
Ration Card PHH vs AAY: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
PHH चा फुल फॉर्म Priority Household आहे. मराठीत याला प्राधान्य कुटुंब असे म्हणतात. हे कार्ड अशा कुटुंबांना दिलं जातं ज्यांना सरकारच्या मदतीची गरज आहे. यामध्ये तुम्हाला एका माणसामागे 5 किलो धान्य मिळतं. तुमच्या कुटुंबात किती माणसं आहेत त्यावर तुमचं धान्य ठरतं. उदाहरण द्यायचं झालं तर, तुमच्या घरात 4 लोक असतील तर तुम्हाला 4 गुणिले 5 म्हणजे 20 किलो धान्य महिन्याला मिळायला हवं. घरात 5 लोक असतील तर 25 किलो. जेवढी माणसं जास्त तेवढं धान्य जास्त. हे लक्षात ठेवा.
AAY म्हणजे Antyodaya Anna Yojana असे आहे. त्याला मराठीत अंत्योदय अन्न योजना असे म्हणतात. ही योजना सगळ्यात जास्त गरीब लोकांसाठी आहे. जे लोक खूपच गरीब आहेत, ज्यांचं कोणी नाही, त्यांना हे कार्ड दिलं जातं.
यांच्यासाठी नियम वेगळा आहे. यामध्ये माणसांच्या संख्येवर धान्य मिळत नाही. तर एका कुटुंबाला 35 किलो धान्य मिळतं. तुमच्या घरात 2 लोक असले तरी 35 किलो आणि 6 लोक असले तरी 35 किलो. पूर्ण कुटुंबासाठी फिक्स 35 किलो PHH आणि AAY मध्ये खूप फरक आहे. एका ठिकाणी माणसांवर धान्य आहे तर दुसरीकडे पूर्ण कुटुंबासाठी फिक्स आहे.
थोडक्यात सांगायचं तर तुमच्या कार्डवर काय आहे हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर दुकानदार फसवू शकतो. त्यामुळे आजच तुमचं रेशन कार्ड काढा आणि त्यावर PHH आहे की AAY आहे ते तपासा आणि तुम्हाला किती धान्य मिळायला हवं याचा हिशोब लावून ठेवा.