भाऊबिजेच्या मुहूर्तावर आपल्या लाडक्या भावा - बहिणींना गिफ्ट करा हे भन्नाट स्मार्टफोन्स
सर्वत्र दिवाळीची तयारी सुरु झाली आहे. भावा बहिणीच्या नात्यासाठी दिवाळीच्या सणातील महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबिज. भाऊबिजेच्या दिवशी भाऊ – बहिण एकमेंकान गिफ्ट देतात. यंदाच्या दिवाळीत तुम्ही तुमच्या भावंडांना काही स्मार्टफोन्स गिफ्ट देऊ शकता, जी त्यांना रोजसाठी उपयोगी पडतील.
Xiaomi 15 सिरीज 29 ऑक्टोबर रोजी लाँच झाली आहे. या सिरीजसोबतच Snapdragon 8 Elite प्रोसेसर असलेला जगातील पहिला फोनही बाजारात आला आहे. हा Android स्मार्टफोनचा सर्वात शक्तिशाली चिपसेट आहे. Xiaomi 15 मध्ये 6.46-इंच 1.2K 120Hz OLED पॅनेल असण्याची अपेक्षा आहे. या सिरीजमध्ये प्रो आणि बेस असे दोन व्हेरिअंट लाँच केले जाणार आहेत. प्रो व्हेरियंटमध्ये मोठी स्क्रीन असू शकते. सीरिजमध्ये 5,500mAh बॅटरी असेल. जे 90W फास्ट आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. स्मार्टफोनमध्ये 320 मेगापिक्सेल कॅमेरा दिला जाऊ शकतो जो 8K व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.
हेदेखील वाचा-Google Map Update: आता गुगल मॅप रस्त्याची रुंदीसुध्दा सांगणार, 8 शहरांमध्ये सुरू होतेय नवी सुविधा
स्मार्टफोनमध्ये 5,400 mAh बॅटरी असणार आहे. स्मार्टफोनमध्ये 90W वायर्ड चार्जिंग तंत्रज्ञान आणि 50W वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. Xiaomi 15 फोटोग्राफीसाठी ट्रिपल Leica रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर, F/1.62 अपर्चरसह 50 मेगापिक्सेल (LYT 900) OIS सेन्सर देण्यात आला आहे. Xiaomi 15 1 TB स्टोरेजसह 16 GB रॅमवर लाँच करण्यात आला आहे. ह्या मोबाईलच्या टॉप व्हेरिएंटची किंमत सुमारे 65 हजार रुपये आहे. तर Xiaomi 15 ची किंमत सुमारे 52,900 रुपयांपासून सुरू होते ज्यामध्ये 12 GB रॅमसह 256 GB स्टोरेज उपलब्ध आहे.
नथिंग फोनची कम्युनिटी एडिशन (2a) आज 30 ऑक्टोबर रोजी जागतिक स्तरावर लाँच करण्यात आला आहे. नथिंग फोन (2a) कम्युनिटी एडिशनची किंमत सध्याच्या व्हेरियंट सारखीच असू शकते, जी बेस मॉडेलसाठी 23,999 रुपये आहे. फोनची एंट्री MediaTek Dimension 7200 Pro चिपसेटसह असू शकते. या फोनमध्ये 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले असेल. जे 1080 x 2412 रिझोल्यूशन आणि 120 Hz रिफ्रेश रेट देऊ शकतात.
हेदेखील वाचा-New Telecom Rules: Jio, Airtel आणि Vi युजर्स लक्ष द्या! TRAI ने वाढवली OTP ची डेडलाइन, या दिवशी लागू होणार नवे नियम
तसेच, त्याच्या डिस्प्लेमध्ये 1100 निट्सची एचबीएम ब्राइटनेस, 1300 निट्सची पीक ब्राइटनेस असेल. प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर हा आगामी फोन ऑक्टा कोर डायमेंसिटी 7200 प्रो चिपसेट सह येईल. फोटोग्राफीसाठी, यात 50 MP f/1.6 प्राथमिक कॅमेरा आणि 50 MP f/2.2 अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळू शकतो. तर, सेल्फीसाठी 32 MP f/2.2 फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल.
Honor Magic 7 सीरीज आज 30 ऑक्टोबरला लाँच करण्यात आली आहे. या सीरीजचे मुख्य आकर्षण म्हणजे कॅमेरा. यात 180MP पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स दिली जाऊ शकते. यात Qualcomm चा नवीन चिपसेट देखील असेल. फोनमध्ये पॉवरसाठी मोठी 5,600 mAh बॅटरी असेल. Honor चा पहिला फोन असेल जो लेटेस्ट चिपसेट सह येणार आहे. फ्लॅगशिप फोनमध्ये सुरक्षिततेसाठी अल्ट्रासोनिक इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येणार आहे. हे 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 80W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करू शकते.