Realme C सिरीजमधील Realme C63 5G लाँच (फोटो सौजन्य -Realme)
लोकप्रिय टेक कंपनी Realme ने त्यांच्या C सिरीजमधील Realme C63 5G अखेर लाँच केला आहे. हा फोन 3 व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. जबरदस्त फीचर्स, पावरफुल बॅटरी आणि उत्कृष्ट कॅमेऱ्या क्वालिटीसह Realme C63 5G लाँच करण्यात आला आहे. फोन लाँच करण्यात आला असला तरी अद्याप फोनची विक्री सुरु करण्यात आलेली नाही. 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता Realme C63 5G ची पहिली विक्री होणार आहे. Realme C63 5G मुळे अगदी कमी किंमतीत आकर्षक फीचर्स मिळणार आहेत. तुम्ही जर कमी बजेट आणि भन्नाट फीचर्ससह फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Realme C63 5G बेस्ट ऑप्शन आहे.
हेदेखील वाचा- Amazon वर सुरू आहे Great Freedom Festival! लॅपटॉप आणि स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट, खरेदीची संधी चुकवू नका
Realme C63 5G फोन फॉरेस्ट ग्रीन आणि स्टाररी गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. Realme C63 5G लाँच होण्यापूर्वीच कंपनीने त्याच्या अनेक तपशीलांबाबत माहिती दिली होती. लाँच होण्यापूर्वीच कंपनीने माहिती दिली होती की हा फोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर सह आणला जात आहे. त्यानंतर आज अखेर लाँचिंगनंतर फोनचे फीचर्स आणि किंमतीबद्दल अधिकृत माहिती मिळत आहे.
Realme C63 5G स्मार्टफोन Octa Core MediaTek Dimensity 6300 6nm प्रोसेसर (2x Cortex-A76 @ 2.4GHz 6x Cortex-A55 @ 2GHz) आणि आर्म Mali-G57 MC2 GPU सह लाँच करण्यात आला आहे.
Realme C63 5G फोन 4GB / 6GB / 8GB LPDDR4x रॅमसह लाँच झाला आहे. हा फोन 128GB (UFS 2.2) स्टोरेजसह उपलब्ध आहे. फोन मायक्रोएसडी कार्डसह 2TB पर्यंत विस्तारित मेमरीसह येतो.
Realme C63 5G फोनमध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले आहे, जो 1604 x 720 पिक्सेल रिझोल्यूशन, HD + स्क्रीन, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 625 nits पीक ब्राइटनेससह येतो. फोन 50/60/90/120Hz डायनॅमिक रिफ्रेश रेटसह येतो.
हेदेखील वाचा- WhatsApp वर पर्सनल फोटो शेअर करताय? मग ‘हे’ फीचर वापर, स्क्रीनशॉट किंवा मॅसेज फॉरवर्डची भीती नाही
Realme C63 5G फोन Galaxycore GC32E1 सेन्सर आणि LED फ्लॅशसह 32MP रियर कॅमेरासह येतो. फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Realme C63 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Realme C63 5G फोन Android 14 वर realme UI 5.0 सह चालतो. फोन 3.5mm ऑडिओ जॅक, 1115 अल्ट्रा लिनियर बॉटम पोर्टेड स्पीकर, ब्लूटूथ 5.3, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.
Realme C63 5G स्मार्टफोन 4GB + 128GB, 6GB + 128GB आणि 8GB + 128GB या तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. तर 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. हा फोन 1000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करता येणार आहे. डिस्काउंटनंतर, फोन 9999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.
Realme C63 5G ची पहिली विक्री 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लाईव्ह होईल. हा फोन फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येईल.