Amazon-Flipkart ने सणाच्या सेलची घोषणा केली आहे. 27 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12 पासून ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु होणार आहे. ॲमेझॉनच्या या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर भरघोस सूट देण्यात येणार आहे. ॲमेझॉनच्या प्राईम मेंबर्ससाठी हा सेल एक दिवस आधीच सुरु होणार आहे. त्यामुळे आता ग्राहक फार कमी किमतीत नवी दमदार उत्पादने खरेदी करू शकतात. ॲमेझॉनचा हा सेल 27 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12 पासून लाइव्ह होणार आहे.
हेदेखील वाचा- तरूणाईच्या मनावर राज्य करणारा ShreeMan Legend आहे तरी कोण? सोशल मिडीयावरील फॉलोवर्स ऐकूण बसेल धक्का
Amazon च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही या सेलचा लाभ घेऊ शकता. Amazon Great India Festival Sale साठी 3 नवीन फीचर्स सादर करण्यात आली आहेत. या फीचर्समध्ये Amazon Marketplace, Rufus AI असिस्टंटसपोर्ट आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायंसेसाठी इन्स्टॉलेशन आणि एक्सचेंज सपोर्ट यांचा समावेश आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट देखील आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन बंपर सेल घेऊन येत आहे. लवकरच फ्लिपकार्टचा फेस्टिव्ह सेल सुरू होणार आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल महिन्याच्या शेवटी म्हणजेच 30 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सेलमध्ये ॲपलचा iPad 9 वी जनरेशन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. कंपनीने ते 32,900 रुपयांना लाँच केले होते, जे आता 29,900 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. (फोटो सौजन्य – pinterest)
सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट आणि मोबाइल ॲक्सेसरीजसह अनेक उत्पादनांवर चांगली सूट दिली जाईल. अशा स्थितीत स्वस्तात खरेदी करण्याची सर्वांनाच घाई असते. मात्र अशा घाईत डीलमध्ये नुकसान होऊ नये असे वाटत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण घाईत तुम्ही काही चुका करू शकता ज्यामुळे तुमचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते.
हेदेखील वाचा- फक्त 7 रुपयांत तुम्हाला मिळणार फास्ट इंटरनेट आणि कॉलिंग, BSNL च्या नवीन प्लॅनमुळे Jio, Airtel चं टेन्शन वाढलं
लोक महिनोनमहिने ऑनलाइन विक्रीची वाट पाहतात, याच कारण म्हणजे फक्त उत्तम बचत शोधण्यासाठी. अशा स्थितीत खरेदी करताना फसवणूक झाली तर यापेक्षा वाईट काय असेल? त्यामुळे सणासुदीच्या काळात खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.