Google Map Update: गुगल मॅपवरून सुध्दा शेअर करू शकता तुमचं लाईव्ह लोकेशन, जाणून घ्या प्रोसेस
गुगल मॅप तुम्हाला प्रत्येक प्रवासावेळी फायदेशीर ठरते. आता चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये लाईव्ह लोकेशन देखील शेअर करू शकता. येथे आम्ही गुगल मॅपवर तुम्हाला लाईव्ह लोकेशन करण्याच्या या पद्धतीबद्दल सांगणार आहोत. गुगल मॅपने आता काही नवीन फीचर्स अॅड केले आहेत. या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे लाईव्ह लोकेशन तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करू शकता. गुगल मॅप तुमच्या मित्र आणि कुटुंबियांना तुमच्या रिअल-टाइम लोकेशनबद्दल अपडेट राहण्याची परवानगी देते. हे वैशिष्ट्य लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हाट्सॲप सारखे कार्य करते.
हेदेखील वाचा- Google Map Update:गुगल मॅपच्या वॉकिंग मोड फीचरबद्दल माहीत आहे का? आता क्षणार्धात समजणार रस्ता
गुगल मॅप्स, जगातील सर्वात लोकप्रिय नेव्हिगेशन अॅप आहे. गुगल मॅपमध्ये अनेक लोकप्रिय फीचर्स देण्यात आले आहेत. परंतु यापैकी असे अनेक फीचर्स आहेत, जे युजर्सना माहीत नाहीत. आता आम्ही तुम्हाला गुगल मॅपच्या लोकेशन शेअरिंग फीचर्सबद्दल सांगणार आहोत. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या कुटूंबातील व्यक्तिंचं लोकेशन ट्रॅक करू शकता. तसेच तुम्ही तुमचं लोकशन देखील तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगलने आपल्या मॅपमध्ये लोकेशन शेअरिंगचा पर्याय दिला आहे ज्यामुळे तुमचे लोकेशन समोरच्या व्यक्तीसोबत शेअर करता येईल आणि जवळच्या लोकांचे लोकेशन तुम्हाला कळू शकेल. गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या कुटूंबातील व्यक्तिंचे लोकेशन ट्र्रक करू शकता. तुम्ही ट्रॅक करत असलेल्या व्यक्तीने परवानगी दिली असेल तर गुगल मॅपचं लोकेशन शेअरिंग फीचर वापरणं योग्य ठरतं. कारण एखाद्या व्यक्तीचं लोकेशन त्याच्या परवानगीशिवाय ट्रॅक करणं बेकायदेशीर आहे आणि गोपनीयतेचे उल्लंघन आहे.
हेदेखील वाचा- Google Map Update: आता इंटरनेटशिवाय करा गुगल मॅपचा वापर, तुमचं काम होईल अधिक सोपं! केवळ या स्टेप्स फॉलो करा
डिव्हाइसवर गुगल मॅप ओपन करा आणि ज्या वापरकर्त्याचे लोकेशन तुम्हाला ट्रॅक करायचे आहे त्याच्या नावावर टॅप करा. त्या युजर्सचे लाईव्ह लोकेशन त्वरित गुगल मॅपवर दर्शविले जाईल. याशिवाय तुम्ही युजरला देखील त्याचे लाइव्ह लोकेशन शेअर करण्यास सांगू शकता, त्यानंतर त्याचे लोकेशन ट्रॅक केले जाऊ शकते. तुमच्या मुलांचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी फॅमिली लिंकचीही मदत घेतली जाऊ शकते आणि हे फीचर कुटुंबातील सदस्यांना ट्रॅक करण्यासाठी उपयुक्त आहे.