Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला द्या जबरदस्त गिफ्ट! 700 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सेलमध्ये खरेदी करा हे गॅजेट्स
9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला काही स्पेशल भेटवस्तू देतो. पण दरवर्षी सर्व भावांना एकच चिंता सतावत असते, ती म्हणजे यंदाच्या रक्षाबंधनाला बहिणीला काम गिफ्ट द्यावं. चॉकलेट, टेडीबियर, आणि कपडे देऊन तुम्ही कंटाळा आला आहात का? तर यंदाच्या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला काही वेगळं आणि खास गिफ्ट देऊ शकता. हे गिफ्ट चॉकलेट किंवा ड्रेस नाही तर एखादं गॅजेट असणार आहे.
Free Fire Max: Garena ने गेमर्सना दिलं खास गिफ्ट, धमाकेदार Rewards साठी जारी केले स्पेशल रेडिम कोड्स
असं गॅजेट्स जे तुमच्या बहिणीला तिच्या रोजच्या आयुष्यात उपयोगी पडेल. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक गॅजेट्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर केलं जात आहे. म्हणजेच तुम्हाला ब्रँडेड आणि महागडे गॅजेट कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला एखादं ब्रँडेड आणि महागडं गॅझेट गिफ्ट करू शकता, यासाठी तुम्हाला जास्त पैसे देखील खर्च करावे लागणार नाहीत. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुमच्या बहिणीला गाणी ऐकण्याची आवड असेल तर तुम्ही तुमच्या बहिणीला Triggr चे Triggr Ultrabuds N1 Neo हे ईयरबड्स गिफ्ट म्हणून देऊ शकता. या ईयरबड्सची किंमत फ्लिपकार्ट सेलमध्ये 599 रुपये आहे. Triggr चे हे ईयरबड्स
13mm ड्राइवर्ससह 40 तासांपर्यंत प्लेबॅक देतात. Bluetooth 5.3 तंत्रज्ञान आणि टच कंट्रोलसह यामध्ये इन-बिल्ट माइक देखील देण्यात आला आहे. यामध्ये 10 मीटरपर्यंत रेंज सुविधा देखील देण्यात आली आहे.
जर तुम्ही बहिण सतत मोबाईलचा वापर करत असेल तर तुम्ही तिला 10,000mAh बॅटर क्षमता असलेला पावर बँक गिफ्ट देऊ शकता. Amazon वर Hammer Ultra Charge Power Bank ची किंमत 649 रुपये आहे. यामध्ये Type-C PD पोर्ट आणि दोन USB पोर्ट दिले जातात. हा पावर बँक 20W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
हे पोर्टेबल स्पीकर Flipkart वर 699 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. यामध्ये 11 तासांचा प्लेबॅक टाईम देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये Bluetooth 5.0 ची सुविधा आहे आणि हे 10 मीटर मीटरपर्यंत रेंज देण्यात आली आहे. 5W RMS आउटपुटसह या डिव्हाईसची साउंड क्वालिटी अतिशय दमदार आहे.
जर तुमच्या बहिणीला मेकअपची आवड असेल तर Portronics Toofan USB Fan हे गोंडस आणि व्यावहारिक भेट ठरणार आहे. Amazon वर याची किंमत 699 रुपये आहे, यामध्ये 2000mAh बॅटरी आणि 7,800 RPM स्पीडसह ते 4.5 तास सतत चालू शकते.
Flipkart वर 534 रुपयांत तुम्ही Philips Hair Dryer खरेदी करू शकता. 1,000W ची पावर, दोन हीट आणि स्पीड सेटिंग्स, आणि 1.5 मीटर कॉर्डसह हे एक उत्तम स्टाइलिंग गॅझेट आहे.
रक्षाबंधनाचा सण कधी साजरा केला जाणार आहे?
9 ऑगस्ट
कोणत्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर सेल सुरु आहे?
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट