फोटो सौजन्य - POCO (X account)
टेक कंपनी Poco ने अलीकडेच POCO F6 Deadpool आणि Wolverine Limited Edition स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केले आहेत. यासोबतच आता कंपनी 1 ऑगस्ट रोजी आणखी एक नवीन प्रोडक्ट लाँच करण्याच्या तयारीत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये POCO M6 Plus 5G लाँच करण्याची योजना आखत आहे. POCO M6 Plus 5G सोबतच 1 ऑगस्ट रोजी Poco Buds X1 देखील लाँच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. Poco Buds X1 च्या लाँचिंगबाबत एक टीझर जारी करण्यात आला आहे. या टीझरमध्ये इअरबड्स पांढऱ्या रंगाचे दाखविण्यात आले आहेत.
हेदेखील वाचा- ऑगस्टमध्ये लाँच होणार आहेत ‘हे’ स्मार्टफोन्स! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Poco Buds X1 मुळे युजर्सना चांगला ऑडिओ अनुभवता येणार आहे. यामध्ये ऑडिओ क्वालिटीची विशेष काळजी घेण्यात आली आहे. Buds X1 ही POCO कडून भारतीय बाजारात येणारी TWS इयरबडची दुसरी जोडी असेल. ब्रँडने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारतात POCO Pods इयरबड्स लाँच केले होते. बड्स X1 प्रमाणे, POCO Pods मध्ये देखील इन-इअर डिझाइन आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात 12mm ऑडिओ ड्रायव्हर आणि ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी आहे. चांगल्या ऑडिओ गुणवत्तेसाठी हे SBC कोडेकला सपोर्ट करते. फास्ट पेअरिंगसाठी हे Google Fast Pair ला सपोर्ट करते.
हेदेखील वाचा- टेलिकॉम कंपन्यांचे पूर्वीचे रिचार्ज प्लॅन पुन्हा सुरु होणार? TRAI मे मांडला एक खास प्रस्ताव
Google Fast Pair मुळे इअरबड्स फोनला सहज कनेक्ट करता येतात. यामध्ये एएनसीची सुविधा नाही कॉल दरम्यान पार्श्वभूमी आवाज कमी करण्यासाठी ENC उपलब्ध असेल. Poco Pods ला IPX4 रेटिंग आहे, ज्यामुळे ते स्प्लॅश-प्रतिरोधक बनतात. इअरबड्सची 34mAh बॅटरी एका चार्जवर 5 तासांपर्यंत प्लेबॅक प्रदान करते आणि चार्जिंग केसची 440mAh बॅटरी 30 तासांपर्यंत बॅकअप पॉवर प्रदान करते. जलद चार्जिंग फीचर 10-मिनिटांच्या चार्जवर 90 मिनिटांपर्यंत संगीत प्लेबॅक देते. या सर्व फीचर्समध्ये अपडेट करून Poco Buds X1 लाँच केले जाणार आहेत. Poco युजर्स अत्यंत आतुरतेने Poco Buds X1 ची वाट बघत आहेत. कंपनी लवकरच Poco Buds X1 च्या फीचर्सबाबत घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. फीचर्स अद्याप समोर आले नसले तरी Poco Buds X1 चे डिझाईन अतिशय उत्कृष्ट असल्याची माहिती समोर आली आहे.