Solar Strom : जर सौर वादळ (Solar Strom) कधी पृथ्वीवर आदळले, तर पृथ्वीवरील लोकांना त्यापासून वाचवण्यासाठी फक्त 30 मिनिटे असतील. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या संशोधकाने (NASA scientist) ही गोष्ट सांगितली आहे. स्पेस एजन्सीची एक टीम लवकर चेतावणी प्रणाली विकसित करण्यासाठी सौर डेटावर AI मॉडेल्स लागू करत आहे. यावरून शास्त्रज्ञ पृथ्वीवर सौर वादळ कधी येऊ शकते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतील.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, वैज्ञानिकांनी अधिक माहिती मिळवण्यासाठी DAGGER नावाच्या डीप लर्निंग मोडचे प्रशिक्षणही सुरू केले आहे. ACE, WING, IMP-8 आणि जिओटेलसह अनेक उपग्रह सौर उत्सर्जनाचे निरीक्षण करत आहेत आणि NASA टीमला डेटा पाठवत आहेत. शास्त्रज्ञ भूतकाळात उपग्रहाद्वारे सापडलेल्या सौर वादळांमुळे प्रभावित झालेल्या पृष्ठभागावर आधारित स्थानकांवरील डेटा देखील गोळा करत आहेत. जेणेकरुन सौर वादळ कधी येणार हेच फक्त कळत नाही तर ते ओळखलेही जाऊ शकते.
डेटा गोळा करणं महत्त्वाचं आहे
नवीन प्रणालीमधून डेटा गोळा करणे देखील खूप महत्वाचे आहे कारण 2020 मध्ये ‘सोलर 25’ नावाचे नवीन सौर चक्र सुरू झाले आहे. ते पुढील 11 वर्षे राहणार असल्याचे मानले जात आहे. यामुळे 2025 मध्ये सूर्यावर जास्तीत जास्त हालचाली दिसून येतील असेही म्हटले जात आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर वेळोवेळी बदलणाऱ्या चुंबकीय क्रियांनाच सौरचक्र म्हणतात. प्रत्येक सौरचक्र 9 ते 14 वर्षांचे असते. यामुळे युटिलिटीज आणि कम्युनिकेशन कंपन्यांना DAGGER ला वॉर्निंग सिस्टीममध्ये इंटिग्रेट करण्यासाठी वेळ मिळेल. जेणेकरून सूर्यावरील बदलत्या हवामानाची माहितीही वेळेवर मिळू शकेल.
सौर वादळ म्हणजे नेमकं काय?
सौर वादळाला भूचुंबकीय वादळ (जिओमॅग्नेटिक स्ट्रॉम) असेही म्हणतात. हे सूर्यापासून निघणारे रेडिएशन आहे, जे संपूर्ण सूर्यमालेवर परिणाम करू शकते. त्याच्या प्रभावापुढे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्रही टिकत नाही. पृथ्वीभोवतीच्या वातावरणातील उर्जेवरही त्याचा परिणाम होतो. सौर वादळ 1989 मध्ये कॅनडातील क्यूबेक शहरात आले होते. या वादळामुळे तब्बल 12 तास वीज नव्हती.
यापूर्वी 1859 मध्येही सौर वादळ आले होते. त्यानंतर अमेरिका आणि युरोपमधील टेलिग्राफ नेटवर्क नष्ट झाले. सौर वादळ हा उर्जेचा एक शक्तिशाली स्फोट आहे जो रेडिओ संप्रेषण, पॉवर ग्रिड आणि नेव्हिगेशन सिग्नलवर परिणाम करू शकतो. त्यामुळे अंतराळात असलेल्या अंतराळवीरांना आणि अंतराळयानालाही धोका निर्माण होऊ शकतो.