Free Fire Max: Garena ने गेमर्सना दिलं खास गिफ्ट, धमाकेदार Rewards साठी जारी केले स्पेशल रेडिम कोड्स
गरेनाने फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी 3 ऑगस्टचे रेडिम कोड्स जारी केले आहेत. त्यामुळे आता प्लेअर्सना इन-गेम आयटम्स खरेदी करण्यासाठी डायमंडची गरज नाही. रेडीम कोड्सद्वारे प्लेअर्स फ्रीमध्ये इन-गेम आयटम्स मिळवू शकतात. हे कोड्स मर्यादित काळासाठी उपलब्ध असतात. त्यामुळे जर प्लेअर्सना या कोड्सद्वारे रिवॉर्ड जिंकायचे असतील घाई करावी लागणार आहे.
Tech Tips: Power Bank खरेदी करताना कधीही करू नका या चूका! पैसे होतील बर्बाद आणि फोनही होईल खराब…
तुम्ही फ्री फायर मॅक्समध्ये सतत एलिमिनेट होत असाल,तर तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही या फेमस बॅटल रॉयल गेममध्ये प्रो प्लेअर बनू शकता. या गेममध्ये केवळ शूटिंग नाही तर स्ट्रॅटेजी, टाइमिंग देखील महत्त्वाचे आहे. तुम्हाला या गेममध्ये प्रत्येक मॅचमध्ये “Booyah” करायचा असेल तर तुमच्यासाठी काही टिप्स आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Free Fire Max एक बॅटल रॉयल गेम आहे. हे कोणतंही मिशन नाही, जिथे तुम्हाला सर्वच जिंकायचं आहे. जेव्हा तुम्ही गेममध्ये एंटर करता तेव्हा चांगली शस्त्रे, मेडकिट आणि इतर इन गेम आयटम्स तुमच्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे हे सर्व आयटम्स मिळण्यासाठी आणि शत्रूंचा सामना करण्यासाठी तुम्हाला शांत राहणं गरजेचं आहे. तुम्ही घाई केल्यास एखादा शत्रू तुमच्यावर हल्ला करू शकतो.
गेममध्ये नेहमी उंच ठिकाणं शोधा आणि तिथे थांबा. कारण उंच ठिकाणाहून तुम्ही इतर सर्व ठिकाणं अगदी सहज पाहू शकता आणि तुमच्या शत्रूंवर नजर ठेऊ शकता. उंच ठिकाणावरून तुम्हाला संपूर्ण परिसराचे स्पष्ट दृश्य दिसते आणि तुम्ही शत्रूंना लवकर ओळखू शकता. उंच ठिकाणी थांबल्यामुळे तुम्ही शत्रूला आधीच पाहू शकता आणि त्याच्यावर गोळीबार करता येतो, तर खाली राहिल्यास शत्रू तुम्हाला लवकर मारू शकतो. त्यामुळे गेममध्ये एंटर करताच एखादं उंच ठिकाणं शोधा जिथून तुम्हाला संपूर्ण परिसर पाहता येईल.
जर तुम्हाला गेममध्ये दिर्घकाळ टिकायचं असेल तर एकाच जागी थांबू नका. जर तुम्ही एकाच ठिकाणी जास्त वेळ राहिलात तर शत्रू तुमचे स्थान शोधू शकतो आणि तुमच्यावर हल्ला करू शकतो आणि तुमचा गेम इथेच संपू शकतो. म्हणून खेळादरम्यान तुमची स्थिती बदलत राहा आणि सुरक्षित क्षेत्राकडे वाटचाल करत राहा.
Free Fire Max मध्ये Gloo Wall एक उत्तम फिचर आहे. याचा वापर करून तुम्ही शत्रूंपासून तुमची सुरक्षा करू शकता. जर शत्रू खूप जवळ असेल आणि तुम्ही मरणार असाल, तर ग्लू वॉल वापरून स्वतःला वाचवा. ग्लू वॉलचा अनावश्यक वापर वारंवार करून तुम्ही गेममध्ये मागे पडू शकता.
संधी मिळताच, मेडकिटने स्वतःला बरे करा आणि तुमचा हेल्थ बार भरलेला ठेवा. हे तुम्हाला कोणत्याही वळणावर शत्रूला पराभूत करण्यास मदत करेल.