देणं गरजेचं आहेत. याशिवाय वॉटरप्रूफिंग (आयपी रेटिंग) देखील महत्त्वाचे आहे.
5G नेटवर्कचे युग सुरू आहे. अशा परिस्थितीत 5G सपोर्ट असलेल्या फोनला प्राधान्य द्या. ब्लूटूथ 5.0, NFC आणि Wi-Fi 6 सारखे इतर कनेक्टिव्हिटी पर्याय देखील लक्षात ठेवा.
फोन कंपनी किती लवकर आणि किती वेळा सॉफ्टवेअर अपडेट पुरवते ते देखील तपासा. सुरक्षा पॅच देखील तपासा.