फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी एतक विचित्र व्हिडीओ पाहायला मिळतात की बघून किळस येते. तर कधी असे व्हिडीओ पाहायला मिळतात की, पाहून आनंद वाटतो. अनेकदा भांडणाचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. आत्तापर्यंत तुम्ही मेट्रोमधील, ट्रेनमधील भांडणे पाहिले असतील. पण तुम्ही कधी वाघ आणि मानवाच्या लहान लहान मुलाची भांडणे पाहिली आहेत का? सध्या असाच एक क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लहान मूल वाघासोबत खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका प्राणीसंग्रहालयातील आहे. जिथे वाघ आणि लहान मुलाची ही अनोखी मैत्री सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा अनोखा आणि मनोरंजक व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. जो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अनेकांनी या व्हिडीओला निरागसतेचे उदाहरण म्हटले आहे.
व्हिडीओत काय?
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुल प्रामीसंग्रहालयात आले आहे. त्या ठिकाणी तो वाघाला काचेतून पाहत असतो. आधी तो काचेला टेकून उभा राहतो. मग तो त्या कोचेवर हात मारू लागतो. वाघ नाराज होऊन दुसरीकडे जात असल्याचे दिसते. पण वाघ पुन्हा त्या लहानग्यापाशी येतो. आणि तो देखील त्या मुलासोबत खेळू लागतो. मुलगा त्याच्या लहान हातांनी वाघाला जवळ घ्यायचा प्रयत्न करत आहे असे वाटते. दोघांमधील या फाईटमध्ये लहान मुलाचा निरागसपणा आणि वाघाचा मवाळपणा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. प्राणी कधीच हिंसक नसतात. ते देखील माणसाप्रमाणे प्रेमळ असतात हे या व्हिडीओतून दिसून येते.
हे देखील वाचा – कुशीत घेतले मगरीला, घडवली स्कुटरची सफर; व्हिडीओ होतोय व्हायरल
क्यूट व्हिडीओ
Battle of the hands.
— Figen (@TheFigen_) September 3, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे आणि हजारो वेळा पाहिला आणि शेअर केला गेला आहे. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. काही लोक याला निरागसतेचे अनोखे उदाहरण मानत आहेत. असे व्हिडिओ मुले आणि प्राणी यांच्यातील भावनिक बंधाचे सौंदर्य अधोरेखित करतात. हा व्हिडीओ देखील तसाच आहे. या व्हिडीओला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बॅटल ऑफ हॅंड्स.