रियल लाइफ टर्मिनेटर! डोळा काढला आणि लावला वायरलेस कॅमेरा, जाणून घ्या सविस्तर (फोटो सैौजन्य - सोशल मिडीया)
आपला डोळा मज्जासंस्थेशी जोडलेला असतो. त्यामुळे आपण जवळच्या आणि लांबच्या गोष्टी अगदी सहजपणे पाहू शकतो. काहीवेळा तर कॅमेऱ्याला न दिसणाऱ्या गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसतात. त्यामुळे आपला डोळा हा आपला पर्सनला कॅमेरा आहे, असं आपण बोलू शकतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की खरचं आपला डोळा काढून त्याजागी कॅमेरा बसवला तर काय होईल? आपण या गोष्टीची कल्पना देखील करू शकत नाही, पण जगात अशी एक व्यक्ति आहे जिने खरंच तिचा डोळा काढून त्याजागी कॅमेरा बसवला आहे. या व्यक्तिला आता रिअल लाईफ टर्मिनेटर किंवा आयबॉर्ग म्हणून ओळखलं जात आहे.
हेदेखील वाचा- Zoom ने वाढवली वेबिनारची क्षमता;10 लाख पार्टीसिपेंटस एकत्र सहभागी होऊ शकतील
टर्मिनेटर हा हॉलीवूडचा चित्रपट आहे. ज्यामध्ये Arnold Schwarzenegger यांनी टर्मिनेटरची भुमिका साकारली आहे. या चित्रपटात Arnold Schwarzenegger यांच्या पात्राने देखील त्याच्या डोळ्याच्या जागी कॅमेरा बसवला होता. आणि आता रिअल लाईफ टर्मिनेटर म्हणून ओखळले जाणारे रॉब स्पेन्स यांनी देखील त्यांचा कृत्रिम डोळा काढून त्या जागी कॅमेरा बसवला आहे. रॉब स्पेन्स यांनी 2007 मध्ये कृत्रिम डोळा काढला आणि त्या जागी बनावट डोळ्याच्या आत कॅमेरा बसवला. यात बॅटरी, सर्किट बोर्ड आणि कॅमेरा सेन्सर आहे.
याबाबत रॉब स्पेन्सने सांगितले की, तो लहान असताना त्याच्यासोबत एक अपघात झाला होता. त्यावेळी त्याने गोळीबार करताना चुकीच्या पद्धतीने बंदूक धरली, त्यामुळे त्याला गोळी लागली. गोळी लागल्याने त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. यानंतर त्याचा खरा डोळा काढण्यात आला. यानंतर, शस्त्रक्रिया करण्यात आली आणि एक कृत्रिम डोळा बसविण्यात आला. मात्र रॉब स्पेन्स कृत्रिम डोळ्याच्या विरोधात होता. यानंतर त्यांनी निर्णय घेतला, त्याने कृत्रिम डोळा काढून कॅमेरा बसवण्याचं ठरवलं.
हेदेखील वाचा- अँड्रॉइड आणि पीसी युजर्सना Google क्रोमवर मिळणार आयफोनवाले फीचर! ब्राउझिंगचा अनुभव बदलणार
लाइव्ह सायन्सने दिलेल्या अहवालानुसार, रॉब स्पेन्सचे कर्मचारी डिझायनर कोस्टा ग्राममॅटिस यांनी त्याला यामध्ये मदत केली आणि त्याच्यासाठी एक वायरलेस कॅमेरा तयार केला आहे, जो कृत्रिम डोळ्याच्या आत स्थापित केला जाऊ शकतो. यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअर मार्टिन यांनीही मदत केली. अभियंत्यांनी एक छोटा सर्किट बोर्ड तयार केला. या सर्किटच्या मदतीने वायरलेस कॅमेरा डेटा प्राप्त करू शकतो आणि पाठवू शकतो. या वायरलेस कॅमेरामध्ये मायक्रो ट्रान्समीटर, छोटी बॅटरी, मिनी कॅमेरा आणि मॅग्नेटिक स्विच देण्यात आला आहे. या स्विचच्या मदतीने युजर्स कॅमेरा चालू आणि बंद करू शकतात.
एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हा कॅमेरा ३० मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. हा कॅमेरा ऑप्टिक नर्व्ह सिस्टिमला जोडलेला नसला तरी ते त्यांच्या फिल्म मेकिंगमध्ये या व्हिडिओचा वापर करतात. या प्रोस्थेटिक डोळ्यात बसवलेल्या कॅमेरामध्ये तीन पर्याय उपलब्ध आहेत. यातील एक बॉयोलॉजिकल रिएलिस्टिक आणि ग्लोइंग रेड वर्जन आहे.2009 मध्ये त्याची गिनीज वर्ल्ड ऑफ बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, टर्मिनेटर हा हॉलीवूडचा प्रसिध्द चित्रपट आहे. आत्तापर्यंत अनेक सिझन आले आहेत. टर्मिनेटर पहिल्यांदा 1984 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स कॅमेरून यांनी केले होते. या चित्रपटात Arnold Schwarzenegger यांनी टर्मिनेटरची भुमिका साकारली आहे. अरनॉल्ड हा प्रत्यक्षात एक रोबोट आहे, ज्याला सध्याच्या काळात दोन लोकांना वाचवण्यासाठी पाठवले जाते.