अँड्रॉइड आणि पीसी युजर्सना Google क्रोमवर मिळणार आयफोनवाले फीचर (फोटो सौजन्य - pinterest)
आपण आपलं गुगल अकाऊंट पीसी, स्मार्टफोन, अशा एकापेक्षा अनेक डिव्हाईसवर लॉग इन करतो. कारण सर्वच कामं मोबाईलवर करणं शक्य नसतं, तसेच सर्व कामं पीसीवर करणं देखील शक्य होत नाही. त्यामुळे आपलं एकचं गुगल अकाऊंट बऱ्याच ठिकाणी लॉग इन असतं. पण अनेकदा असं होतं की, आपण पीसीवर आपलं गुगल अकाऊंट लॉग इन करतो. आणि त्यामध्ये काही गोष्टी सेव्ह करून ठेवतो किंवा बुकमार्क करतो. पण ह्याच सेव्ह किंवा बुकमार्क केलेल्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या फोनमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते बुकमार्क्स शोधण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. आपल्याला सहज ते बुकमार्क्स शोधता येत नाहीत.
हेदेखील वाचा –भारतासह इतर 6 देशांमध्ये लाँच होतोय Google AI Overview! फीचर्स अपडेटनंतर कंपनीचा निर्णय
असंच काहीवेळा आपल्या पीसीच्या बाबतीत देखील होतं. आपण जेव्हा फोनमध्ये सेव्ह करून ठेवलेल्या गोष्टी जेव्हा पीसीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा देखील आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्हाला देखील अशाच समस्यांचा सामना करावा लागत आहे का? तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अँड्रॉइड आणि पीसी युजर्सना Google क्रोमवर आता आयफोनवाले फीचर्स मिळणार आहेत. ज्यामुळे युजर्स फोन आणि पीसीवरील बुकमार्स अगदी सहज शोध शकतील. या नवीन फीचरमुळे युजर्सचा ब्राउझिंगचा अनुभव बदलणार आहे.
तुम्हाला वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर समान Google अकाऊंटसह सेव्ह केलेला डेटा ऍक्सेस करण्यात समस्या येत आहेत का? आता तुम्हाला अशा समस्यांचा सामना करावा लागणार नाही. आता एकाच Google अकाऊंटसह अनेक डिव्हाईसवर सेव्ह आणि बुकमार्क्समध्ये प्रवेश करणं सोपं होणार आहे.
हेदेखील वाचा –Google, Microsoft आणि Adobe सह या टेक कंपन्यांमध्ये आहेत भारतीय सीईओ!
अलीकडेच Google ने माहिती दिली होती की कंपनी Android आणि डेस्कटॉप युजर्ससाठी Chrome वर पासवर्ड आणि बुकमार्क ऍक्सेस करणायासाठी फीचर लाँच करत आहे. हे फीचर सर्वप्रथम आयफोन युजर्ससाठी Chrome वर सादर करण्यात आले आहे. यामुळे आता युजर्सच्या Google अकाऊंटमध्ये लॉग इन केल्यानंतर, सर्व सेव्ह केलेला डेटा डिव्हाइसच्या क्रोम ब्राउझरवरच सेव्ह केला जाऊ शकतो. हे करण्यासाठी, युजर्सला Google Sync टॉगल सक्षम करण्याची देखील आवश्यकता नाही. युजर्सने क्रोममध्ये साइन इन करताच, त्याला त्याच्या Google अकाऊंटमधील सर्व सेव्ह केलेले पासवर्ड, पत्ते आणि इतर डेटा ऍक्सेस करण्याची सुविधा मिळणार आहे.
गुगलचे म्हणणे आहे की, आवश्यक तेथे आम्ही आमच्या युजर्सना क्रोममध्ये साइन इन करण्याची सुविधा देऊ. त्यामुळे युजर्सना कोणत्याही डिव्हाइसवर कस्टमाइज्ड ब्राउझिंग अनुभव मिळेल. या फीचरमुळे, एकापेक्षा अधिक उपकरणांवर डेटा प्रवेश करण्याची प्रक्रिया सुलभ होईल. यासह, क्रॉस-डिव्हाइस कार्यक्षमता देखील चांगली असेल. गुगलची ही सुविधा अनेक ठिकाणी उपयुक्त ठरेल. उदाहरणार्थ, जर एखादा युजर त्याच्या Google अकाऊंटमध्ये लॉग इन करून त्याच्या PC वर Chrome वर एखादा लेख वाचत असेल, तर तोच लेख फोनवरही वाचता येईल.