पृथ्वीचे अप्रतिम दृश्य 36 हजार फूट उंचीवरून
काळाच्या ओघात माणसाची पावले अवकाशात पडली आहेत. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्याला आपल्या पृथ्वीबद्दलची अनेक रहस्ये जाणून घ्यायला मिळत आहेत. पृथ्वीवरचे सौंदर्य आणि हिरव्यागार दऱ्यांव्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजपर्यंत एक गूढच बनून आहेत. अशा गोष्टींचे रहस्य जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ सतत प्रयत्न करत असतात. ज्यामुळे मानव आता अकाशातील इतर ग्रहांवर पोहचू शकला आहे.
आपल्याला या ग्रहांवरून पृथ्वी कशी दिसते, कशी फिरते हे देखील पाहता येते. तुम्ही अनेक व्हिडिओंमध्ये पृथ्वी निळ्या आणि पांढऱ्या रंगात चमकताना पाहिली असेल. आज आम्ही तुम्हाला अंतराळातून काढलेला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यामध्ये 24 तासांची ॲक्टिव्हिटी टाईमलॅप्समध्ये तुम्हाला पाहता येईल. हा अप्रतिम व्हिडिओ हिमावरी 8 या उपग्रहाने टिपला आहे, जो अनेकांना मंत्रमुग्ध करत आहे.
पृथ्वीवर असे जातात 24 तास
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, पृथ्वी आपल्या अक्षावर फिरत असल्याचे दिसत आहे. यामध्ये प्रथम एका भागात सूर्यप्रकाश पडलेला दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला दाट अंधार दिसत आहे. यानंतर पृथ्वी हळूहळू फिरते आणि एका भागावर सूर्यप्रकाश पडू लागतो आणि दुसरा भाग अंधारात बुडू लागतो. हा व्हिडीओ 36 हजार फूट उंचावरून टिपण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ पूर्ण 24 तासांचा आहे. जो काही सेकंदात टाइमलॅपद्वारे टिपला गेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल.
हे देखील वाचा – वाघ आणि लहान मुलाची क्यूट फाईट; निरागसतेचे अनोखे उदाहरण, व्हिडीओ व्हायरल
अप्रतिम व्हिडीओ
A day passing on planet Earth seen from 36,000 kilometers (22,000 miles) by the satellite Himawari-8. (Watch full screen) pic.twitter.com/CU6GU9AuEM
— Wonder of Science (@wonderofscience) August 27, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया एक्सवर @wonderofscience नावाच्या अकाऊंवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे – ‘सॅटेलाइट हिमावरी-8 ने 36,000 किलोमीटर उंचीवरून टिपला आहे ज्यामध्ये पृथ्वी 24 तासांत कशी फिरते आणि दिवस कसा जातो हा क्षण कॅप्चर केला आहे.’ व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. तसेच हजारो लोकांनी लाइक करून शेअर देखील केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना लोकांनी म्हटले की हे खरोखर आश्चर्यकारक आहे.