Pova 6 Neo 5G स्मार्टफोन या दिवशी होणार लाँच! AI फीचर्स आणि 108MP कॅमेऱ्याने सुस्सज (हेदेखिल वाचा - tecno)
लोकप्रिय कंपनी टेक्नोने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. जबरदस्त AI फीचर्स आणि पावरफुल कॅमेऱ्यासोबत हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. Tecno Pova 6 Neo असं या नवीन स्मार्टफोनचं नाव आहे. Tecno Pova 6 Neo चा 5G स्मार्टफोन आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वी Tecno Pova 6 Neo स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच केला होता. त्यानंतर येत्या काही दिवसातच हा फोन भारतात लाँच केला जाणार आहे. कंपनीने स्मार्टफोनच्या लाँच डेटसह काही स्पेसिफिकेशन्स देखील उघड केले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 108MP कॅमेरा आणि AI फीचर्स असेल.
हेदेखिल वाचा –Airtel ने लाँच केला स्पेशल फेस्टिव्ह प्लॅन, OTT सारखे फायदे आणि अतिरिक्त डेटा उपलब्ध
स्मार्टफोन निर्माता कंपनी Techno ने Pova 6 Neo 5G स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली आहे. याबाबतचे तपशील बरेच दिवस येत होते. आता कंपनीने या फोनच्या लॉन्च डेट आणि काही स्पेक्सची अधिकृत माहिती जाहीर केली आहे. हा फोन पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार आहे. यामध्ये AI फीचर्स देखील देण्यात येणार आहेत. या फोनचा 4G प्रकार काही महिन्यांपूर्वी जागतिक स्तरावर लाँच करण्यात आला होता.
आता त्याचा 5G वर्जन भारतात लाँच केला जाणार आहे. टेक्नो हा फोन पोवा सीरीज अंतर्गत आणत आहे. Pova 6 Neo 5G स्मार्टफोन 11 सप्टेंबर रोजी भारतात लाँच होणार आहे. Pova 6 Neo 5G स्मार्टफोन तुम्ही ॲमेझॉन आणि कंपनीच्या साइटवरून खरेदी करू शकाल. त्याची किंमत केवळ बजेट विभागातच राहण्याची अपेक्षा आहे. Techno ने Pova 6 Neo 5G बद्दल जास्त माहिती दिलेली नाही. Tecno Pova 6 Neo 2024 च्या पहिल्या सहामाहीत 4G सह जागतिक बाजारपेठेत लाँच करण्यात आले. अशा परिस्थितीत, असे अपेक्षित आहे की त्याचे काही वैशिष्ट्य अलीकडे लाँच झालेल्या फोन्ससारखे असू शकतात.
Techno ने पुष्टी केली आहे की Pova 6 Neo 5G स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर 108MP AI कॅमेरा असेल. कॅमेरा सेटअपमध्ये 3x लॉसलेस इन-सेन्सर झूम देखील समाविष्ट असेल. यामध्ये AI फीचर्सचे कॉम्बिनेशनही पाहायला मिळणार आहे. या वैशिष्ट्यांमध्ये AI कट आउट, एएसके AI आणि AI मॅजिक इरेजरचा समावेश असेल. याच्या मागील पॅनलवर 50MP मुख्य कॅमेरा आणि मागील बाजूस 8MP सेन्सर आहे. स्मार्टफोनच्या 5G प्रकारात 108MP प्राथमिक कॅमेरा असल्याची पुष्टी झाली आहे.
हेदेखिल वाचा –AI धोकादायक आहे? ChatGPT च्या माजी कर्मचाऱ्याने केला धक्कादायक खुलासा
Tecno Pova 6 Neo मध्ये 6.78-इंचाचा FHD+ 120Hz डॉट डिस्प्ले आहे. हे Mediatek Helio G99 Ultimate SoC सह येते.
Tecno Pova 6 Neo मध्ये शक्तिशाली 7,000mAh बॅटरी समाविष्ट आहे आणि ती Android वर कार्य करते.
4G प्रकारातील इतर वैशिष्ट्यांमध्ये वायफाय, एनएफसी, जीपीएस, फिंगरप्रिंट सेन्सर यांचा समावेश आहे. Pova 6 Neo 5G मध्ये देखील या फीचर्सचा समावेश असणार आहे.