Realme Neo7 स्मार्टफोनचं लाँच कन्फर्म, पावरफुल प्रोसेसरसोबत या दिवशी करणार एंट्री
टेक कंपनी Realme लवकरच त्यांचा नवीनतम स्मार्टफोन लाँच करणार आहे. डिसेंबर महिन्यात कंपनीची नवीन स्मार्टफोन सिरीज Realme Neo7 चीनमध्ये लाँच केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी, कंपनीचा Realme GT हा हाय-एंड परफॉर्मन्स फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणून लाँच करण्यात आला होता. Realme GT च्या यशस्वी लाँचिंगनंतर आता कंपनी Realme Neo सिरीज मिड-रेंज ई-स्पोर्ट्स फ्लॅगशिप म्हणून लाँच करणार आहे. ही स्मार्टफोन सिरीज डिंसेबरमध्ये लाँच होणार असली, तरी त्याच्या काही स्पेसिफिकेशन्सबद्दल माहिती समोर आली आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कंपनीने म्हटले आहे की Realme Neo सिरीज लीपफ्रॉग परफॉर्मंस, नवीनतम गेमिंग अनुभव आणि तांत्रिक ट्रेंड डिझाइनसह लाँच केली जाणार आहे. या सर्व फीचर्समुळे ही सिरीज एक ई-स्पोर्ट्स फ्लॅगशिप सिरीज ठरू शकते. सिरीजचे तगडे फीचर्स तरूणांना आकर्षित करतील. सिरीजमधील स्मार्टफोन एका प्रिमियम डिझाईनसह लाँच केले जाणार आहेत. (फोटो सौजन्य – X)
Realme Neo7 बद्दल असे सांगण्यात आले आहे की हा एक मिड-रेंज गेमिंग पॉवरहाऊस फोन असेल. एका अहवालानुसार, आगामी डिव्हाइसने 2.4 मिलियनचा प्रभावशाली AnTuTu स्कोअर प्राप्त केला आहे. हे मागील Realme GT Neo6 पेक्षा खूप जास्त आहे. ज्याचा स्कोर 1.5 मिलियन होता. आगामी फोनमध्ये MediaTek Dimensity 9300+ चिपसेटसह मोठी 7,000 mAh बॅटरी असेल, जी जलद चार्जिंगला सपोर्ट करेल.
कंपनीने या वर्षी मे महिन्यात Snapdragon 8s Gen 3, UFS 4.0 स्टोरेज आणि 5500mAh बॅटरीसह GT Neo6 लाँच केले. हे 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अशीच अपेक्षा GT Neo 7 बाबतही केली जात आहे. मात्र यामध्ये बॅटरीचा आकार वाढणार आहे. ज्यामुळे फोन चार्ज होण्याठी कमी कालावधी लागेल आणि युजर्सना अधिक काळ फोनचा वापर करता येणार आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मागील GT Neo6 मध्ये 6.78-इंचाचा डिस्प्ले आहे जो दोन बाजूंनी वक्र आहे. फोनची जाडी 8.7 मिमी आहे आणि 5500mAh बॅटरीसह त्याचे वजन 191 ग्रॅम आहे. पण Neo7 चे वजन कमी असेल. यात नवीन हाय-डेंसिटी सिलिकॉन एनोड बॅटरी टेक्नोलॉजीचा वापर केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे तो आधीच्या फोनपेक्षा पातळ आणि वापरण्यास अधिक सोपा होईल.
Realme GT Neo6 मध्ये 6.78 इंच 1.5K डिस्प्ले आहे जो 6000 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यात 16 GB पर्यंत रॅम आणि 1 TB पर्यंत स्टोरेज पर्याय आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात जीपीएस आणि ब्लूटूथ सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 8s Gen प्रोसेसर देण्यात आला आहे. हे 4nm आर्किटेक्चरवर आधारित आहे.