फोटो सौजन्य - pinterest
Google आपल्या नेहमीच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. Google शिवाय आपलं कोणतंही कामं पूर्ण होणं कठीण आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी Google वर अवलंबून असतो असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही. जर लोकांना इंटरनेटवर काहीही शोधायचे असेल तर बहुतेक लोक Google चा वापर करतात. Google चे जगभरात लाखो युझर्स आहेत. Google हे सध्या जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. आतापर्यंत Google सोबत स्पर्धा करण्यासाठी कोणत्याही कंपनीने त्यांचं तगड सर्च इंजिन लाँच केलं नाही. पण आता chatGPT तयार करणाऱ्या OpenAI कंपनीने Google सोबत स्पर्धा करण्यासाठी एक नवीन सर्च इंजिन लाँच केलं आहे. SearchGPT असं OpenAI ने लाँच केलेल्या सर्च इंजिनच नाव आहे.
हेदेखील वाचा- AI फीचर्ससह HP ने लाँच केले दोन जबरदस्त लॅपटॉप! काय आहे किंमत जाणून घ्या
यापूर्वी OpenAI ने AI chatbot लाँच केलं होतं. जगभरात chatGPT ची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत गेली. chatGPT च्या यशानंतर अनेक कंपन्यांनी त्यांचे स्वत:चे AI लाँच केलं. OpenAI चे chatGPT हे जगातील पहिलं AI chatbot माॉडेलं आहे. OpenAI च्या chatGPT नंतर Google ने AI मॉडेल जेमिनी, मायक्रोसॉफ्टने AI मॉडेल Copilot, भारतीय कंपनी Ola ने AI मॉडेल Krutrim लाँच केलं. chatGPT च्या प्रचंड यशानंतर आता OpenAI कंपनीने Google सोबत स्पर्धा करण्यासाठी एक नवीन सर्च इंजिन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. SearchGPT असं OpenAI ने लाँच केलेल्या सर्च इंजिनच नाव आहे. आतापर्यंत Google सोबत स्पर्धा करण्यासाठी कोणत्याही कंपनीने सर्च इंजिन लाँच केलं नव्हतं. पण आता OpenAI Google सोबत स्पर्धा करणार आहे. त्यामुळे आता Google ला त्यांचे जुने युजर्स टिकवून ठेवण्यासाठी आणि नवीन युजर्स आकर्षित करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार आहे.
हेदेखील वाचा- Google सर्चचे ‘हे’ फीचर्स तुमचा अनुभव बनवतील अधिक मजेदार! आत्ताच ट्राय करा
SearchGPT मुळे अनेकांना एका नव्या सर्च इंजिनचा पर्याय मिळणार आहे. SearchGPT हे AI आधारित सर्च इंजिन आहे. त्यामुळे SearchGPT युजर्सना कोणत्याही प्रश्नाचं अचूक उत्तर शोधण्यासाठी कोणत्याही प्रश्नाविषयी माहिती शोधण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागणार नाही. SearchGPT त्यांच्या युजर्सना काही क्षणात माहिती उपलब्ध करून देणार आहे. सध्या हे सर्च इंजिन काही निवडक लोकांसाठी लाँच करण्यात आलं आहे. याची चाचणी पूर्ण झाल्यानंतर ते सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तसेच तुम्हाला या सर्च इंजिनची चाचणी घ्यायची असेल, तर तुम्ही कंपनीने जारी केलेल्या वेटलिस्टमध्ये सहभागी होऊ शकता.
याबाबत Open AI ने म्हटलं आहे की, आम्ही सध्या या नवीन सर्च इंजिन SearchGPT ची चाचणी करत आहोत. हा नवीन AI फीचर्सचा प्रोटोटाइप आहे, जो वापरकर्त्यांना कोणत्याही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आणि त्याचा स्रोत फार कमी वेळात सांगेल. यामुळे युजर्सचा वेळ वाचणार आहे. आम्ही सध्या हे सर्च इंजिन काही निवडक लोकांसाठी लाँच केलं आहे, जे या शोध इंजिनचा वापर करून आम्हाला फीडबॅक देतील. या फीडबॅकच्या मदतीने आम्ही सर्च इंजिन ChatGPT सोबत कनेक्ट करू शकू.