Qualcomm चा Snapdragon 8 Elite चिपसेट लाँच, लेटेस्ट प्रोसेसरसह हे स्मार्टफोन करणार एंट्री
Qualcomm या मोबाईल फोनसाठी चिपसेट बनवणाऱ्या कंपनीने नवीनतम Snapdragon 8 Elite Soc लाँच केले आहे. Qualcomm कडून या प्रोसेसरसह फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. हा चिपसेट इंडस्ट्री लीडिंग टेक्नोलॉजी Qualcomm Oryon CPU Qualcomm Adreno GPU आणि अपग्रेड केलेल्या Qualcomm Hexagon NPU सह येतो. यासोबतच उत्तम कॅमेरा अनुभवासाठी यात AI-ISP चा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
हेदेखील वाचा- आता एक्स होणार अधिक स्पेशल, तात्काळ मिळणार ट्रेंडिंग अपडेट्स! एलन मस्कने लाँच केलं रडार
Qualcomm ने अखेर Snapdragon 8 Elite चिपसेट लाँच केला आहे. फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये हा प्रोसेसर दिला जाईल. कंपनीचा दावा आहे की हा जगातील सर्वात वेगवान मोबाइल चिपसेट आहे, जो गेल्या वर्षीच्या Snapdragon 8 Gen 3 चिपसेटचा उत्तराधिकारी आहे. सध्या कंपनीने हा चिपसेट आपल्या सध्याच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये वापरला आहे. (फोटो सौजन्य – X)
कंपनीने इंडस्ट्री लीडिंग टेक्नोलॉजीह Snapdragon 8 Elite चिपसेट सादर केला आहे. यात सेकंड जनरेशन कस्टम बिल्ट क्वालकॉम ओरियन सीपीयू, क्वालकॉम ॲड्रेनो जीपीयू आणि अपग्रेड केलेला क्वालकॉम हेक्सागॉन एनपीयू आहे, ज्यामुळे कार्यक्षमता वाढते. हा एक AI पॉवर्ड चिपसेट आहे जो फोटोग्राफी, गेमिंग आणि ब्राउझिंग दरम्यान चांगली कामगिरी देतो. क्वालकॉमचे AI-ISP (Artificial Intelligence Image Signal Processor) फीचर कॅमरा परफॉर्मेस वाढवण्यासोबतच फ्लूड फोटोग्राफिक अनुभव देईल.
गेमिंगची आवड असलेल्या मोबाइल वापरकर्त्यांना चिपमधील Adreno GPU आवडेल. वापरकर्त्यांना गेममधील विविड लाइटिंग आणि सावल्यांसाठी 40 टक्के सुधारित ग्राफिक्स परफॉर्मंस आणि रे ट्रेसिंग फीचर दिले जाईल. यासह, गेम सुपर रिझोल्यूशन 2.0 वैशिष्ट्य कमी अंतरासह गेमिंग व्हिज्युअल सुधारेल, जे गेमला पूर्वीपेक्षा अधिक इमर्सिव आणि रिस्पॉन्सिव देणारे बनवते.
Snapdragon 8 Elite ने चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी बरेच अपग्रेड दिले आहेत. हा चिपसेट Qualcomm X80 5G मॉडेमसह सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये 10Gbps वेगाने मोठ्या फाइल्स आणि उच्च दर्जाचे व्हिडिओ डाउनलोड करण्याची क्षमता आहे. यासोबतच हा चिपसेट वाय-फाय 7 सह येतो.
हेदेखील वाचा- गुगल मॅपच्या वॉकिंग मोड फीचरबद्दल माहीत आहे का? आता क्षणार्धात समजणार रस्ता
Qualcomm च्या या नवीनतम चिपसेटसह, iQOO 13, OnePlus 13, Xiaomi 15 सोबत Realme GT 7 Pro आणि Honor Magic 7 सिरीज स्मार्टफोन लाँच केले जातील. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, Realme GT 7 Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Elite chipset सह लाँच होणारा पहिला फोन असेल. यानंतर iQOO 13 स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो.
सॅमसंगच्या संदर्भात अशी बातमी आहे की कंपनी Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह आपली आगामी फ्लॅगशिप Galaxy S25 सीरीज लाँच करणार नाही. काही रिपोर्ट्स मध्ये असे सांगितले जात आहे की Samsung Galaxy S25 सीरीज MediaTek Dimensity फ्लॅगशिप स्मार्टफोन सह लाँच होईल.