Apple iPhone 16 ची क्रेझ, खरेदीसाठी सलग 21 तास रांगेत उभा राहिला, या व्यक्तिने खरेदी केला मुंबईतील पहिला आयफोन 16
भारतात आयफोनची क्रेझ किती वाढली आहे हे काही वेगळं सांगायला नको. भारतातच नाही तर परदेशातसुध्दा लोकांना आयफोनचे क्रेझ आहे. आयफोन लाँच होताच तो खरेदी करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. आयफोनच्या खरेदीसाठी लोकं 20 ते 23 तास रांगेत उभं राहून वाट पाहत असतात. सोशल मिडीयावर एक व्हिडीओ देखील व्हायरल होत ज्यामध्ये तुम्ही आयफोन खरेदीसाठीची लोकांची क्रेझ पाहू शकता.
हेदेखील वाचा- टेक क्षत्रातील दिग्गज आहे भारतीय तरूणाचा फॅन! iPhone च्या आइडियामुळे बदललं आयुष्य
Apple iPhone 16 भारतात लाँच झाला आहे. लोक त्यांच्या स्वप्नातील फोन घेण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहत असल्याचं पाहायला मिळत आहे. ॲपल आयफोनचा असाच एक चाहता आहे गुजरातचा उज्ज्वल शाह. आपला आवडता iPhone-16 घेण्यासाठी तो 21 तास रांगेत उभा राहिला. Apple iPhone 16 खरेदी करण्यासाठी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील Apple Store ला भेट देणारे ते पहिले व्यक्ती ठरले.
ॲपलचा नवीन आयफोन घेण्यासाठी उज्ज्वल शाह यांनी अहमदाबाद ते मुंबई असा प्रवास केला. त्यांनी सांगितले की, मी खूप उत्साहित आहे. मी 21 तासांपासून इथे उभा आहे. Apple स्टोअरमध्ये जाणाऱ्या रांगेत मी पहिला आहे. iPhone 16 मध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत. iPhone 16 खरेदी करण्यासाठी मी प्रचंड उत्साहित आहे. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)
नोएडा येथील व्यावसायिक सिंगर सहज अंबावत हा दिल्ली-एनसीआरमध्ये iPhone 16 सिरीज खरेदी करणारा पहिला व्यक्ती ठरला आहे. त्याने Desert Titanium variant मध्ये 256GB स्टोरेजसह iPhone 16 Pro खरेदी केला, ज्याची किंमत 1.3 लाख रुपये होती, परंतु कॅशबॅक ऑफरमुळे तो 1.25 लाख रुपयांमध्ये डिव्हाइस मिळवू शकला. संगीतकार या नात्याने सहजने नवीन फोनबद्दल उत्सुकता व्यक्त केली, विशेषत: ऑडिओ मिक्स वैशिष्ट्याबाबत त्याने सांगितलं. त्याच्या गाण्याच्या व्हिडीओजचा दर्जा वाढवण्यासाठी ह्या फोनचे फीचर्स उपयुक्त ठरतील असा विश्वास त्याने व्यक्त केला. तो म्हणाला की, ऑडिओ मिक्स वैशिष्ट्य माझ्यासाठी खरोखर उपयुक्त आहे, विशेषत: रेकॉर्डिंग करताना.हे वैशिष्ट्य माझ्या संगीताची गुणवत्ता सुधारेल.
हेदेखील वाचा- भारतात लाँच होण्यापूर्वीच iPhone 16 चे फिचर्स आणि किंमत आली समोर! वाचा किती स्वस्त असेल नवीन iPhone?
iPhone 16 Pro चा कॅमेरा देखील उत्तम आहे, ज्यात 48MP फ्यूजन कॅमेरा आहे. यात सेकंड जनरेशन क्वाड-पिक्सेल सेन्सर आणि झिरो शटर लॅग आहे. नवीन 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 120mm फोकल लेंथसह 5x टेलीफोटो लेन्स फोटोग्राफिक क्षमता वाढवतात. कॅमेरा कंट्रोल करताना, अचूक शॉट कॅप्चर करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यासह प्रत्येक फोटो छान दिसेल.