Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone च्या खरेदीसाठी रांगेत उभं राहून कंटाळलात? Blinkit वरून करा ऑर्डर, 10 मिनिटांत मिळेल iPhone ची डिलीवरी

ब्लिंकिट 10 मिनिटांत iPhone 16 तुमच्या घरी पोहोचेल. ब्लिंकिटचे संस्थापक अलबिंदर धिंडसा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. ब्लिंकिट आपल्या ग्राहकांना iPhone 16 डिलिव्हर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ब्लिंकिटने दावा केला आहे की iPhone 16 विक्री सुरू झाल्यानंतर काही तासांतच 300 iPhone विकले गेले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 22, 2024 | 10:05 PM
iPhone च्या खरेदीसाठी रांगेत उभं राहून कंटाळलात? Blinkit वरून करा ऑर्डर, 10 मिनिटांत मिळेल iPhone ची डिलीवरी

iPhone च्या खरेदीसाठी रांगेत उभं राहून कंटाळलात? Blinkit वरून करा ऑर्डर, 10 मिनिटांत मिळेल iPhone ची डिलीवरी

Follow Us
Close
Follow Us:

Apple ने 9 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या मेगा इव्हेंटमध्ये iPhone 16 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोन्सची विक्री सुरु झाली आहे. भारतासह जगभरात ह्या फोनच्या खरेदीसाठी लोक गर्दी करत आहेत. iPhone बद्दल लोकांमध्ये असणाऱ्या क्रेझबद्दल काही वेगळ सांगण्याची गरज नाही. iPhone सध्या एक स्टेटस सिम्बॉल बनला आहे. त्यामुळे आपल्याकडे iPhone असावा असं प्रत्येकाला वाटतं. ह्याच वृत्तीमुळे iPhone च्या खरेदीसाठी पहिल्याच दिवशी हजारो लोकांनी मुंबई आणि दिल्लीतील Apple स्टोअर्समध्ये गर्दी केली होती.

हेदेखील वाचा- Apple iPhone 16 ची क्रेझ, खरेदीसाठी सलग 21 तास रांगेत उभा राहिला, या व्यक्तिने खरेदी केला मुंबईतील पहिला आयफोन 16

पण 20 ते 22 तास गर्दीत उभं राहण प्रत्येकाला शक्य होत नाही. हीच समस्या लक्षात घेत आता लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट ब्लिंकिट 10 मिनिटांत iPhone 16 तुमच्या घरी पोहोचेल. ब्लिंकिटचे संस्थापक अलबिंदर धिंडसा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट करत असा दावा केला आहे. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)

Get the all-new iPhone 16 delivered in 10 minutes!

We’ve partnered with @UnicornAPR for the third year in a row, bringing the latest iPhone to Blinkit customers in Delhi NCR, Mumbai, Pune, Bengaluru (for now) — on launch day!

P.S – Unicorn is also providing discounts with… pic.twitter.com/2odeJPn11k

— Albinder Dhindsa (@albinder) September 20, 2024

ब्लिंकिटचे संस्थापक अलबिंदर धिंडसा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट ब्लिंकिट तुम्हाला फक्त 10 मिनिटांत डिलीवरी करेल. दिल्ली एनसीआर, पुणे, बेंगळुरू आणि मुंबईतील ग्राहकांना लवकरात लवकर नवीन आयफोन मिळावा यासाठी आमचा हा उद्देश आहे. ग्राहक ब्लिंकिट वरून iPhone 16 खरेदी करू शकतात ज्यात अतिरिक्त ऑफर समाविष्ट आहेत. तात्काळ डिस्काऊंट तसेच युनिकॉर्न ऑफर करत असलेल्या EMI पर्यायांसह ग्राहकांना iPhone 16 खरेदीवर अनेक ऑफर्स मिळणार आहेत.

ब्लिंकिट आपल्या ग्राहकांना iPhone 16 डिलिव्हर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. कंपनी iPhone 14 सीरीज युनिकॉर्नशी संबंधित आहे. ब्लिंकिटने दावा केला आहे की iPhone 16 विक्री सुरू झाल्यानंतर काही तासांतच 300 iPhone विकले गेले. मजेदार गोष्ट म्हणजे iPhone 16 ची खरेदी करण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका व्यक्तिने देखील ऑनलाईन iPhone 16 ऑर्डर केला होता. या संबंधित एक पोस्ट देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत होती.

हेदेखील वाचा- Amazon-Flipkart Festive Sale: अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या सेलमधून खरेदी करताना काळजी घ्या, एक चुकीचं क्लिक आणि होईल लाखोंच नुकसान

Apple ने 9 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या मेगा इव्हेंटमध्ये जगभरातील नवीनतम फोन iPhone 16 सिरीज लाँच केली. कंपनीने या मालिकेतील 4 फोन लाँच केले आहेत. iPhone 16 सिरीजमध्ये iPhone 16 (बेस मॉडेल), iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max यांचा समावेश आहे. या फोनची विक्री भारतात देखील सुरु झाली आहे. Apple iPhone 16 खरेदी करण्यासाठी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील Apple Store ला भेट देणारे गुजरातचा उज्ज्वल शाह पहिले व्यक्ती ठरले. ॲपलचा नवीन आयफोन घेण्यासाठी उज्ज्वल शाह यांनी अहमदाबाद ते मुंबई असा प्रवास केला.

iPhone 16 Pro अनेक उत्कृष्ट रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात गडद काळा टायटॅनियम, ब्राइट व्हाइट टायटॅनियम, नॅचरल टायटॅनियम आणि न्यू डेझर्ट टायटॅनियम यांचा समावेश आहे. iPhone 16 मधील बॅटरी बॅकअप इतर iPhones पेक्षा चांगला आहे. भारतात iPhone 16 ची किंमत 79,900 रुपये आहे. iPhone 16 Plus ची किंमत 89,900 रुपये आहे. iPhone 16 Pro ची सुरुवातीची किंमत 1,19,900 रुपये आहे आणि iPhone 16 Pro Max ची किंमत 1,44,900 रुपये आहे.

Web Title: Order your iphone from blinkit and get delivery in 10 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 10:05 PM

Topics:  

  • iPhone 16

संबंधित बातम्या

घाई करा! केवळ ‘इतक्या’ हजारांत व्हा iPhone चे मालक; Flipkart च्या सेलमध्ये बंपर डिस्काउंट, पहा ऑफर्स
1

घाई करा! केवळ ‘इतक्या’ हजारांत व्हा iPhone चे मालक; Flipkart च्या सेलमध्ये बंपर डिस्काउंट, पहा ऑफर्स

iPhone 16 Pro Max झाला स्वस्त! पटापट करा ऑर्डर, दवडू नका संधी; तुम्हीही व्हा पॉवरफुल
2

iPhone 16 Pro Max झाला स्वस्त! पटापट करा ऑर्डर, दवडू नका संधी; तुम्हीही व्हा पॉवरफुल

प्रेमासाठी आयुष्याचा मांडला खेळ! गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी तरुणाने चक्क आपली किडनी विकली; Video Viral
3

प्रेमासाठी आयुष्याचा मांडला खेळ! गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी तरुणाने चक्क आपली किडनी विकली; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.