सॅमसंगचे दोन नवीन फोल्डेबल फोन लाँच, प्रीमियम डिझाइन आणि मजबूत वैशिष्ट्यांसह सुसज्ज
लोकप्रिय टेक आणि फोन निर्माता कंपनी सॅमसंगने चीनमध्ये दोन नवीन फोल्डेबल फोन लाँच केले आहेत. सॅमसंग W25 आणि W25 फ्लिप हे स्मार्टफोन प्रीमियम डिझाइनसह लाँच करण्यात आले आहेत. दोन्ही फोनमध्ये पावरफुल फीचर्स देण्यात आले असून हे दोन्ही स्मार्टफोन्स स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरने सुसज्ज आहेत. सॅमसंग W25 आणि W25 फ्लिप 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह लाँच करण्यात आले आहेत. या फोनचं डिझाईन ग्राहकांना प्रचंड आवडलं आहे. सॅमसंग W25 आणि W25 फ्लिपमध्ये ॲल्युमिनियमची फ्रेम आणि एक रिफाइंड हिंज देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- आता लहान मुलांसाठी देखील बनणार पॅन कार्ड, मिळणार अनेक फायदे! अशा प्रकारे करा ऑनलाइन अप्लाय
सॅमसंगने चीनमध्ये W25 आणि W25 फ्लिप हे दोन नवीन फोल्डेबल फोन लाँच केले आहेत. सॅमसंग दरवर्षी आपल्या डब्ल्यू सीरिजअंतर्गत फोल्डेबल फोन लाँच करत असते. आता सॅमसंगने डब्ल्यू सीरिजअंतर्गत Samsung W25 आणि W25 Flip फोन लाँच केले आहेत. यामध्ये W25 फ्लिप ‘Galaxy Z Flip 6’ वर आधारित आहे, तर W25 नुकत्याच लाँच झालेल्या Galaxy Z Fold स्पेशल एडिशनवर आधारित आहे. हे दोन्ही फोल्डेबल फोन प्रीमियम डिझाइन आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह आणले गेले आहेत.दोन्ही फोन “हार्ट टू द वर्ल्ड” लोगो, सोनेरी ॲल्युमिनियम फ्रेम आणि रिफाइंड हिंजसह सिरॅमिक ब्लॅक बॅक पॅनेलसल लाँच करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – X)
Samsung W25 Flip मध्ये 6.7-इंच मुख्य स्क्रीन आणि 3.4-इंच आऊटर डिस्प्ले आहे, युजर्स क्लाउड फॅन एलिगन्स आणि सहज ॲप ऍक्सेससह डायनॅमिक वॉलपेपर सेट करू शकतात. फोल्ड करण्यायोग्य फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, जो AI आणि ऑटोफोकससह येतो. कंपनीने 2x ऑप्टिकल झूम सपोर्टचाही दावा केला आहे. त्याच्या AI वैशिष्ट्यांमध्ये रिअल-टाइम भाषांतर, ट्रान्सक्रिप्शन आणि नवीन जनरेशनचा Bixby यांचा समावेश आहे.
हेदेखील वाचा- Apple स्वस्त iPhone लाँच करण्याच्या तयारीत, 48MP प्रायमरी कॅमेरा आणि A18 चिपने सुसज्ज
सॅमसंग W25 बुक-स्टाईल फोल्डिंगमध्ये क्लासिक बुक-स्टाईल फोल्डेबल डिझाइन दिली आहे, जे अधिक आकर्षक दिसते. यात 8 इंचाचा मुख्य आणि 6.5 इंच आउटर डिस्प्ले आहे. त्याचे वजन 255 ग्रॅम आहे. फोनमध्ये 200MP हाय-रिझोल्यूशन कॅमेरा आहे.
दोन्ही स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर देण्यात आला आहे. हा चिपसेट मागील जेन प्रोसेसरपेक्षा चांगला परफॉर्मन्स देतो. हे 3nm वर बनवले जाते. यामुळे, बॅटरी लाइफ परफॉर्मन्स देखील चांगला झाला आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दोन्ही नवीनतम मॉडेल्ससाठी प्री-रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. हे 16GB रॅम आणि 512GB अंतर्गत स्टोरेजसह येते. यामध्ये 1TB चा पर्याय देखील उपलब्ध आहे.
Samsung च्या आगामी फ्लॅगशिप Samsung Galaxy S25 सीरीज लाँच होण्यापूर्वी अनेक तपशील समोर आले आहेत. कंपनी सध्या या सिरीजवर काम करत आहे. यावेळी ही सिरीज अनेक अपग्रेड्ससह आणली जात आहे. या सिरीजमधील सर्व फोन AI वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणार आहेत. सॅमसंगची सर्वात अत्याधुनिक सीरिज पुढील वर्षी जानेवारीमध्ये लाँच होऊ शकते.