तुमच्या WhatsApp वर आत्ताच सेव्ह करा 'हे' 4 नंबर! तुमच्या अनेक समस्या चुटकीसरशी दूर होतील
WhatsApp ने संपूर्ण जग अगदी जवळ आणलं असून WhatsApp आपल्या सर्वांसाठीच अत्यंत फायदेशीर आहे. WhatsApp च्या मदतीने आपली अनेक कामं अगदी सहज शक्य होतात. WhatsApp मुळे आपण आपल्या कुटूंबासोबत, मित्र मैत्रिणींसोबत चॅटिंग करू शकतो. WhatsApp च्या फायद्यांची यादी कधीही संपणार नाही. आपल्या प्रत्येक कामात WhatsApp आपल्याला मदत करत असते. पण आता आम्ही तुम्हाला WhatsApp चा आणखी एक फायदा सांगणार आहोत. तुम्ही WhatsApp वर असे 4 नंबर सेव्ह करू शकता, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या अनेक समस्यांचे उत्तर मिळणार आहे.
हेदेखील वाचा- WhatsApp युजर्सना मिळाली सुपरपॉवर! आता चॅट्सचा लूक बदलणार, लवकरच येतय नवीन फीचर
WhatsApp वर हे नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. तुमची अनेक कामे घरी बसून पूर्ण होतील. गॅस सिलिंडर बुक करण्यापासून ते फूड डिलीव्हरीपर्यंत तुम्ही व्हॉट्सॲपद्वारे फक्त एका मेसेजद्वारे सर्व काही करू शकता. याशिवाय, परीक्षेची तयारी करण्यासाठी देखील तुम्ही WhatsApp ची मदत घेऊ शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
परिक्षेच्या वेळी आपल्याला अनेक विषयांमध्ये शंका असतात. या शंका दूर करण्यासाठी आपण पुस्तकामध्ये आपल्या प्रश्वाचं उत्तर शोधतो किंवा युट्यूबचा वापर करतो. ह्यामध्ये खूप वेळ वाया जातो. त्यामुळे व्यवस्थित परिक्षेची तयारी देखील करता येत नाही. आता आम्ही तुम्हाला तुमच्या या समस्येवरचा उपाय देणार आहोत. यासाठी तुम्ही तुमच्या WhatsApp वर Doubtnut चा +91 8400400400 नंबर सेव्ह करू शकता. इथे तुम्हाला तुमच्या पुस्तकातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. तुम्हाला उत्तर पाठवण्याबरोबरच, Doubtnut त्याच्याशी संबंधित व्हिडिओ देखील शेअर करते, जे पाहून तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल.
गॅस सिलिंडर संपला की तो बुक करण्यासाठी आपल्याला कॉल करावा लागतो. पण आता तुम्ही WhatsApp वर तुमचा गॅस सिलिंडर बुक करू शकता. जर तुम्हाला घरी बसून सिलिंडर बुक करायचा असेल तर तुम्ही इंडियन ऑइलचा नंबर +91 7588888824 तुमच्या फोनमध्ये सेव्ह करू शकता. या नंबरद्वारे तुम्ही फक्त गॅस सिलिंडरच बुक करू शकत नाही तर तुमच्या आवडीनुसार डिलिव्हरीचा दिवस आणि वेळ देखील निवडू शकता. याशिवाय तुम्ही या नंबरच्या मदतीने ऑनलाइन पेमेंट देखील करू शकता.
हेदेखील वाचा- WhatsApp ग्रुपचा ॲडमिनचं लेफ्ट झाला तर काय होईल? कोण होऊ शकतो नवीन ॲडमिन? जाणून घ्या
जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करावा लागत असेल तर तुम्ही Zoop चा WhatsApp नंबर आत्ताच तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवा. Zoop ट्रेनमध्ये अन्न वितरण करण्याची सेवा देते. +91 7042062070 हा Zoop चा WhatsApp नंबर आहे. यावर तुम्हाला फक्त Hi चा मेसेज लिहून पाठवायचा आहे. या नंबरच्या मदतीने तुम्ही ट्रेनमध्ये बसून जेवण ऑर्डर करू शकता. एवढेच नाही तर या नंबरच्या मदतीने तुम्ही तुमचा पीएनआर स्टेटस देखील तपासू शकता. याशिवाय, जर तुम्हाला ट्रेनमध्ये कोणतीही अडचण येत असेल किंवा तुम्हाला कोणी त्रास देत असेल, तर तुम्ही इथून तक्रारही करू शकता.
फ्लाइटशी संबंधित तपशील किंवा त्याच्या तिकिटाशी संबंधित माहितीसाठी, तुम्ही 7065145858 हा क्रमांक सेव्ह करू शकता. याद्वारे तुम्ही फ्लाइट बुकिंग करू शकता आणि फ्लाइट स्टेटस देखील तपासू शकता. तुमच्या फ्लाइटशी संबंधित जवळपास सर्व समस्या दूर करण्यात ते तुम्हाला मदत करू शकते. या सर्व नंबरवर ‘Hi’ लिहून मेसेज पाठवायचा आहे. यानंतर, तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि तुम्हाला त्यांची उत्तरे देत राहावे लागेल. दरम्यान, तुम्ही तुमचा प्रश्न निवडून त्याचे उत्तर मिळवू शकता.