Google Map Update: आता गुगल मॅप रस्त्याची रुंदीसुध्दा सांगणार, 8 शहरांमध्ये सुरू होतेय नवी सुविधा
ओला मॅप्स आणि गुगल मॅप्स यांच्यातील स्पर्धा प्रचंड वाढली आहे. या वाढत्या स्पर्धेदरम्यान आपले युजर्स टिकवून ठेवण्यासाठी आणि नवीन युजर्सना आकर्षित करण्यासाठी गुगल मॅप्स नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. गुगल मॅप्सने त्यांच्या सर्विसमध्ये एआय देखील अॅड केलं आहे, ज्यामुळे युजर्सना गुगल मॅपचा वापर करताना अधिक चांगला अनुभव येऊ शकतो. अशातच आता गुगल मॅपने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर सुरु केलं आहे. हे फीचर म्हणजे गुगल मॅप आता त्यांच्या युजर्सना रस्त्यांची रुंदी आणि पर्यायी मार्गांविषयी माहिती देणार आहे.
हेदेखील वाचा- Google Map Update: आता खोट्या फीडबॅकपासून युजर्सची होणार सुटका, गुगल मॅप घेऊन आलाय नवीन वॉर्निंग सिस्टम
गुगल मॅप्सचं हे फीचर 8 शहरांमध्ये सुरु करण्यात आलं आहे. या शहरांमध्ये हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोईम्बतूर, इंदूर, भोपाळ, भुवनेश्वर आणि गुवाहाटी यांचा समावेश आहे. हे फीचर आता तुमचा प्रवास सोपा करणार आहे. गुगल मॅप रस्त्यांची रुंदी देखील सांगणार आहे. रस्ता अरुंद झाल्यास, गुगल मॅप तुम्हाला सावध करेल आणि ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी पर्यायी मार्ग देखील देईल. उड्डाणपुलावरून प्रवास करायचा की नाही, गुगल मॅपचा ‘फ्लायओव्हर कॉलआउट’ हा गोंधळ दूर करेल. ही वैशिष्ट्ये स्थानिक भागीदारांच्या मदतीने ऑपरेट केली जातील. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगल मॅपचा नवोपक्रमाचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी आणि भारतातील गुगल मॅपचे भविष्य घडवण्यास गुगल मॅप उत्साहित आहे, असं मिरियम डॅनियल, महाव्यवस्थापक, गुगल मॅप, भारत यांनी ब्लॉगपोस्टमध्ये लिहिले. गुगल मॅपने विशेषतः भारतीय रस्त्यांसाठी AI मॉडेल विकसित केले आहे. रस्त्याच्या रुंदीचा अंदाज घेण्यासाठी, या मॉडेलमध्ये सेटेलाइट इमेजरी, रस्त्याचा प्रकार, इमारतींमधील अंतर, रस्त्याचा पक्का भाग यासारख्या माहितीचा समावेश आहे.
रस्त्याच्या रुंदीचा अंदाज वापरून, चारचाकी वाहनांना अरुंद रस्ते टाळण्यात मदत करण्यासाठी गुगल मॅपने AI राउटिंग अल्गोरिदम वाढवले आहे. वापरकर्त्यांना अरुंद मार्गांबद्दल सतर्क करण्यासाठी कंपनी “कॉलआउट वैशिष्ट्य” देखील अॅपमध्ये जोडत आहे.
हेदेखील वाचा- Google Map Update: गुगल मॅपवरून सुध्दा शेअर करू शकता तुमचं लाईव्ह लोकेशन, जाणून घ्या प्रोसेस
हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोईम्बतूर, इंदूर, भोपाळ, भुवनेश्वर आणि गुवाहाटी या आठ शहरांमध्ये गुगल मॅप्स हे वैशिष्ट्य सुरु करत आहे. सध्या हे फीचर केवळ अँड्रॉइड डिव्हाइसवर उपलब्ध आहे. लवकरच ही सुविधा iOS आणि इतर शहरांमध्ये देखील सुरु केली जाणार आहे. गुगल मॅपने रस्ते अपघातांची तक्रार करण्याची पद्धत सोपी केली आहे. वापरकर्ते आता फक्त काही टॅप्सने याची तक्रार करू शकतात.
गुगलने भारतातील गुगल मॅप आणि गुगल सर्च या दोन्हींवर ईव्ही चार्जिंग स्टेशनची माहिती उपलब्ध करून देण्याची घोषणाही केली आहे. गुगलने सांगितले की, आम्ही आठ हजाराहून अधिक चार्जिंग स्टेशन्ससाठी अधिकृत माहिती जोडण्यासाठी इलेक्ट्रिकपे, एथर आणि स्टॅटिक सारख्या भारतातील आघाडीच्या ईव्ही चार्जिंग प्रदात्यांशी सहयोग करत आहोत. ही पहिलीच वेळ आहे की गुगलने गुगल मॅपवर दुचाकींसाठी ईव्ही चार्जिंग स्टेशनची माहिती सादर केली आहे. ही सुविधा मिळविणारा भारत हा पहिला देश आहे.