Airtel ने लाँच केला स्पेशल फेस्टिव्ह प्लॅन, OTT सारखे फायदे आणि अतिरिक्त डेटा उपलब्ध (फोटो सौजन्य - pinterest)
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Airtel ने त्यांच्या ग्राहकांसाठी खास फेस्टिव्ह स्पेशल प्लॅन लाँच केला आहे. Airtel ने यूजर्ससाठी तीन नवीन प्रीपेड प्लान लाँच केले आहेत. Airtel च्या या नव्या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे ओटीटी फायद्यांसोबतच त्यात अतिरिक्त डेटाही उपलब्ध आहे. या तिन्ही योजनांची वैधता मर्यादित काळासाठी आहे.
हेदेखिल वाचा –स्मार्टफोनच्या वापरामुळे वाढतोय Brain Cancer चा धोका? WHO च्या अहवालाने सांगितलं सत्य
सुरुवातीच्या प्लॅनची किंमत 979 रुपये आहे, तर दुसऱ्या प्लॅनची किंमत 1029 रुपये आहे आणि शेवटचा Airtel चा सर्वात महागडा प्लॅन आहे. त्याची किंमत 3599 रुपये आहे. हे तिन्ही प्लॅन Airtel यूजरसाठी फायदेशीर ठरणार आहेत. सणासुदीचा काळ लक्षात घेऊन हे विशेष प्लॅन मर्यादित काळासाठी लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये, सामान्य योजनेच्या तुलनेत बरेच अतिरिक्त फायदे उपलब्ध आहेत. जसे की OTT स्ट्रीमिंग सेवा आणि अतिरिक्त डेटा.
Airtel च्या पहिल्या फेस्टिव्ह स्पेशल प्लानची किंमत 979 रुपये आहे. यामध्ये यूजर्सना दररोज 2 जीबी डेटा उपलब्ध करून दिला जातो. Airtel च्या या प्लॅनमध्ये 22+ OTT सबस्क्रिप्शन 84 दिवसांच्या वैधतेसाठी उपलब्ध आहे. यामध्ये Airtel यूजर्सना 10 GB अतिरिक्त डेटा मिळतो. ज्याची वैधता 28 दिवस आहे. कमी पैशात Airtel चा हा प्लॅन युजर्ससाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
हेदेखिल वाचा –मित्रमैत्रिणींना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत? मग अशाप्रकारे डाउनलोड करा whatsapp स्टिकर्स
Airtel च्या दुसऱ्या प्लॅनची किंमत 1029 रुपये आहे. Airtel च्या या खास प्लॅनमध्ये युजर्ससाठी दररोज 2 जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. यामध्ये 22+ OTT सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. यामध्ये, 28 दिवसांच्या वैधतेसाठी 10 GB डेटा आणला जातो.
Airtel च्या तिसऱ्या आणि सर्वात महागड्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, 3,599 रुपयांचा हा प्लान दीर्घकालीन वापरकर्त्यांसाठी आणण्यात आला आहे. यामध्ये दररोज अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 2 जीबी डेटा आणला जातो. त्याची वैधता 365 दिवस आहे. प्लॅनमध्ये 22+ OTT ऍक्सेस Xstream प्रीमियम द्वारे 28 दिवसांच्या वैधतेसह आणि 10GB डेटा कूपन देखील समाविष्ट आहे.
Airtel ने स्पष्ट केले आहे की हे प्रीपेड प्लॅन फेस्टिव्हल ऑफर आहेत आणि फक्त सहा दिवसांसाठी आहेत, जे 6 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2024 पर्यंत उपलब्ध असतील. त्यामुळे यूजर्सना 6 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2024 या कालावधीत कंपनीच्या या नवीन प्लॅनचा लाभ घेता येणार आहे. Airtel च्या या नव्या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे ओटीटी फायद्यांसोबतच त्यात अतिरिक्त डेटाही उपलब्ध आहे. या तिन्ही योजनांची वैधता मर्यादित काळासाठी आहे.