फोटो सौजन्य - Pinterest
सध्या ट्रेंडींग मध्ये असणारी गोष्ट म्हणजे AI. स्मार्टफोन, लॅपटॉप, WhatsApp, Gmail , Instagram, तंत्रज्ञान क्षेत्र, वैज्ञानिक क्षेत्र, सर्वत्र AI ने जादू केली आहे. आपण देखील आपल्या छोट्या छोट्या कामसाठी AI चा वापर करतो. माहिती शोधणं, प्रोजेक्ट पूर्ण करणं, Gmail करणं, सर्वत्र AI चा वापर केला जात आहे, पण सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात वापरलं जाणार AI खरंच धोकादायक आहे का? याबाबत आतापर्यंत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. AI म्हटलं कि पाहिलं नाव आठवत ते म्हणजे ChatGPT. आता या सर्व प्रश्नांवर ChatGPT च्या माजी कर्मचाऱ्याने खुलासा केला आहे. AI खरचं धोकादायक आहे का, याबाबत या कर्मचाऱ्याने पत्र लिहिलं आहे.
हेदेखिल वाचा –Dolly Chaiwala ची कमाई वाचून बसेल धक्का! एका ईव्हेंटसाठी घेतो तब्बल इतके पैसे
ChatGPT जगातील पहिलं AI चॅटबोट आहे. OpenAI ने 2022 मध्ये ChatGPT लाँच केल्यानंतर अनेक कंपन्यांनी त्यांचे स्वत:चे चॅटबोट लाँच केले. पण तरिही लोकांमध्ये ChatGPT ची क्रेझ कायम आहे. ChatGPT च्या मदतीने आपली अनेक कामं सहज शक्य होतात. ChatGPT चा वाढता वापर पाहता कंपनी त्यांच्या युजर्ससाठी नवनवीन अपडेट लाँच करण्याच्या तयारीत आहे. OpenAI ने विकसित केलेलं ChatGPT एक अतिशय लोकप्रिय कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली बनली आहे.
पण हे ChatGPT तुमच्या साठी धोकादायक ठरू शकत, हे तुम्हाला माहित आहे का? अलीकडे, टेक कंपन्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, ज्यामध्ये AI ला देखील काही प्रमाणात जबाबदार आहे. कारण AI च्या वापरामुळे लोकांच्या नोकऱ्या जाणार अशी शक्यता आधीच वर्तवली जात होती. अशातच ChatGPT च्या माजी कर्मचाऱ्याने पत्राद्वारे एक खुलासा केला आहे. या माजी कर्मचाऱ्याने खुल्या पत्रात AI चे धोके उघड केले आहेत.
हेदेखिल वाचा –AI ईमेज ओळखणं झालंय कठीण! ‘या’ सोप्या टीप्स तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर
AI जितकं फायदेशीर आहे तितकेच त्याचे धोके देखील वाढणार आहेत, असं या कर्मचाऱ्याने पात्रात सांगितलं आहे. AI च्या फायद्यांबद्दल बोलताना त्याने सांगितलं कि, AI च्या मदतीने वैद्यकीय क्षेत्रात अनेक मोठे फायदे होऊ शकतात. त्याच वेळी, तंत्रज्ञान अधिक प्रगत करण्यासाठी AI देखील वापरला जाऊ शकतो. स्मार्टफोन, लॅपटॉप, WhatsApp, Gmail , Instagram, तंत्रज्ञान क्षेत्र, वैज्ञानिक क्षेत्र, सर्वत्र AI चा वापर केला जात आहे. पण या फायद्यांसोबतच AI मुळे नुकसान देखील होऊ शकतं.
AI मुळे उद्भवलेल्या धोक्यांबद्दल बोलताना ChatGPT च्या माजी कर्मचाऱ्याने पत्रात म्हटलं आहे की, अनेक लोक AI च्या वाढत्या विस्तारामुळे चिंतेत आहेत. याशिवाय, AI सामाजिक असमानता वाढवू शकते. याशिवाय, AI बनावट बातम्यांचा प्रचार देखील करू शकते. त्याच वेळी, AI वरून नियंत्रण काढून टाकल्यानंतर ते मानवांसाठी एक मोठा धोका असल्याचे सिद्ध होऊ शकते.
कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने पत्रात लिहिले आहे की AI कंपन्या, तज्ञ आणि जगभरातील सरकारांना AI मुळे निर्माण होणारे धोके माहित आहेत. सध्या AI नियंत्रित करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही, जी काही काळानंतर मोठा धोका बनू शकते. सुरक्षित AI तयार करण्यासाठी कंपन्या, शास्त्रज्ञ आणि सरकार या सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. यामुळे AI मुळे होणारे धोके टळतील. ChatGPT आणि जेमिनी हे लोकप्रिय जनरेटिव्ह AI आहेत जे मानवांचे काम खूप सोपे करत आहेत. परंतु ते मानवी काम खूप वेगाने शिकत आहेत जे भविष्यात मानवी रोजगारासाठी मोठा धोका असेल.