फोटो सौजन्य - Samsung
Samsung Galaxy F14 5G: लोकप्रिय आणि प्रसिध्द टेक कंपनी Samsung ने भारतात जबरदस्त फीचर्स आणि बजेट किंमतीत असणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. Samsung Galaxy F14 5G हा स्मार्टफोन कंपनीने भारतात लाँच केला आहे. हा फोन बजेट किंमतीत लाँच करण्यात आला आहे. Samsung Galaxy F14 5G ची किंमत 10 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे तुम्ही बजेट किंमतीत नवीन फोन शोधत असाल तर Samsung Galaxy F14 5G बेस्ट ऑप्शन आहे.
हेदेखील वाचा- Jio-Airtel ची डोकेदुखी वाढली! BSNL-TATA च्या करारानंतर आता इंटरनेटची चाचणी सुरू
Samsung Galaxy F14 5G मूनलाइट सिल्व्हर आणि पेपरमिंट ग्रीन कलरमध्ये भारतात लाँच करण्यात आला आहे. Samsung च्या अधिकृत वेबसाईटसह ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि भारतातील विविध ऑफलाइन स्टोअर्सवर तुम्ही Samsung Galaxy F14 5G खरेदी करू शकता. चला तर मग या फोनचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया.
Samsung Galaxy F14 5G मध्ये 6.7 इंचाचा IPS LCD, फुल HD+ रिझोल्यूशन असलेला डिस्प्ले आहे. जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनी Samsung Galaxy F14 5G साठी 2 जनरेशनसाठी OS अपडेट आणि 4 वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट देणार आहे.
हेदेखील वाचा- आकर्षक ऑफर्ससह Samsung Galaxy Z Fold6, Watch Ultra आणि Buds3 च्या विक्रीला सुरूवात
Galaxy F14 स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 चिपसेट आहे. जी ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU सह येते. Samsung चा नवीन 4G स्मार्टफोन, Android 14 वर आधारित OneUI 6.1 OS वर चालतो.
Samsung Galaxy F14 मध्ये ट्रिपल कॅमेरा सिस्टम आहे. Samsung Galaxy F14 5G फोनच्या मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा, 2MP डेप्थ कॅमेरा आणि 2MP मॅक्रो लेन्स देण्यात आले आहेत. यासोबतच फोनच्या मागील भागात एलईडी फ्लॅश लाईट देखील देण्यात आली आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP फ्रंट कॅमेरा आहे.
Samsung Galaxy F14 5G मध्ये 5000mAh बॅटरी आणि जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Galaxy F14 सुरक्षेसाठी साइड फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.
Samsung Galaxy F14 5G मध्ये ड्युअल सिम, 4जी एलटीई, वायफाय 5, ब्लूटूथ 5.1, जीपीएस यासह कनेक्टिव्हिटीसाठी अनेक विशेष फीचर्स आहेत. Samsung Galaxy F14 5G स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या Samsung Galaxy F14 च्या 4G मॉडेलचा अपग्रेडेड मॉडेल आहे.
Samsung Galaxy F14 5G मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.
कंपनीने Samsung Galaxy F14 5G अतिशय बजेट किंमतीत लाँच केला आहे. या फोनची किंमत 8,999 रुपये आहे. Samsung च्या अधिकृत वेबसाईटसह ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि भारतातील विविध ऑफलाइन स्टोअर्सवर तुम्ही Samsung Galaxy F14 5G खरेदी करू शकता.