फोटो सौजन्य - सोशल मिडीया
काही वेळा आपल्याला फक्त अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा पाहिजे असते. पण कंपन्यांच्या नवीन टॅरिफ प्लॅनमुळे ग्राहकांना कंपनीचा संपूर्ण रिचार्ज प्लॅन विकत घ्यावा लागत आहे, ज्यामध्ये इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि OTT प्लॅटफॉर्मची सुविधा दिली जाते. अशा परिस्थितीत, अनेक वापरकर्त्यांना इंटरनेट डेटा आणि OTT प्लॅटफॉर्मची आवश्यकता नाही. त्यांना फक्त अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसच्या सुविधेची गरज आहे, परंतु तरीही त्यांना या सर्व फायद्यांसह योजना खरेदी कराव्या लागतात. त्यामुळे ग्राहकांचे अनावश्यक पैसे वाया जातात. त्यामुळे आता ग्राहकांचा विचार करता दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने एक प्रस्ताव सादर केला आहे, ज्या अंतर्गत युजर्स जुन्या काळाप्रमाणे फक्त व्हॉईस कॉल आणि एसएमएस योजनेचा लाभ घेऊ शकतील.
हेदेखील वाचा- कसा होतो ऑनलाईन फ्रॉड? ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी ‘या’ टीप्स फॉलो करा
भारतातील जवळजवळ सर्व टेलिकॉम कंपन्या त्यांच्या बहुतेक योजनांमध्ये इंटरनेट डेटावर लक्ष केंद्रित करतात. जरी युजर्सना इंटरनेट डेटाची आवश्यकता नसली तरीही, त्यांच्या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा समाविष्ट असतो. एखादा युजर इंटरनेट डेटा वापरत नसला तरीही त्याला अतिरिक्त पैसे मोजावे लागतात या कारणास्तव TRAI ने आता एक नवीन प्रस्ताव सादर केला आहे, ज्या अंतर्गत दूरसंचार कंपन्यांना जुन्या रिचार्ज प्लॅनप्रमाणे फक्त व्हॉईस कॉल आणि एसएमएससह योजना सुरू करण्यास सांगितले आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना महागड्या रिचार्ज प्लॅनसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
हेदेखील वाचा- Vodafone-idea युजर्सना दिलासा! कपंनीने सर्वात स्वस्त प्लॅनची केली घोषणा
TRAI ने यासाठी सल्लापत्र जारी केले आहे. TRAI ने टेलिकॉम कंझ्युमर प्रोटेक्शन रेग्युलेशन 2012 च्या पुनरावलोकनावर हे सल्ला पत्र जारी केलं आहे. TRAI ने या प्रस्तावावर आपल्या भागधारकांचे मत मागवले आहे. TRAI चा हा प्रस्ताव सामान्य वापरकर्त्यांसाठी एक मोठे पाऊल ठरू शकतो. आता TRAI चा हा प्रस्ताव मंजूर झाल्यास त्याचा सर्वसामान्य ग्राहकांना मोठा फायदा होऊ शकतो. सामान्य लोकांना रिचार्ज प्लॅनसाठी खूप पैसे खर्च करावे लागतात.
अलिकडेच देशभरातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या jio, airtel आणि vi यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केली. JIO ने त्यांच्या प्रीपेड टॅरिफ प्लॅनच्या किमतींमध्ये सुमारे २२ टक्के दरवाढ केली आहे. JIO नंतर टेलिकॉम कंपनी Airtel ने देखील त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. Airtel ने मोबाईल टॅरिफ प्लॅनमध्ये १० ते २१ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. Airtel ने प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. JIO – Airtel नंतर टेलिकॉम कंपनी Vodafone-idea ने देखील डेटा प्लॅन्सच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. Vodafone-idea ने त्यांच्या प्रिपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सच्या किंमती ११ ते २३ टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपन्यांच्या वाढत्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतींमुळे ग्राहकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या वाढत्या रिचार्ज प्लॅनच्या काळात TRAI चा हा प्रस्ताव सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे.