आता एक्स होणार अधिक स्पेशल, तात्काळ मिळणार ट्रेंडिंग अपडेट्स! एलन मस्कने लाँच केलं रडार
आपलं प्लॅटफॉर्म आणखी वेगळे करण्यासाठी आणि रिअल-टाइम अपडेट्स वाढवण्यासाठी, एलन मस्कने सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्सवर एक नवीन टूल लाँच केलं आहे. रडार असं या नवीन टूलचं नाव आहे. या टूलच्या मदतीने युजर्सना ट्रेंडिंग आणि रिअल टाईम अपडेट अधिक वेगाने मिळणार आहेत. हे नवीन टूल केवळ प्रीमियम+ सब्सक्राइबर्ससाठी उपलब्ध आहे. हे नवीन टूल युजर्सना लाईव्ह कंटेट सोबतच ट्रेंडिंग कंटेटची देखील माहिती देणार आहे. हे टूल युजर्सना एकाच वेळी ट्रेंडिंग विषय, बातम्या आणि इव्हेंट फॉलो करण्याची परवानगी देते.
हेदेखील वाचा- विवोचा Vivo S20 स्मार्टफोन लवकरच लाँच होणार, 50MP कॅमेरा आणि नव्या फीचर्सने सुसज्ज
रडार प्रीमियम + वापरकर्त्यांना ट्रेंडिंग विषय, ताज्या बातम्या आणि लाइव्ह इव्हेंट्सवर दुसऱ्या सेंकदाला अपडेट्स देणार आहे. रेगुलर सर्च फंक्शन व्यतिरिक्त, जे ऐतिहासिक डेटा किंवा साध्या शोध अल्गोरिदमवर अवलंबून असतात, अशा युजर्ससाठी रडार बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. कारण रडार युजर्सना अधिक वेगाने प्रत्येक क्षणाचे अपडेट्स उपलब्ध करून देणार आहे. क्रीडा अपडेट्स असोत, राजकीय घडामोडी असोत किंवा व्हायरल क्षण असोत, रडार युजर्सना त्या क्षणी ट्रेंड होत असलेला कंटेट शोधण्याची आणि त्यात व्यस्त राहण्याची संधी देते.
हे पूर्वी “इंसाइट्स” म्हणून ओळखले जात होते आणि ते प्रामुख्याने व्यवसायांसाठी डिझाइन केलेले होते, ज्यामुळे मार्केटर्सना ॲपमधील विषय आणि ट्रेंडचे निरीक्षण करण्याची परवानगी मिळतं होती. पण आता हे टूल इतर युजर्ससाठी देखील उपलब्ध होणार आहे. आता रीब्रँड केलेले “रडार” हे विशेषत: अशा वापरकर्त्यांसाठी आहे जे सामाजिक संभाषणांमध्ये आघाडीवर राहू इच्छितात किंवा ज्यांचा व्यवसायाच्या नवीनतम माहितीचे त्वरित अपडेट मिळवण्याची इच्छा आहे. पत्रकार, कंटेट क्रिएटर्स, मार्केटर्स आणि ब्रेकिंग न्यूजमध्ये स्वारस्य असलेले सामान्य वापरकर्ते हे साधन त्यांच्या दैनंदिन ऑनलाइन दिनचर्याचा एक आवश्यक भाग बनवू शकतात.
हेदेखील वाचा- गुगल मॅपच्या वॉकिंग मोड फीचरबद्दल माहीत आहे का? आता क्षणार्धात समजणार रस्ता
रडार X च्या वेगाने बदलणाऱ्या डेटा स्ट्रीमचा वापर करतो. वापरकर्ते कीवर्ड किंवा हॅशटॅग टाइप करू शकतात आणि सामान्य शोध परिणामांऐवजी, त्यांना वेळ आणि प्रासंगिकतेनुसार फिल्टर केलेल्या त्यांच्या क्वेरीशी संबंधित नवीनतम अपडेट्स मिळतील.
इलॉन मस्कला त्याच्या एका कंपनीसाठी AI ट्यूटरची आवश्यकता आहे. ॲलन त्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( AI) कंपनी xAI साठी AI ट्यूटर शोधत आहे. बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, एलोन मस्कच्या या AI कंपनीत काम करणाऱ्या एआय ट्युटर्सना भारतीय रुपयांमध्ये प्रति तास 5000 रुपये मिळतील.
एलोन मस्कच्या कंपनी xAI ने गेल्या आठवड्यात AI ट्युटर्सच्या भरतीसाठी जाहिरात दिली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI साठी उच्च दर्जाचा डेटा तयार करणे हे या ट्यूटरचे काम असेल, जेणेकरून भाषा प्रक्रिया अल्गोरिदम शिकवता येतील. या नोकऱ्यांसाठी, उमेदवारांना यापैकी किमान दोन भाषा माहित असणे आवश्यक आहे, ज्यात कोरियन, व्हिएतनामी, चीनी, जर्मन, रशियन, इटालियन, फ्रेंच, अरबी, इंडोनेशियन, तुर्की, हिंदी, पर्शियन, स्पॅनिश आणि पोर्तुगीज यांचा समावेश आहे.