मुंबई : अप्रतिम कंटेन्ट निर्मितीच्या अनुभवासाठी उच्च कार्यक्षमता असलेले ३५एमएम फूल फ्रेम इमेज सेन्सर आणि कॅमेऱ्याला जे लावता आणि काढता येऊ शकतील, असे लेन्स असलेला नवीन झेडव्ही-ई१ (ZV-E1) व्लॉग कॅमेरा बाजारात आणण्याचे सोनीने जाहीर केले. सोनीच्या व्लॉग कॅमेऱ्यांच्या श्रेणीमध्ये सर्वात वरच्या स्थानावर असलेल्या या कॅमेऱ्यामध्ये सोनीचे ई माऊंट1 (E-mount), प्रगत तंत्रज्ञान, उच्च श्रेणीची सिनेमॅटिक प्रतिमा, कमी गोंधळ आणि उच्च संवेदनशीलता असे विशेष आहेत. जगातील सर्वात नेटका आणि वजनाने हलका2 असलेला हा कॅमेरा एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यायला अत्यंत उत्तम आहे. तसेच अतिशय सुबक कामकाज व्लॉगर्सना सर्जनशीलता आणि कल्पकतेमध्ये जास्तीतजास्त स्वातंत्र्य आणि वैविध्य देते. (Sony’s new full frame vlog camera for amazing content creation; Sony – ZV-E1, how is the camera)
उत्तम गुणवत्ता, लहान आकार व नावीन्यपूर्ण वैशिष्ठ्ये
सोनी इंडियाच्या डिजिटल इमेजिंग व्यवसायाचे प्रमुख मुकेश श्रीवास्तव या लॉंचबाबत म्हणाले, “खास कंटेन्ट निर्माते आणि व्लॉगर्ससाठी तयार केलेला हा नवीन झेडव्ही-ई१ (ZV-E1) व्लॉग कॅमेरा बाजारात आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या व्लॉग कॅमेऱ्यातील अतिशय उत्तम गुणवत्तेची प्रतिमा, नेटका लहान आकार आणि नावीन्यपूर्ण वैशिष्ठ्ये निर्मात्यांना भारावून टाकणारे व मनमोहक कन्टेन्ट बनविण्यास सक्षम करतात. आम्हाला विश्वास आहे की, ज्या पद्धतीने आज कथा सांगितल्या जातात त्यामध्ये हा नवीन झेडव्ही-ई१ (ZV-E1) व्लॉग कॅमेरा क्रांती घडवेल आणि हा बदल घडविण्यामध्ये आम्ही आघाडीवर असल्याचा आम्हाला अभिमान आहे. असं मुकेश श्रीवास्तव म्हणाले.
कॅमेऱ्याची खास वैशिष्ठ्ये…
1. सोनी इंडियाने विशेष लॉंच सवलत जाहीर केली आहे. या सवलतीनुसार ग्राहकांना रु. १९,१७०/- किमती एवढा लाभ मिळेल. कारण या सवलतीमुळे झेडव्ही-ई१ (ZV-E1)च्या खरेदीवर कॅमेऱ्याबरोबरच; अन्य कोणत्याही अतिरिक्त खर्चाच्या शिवाय; रु.१०,५९०/- रुपये किमतीचे वायरलेस रिमोट कमांडर जीपी- व्हीपीटी२बीटी (GP-VPT2BT) असलेले शूटिंग ग्रिप, रु. ६७९०/- रुपये किमतींचा बॅटरी चार्जर (BC-QZ1) आणि रु. १,७९०/- रुपये किमतींची सॉफ्ट कॅरिंग केस (MII-SC5) यांचादेखील समावेश आहे. ही सवलत मर्यादित काळापर्यंत असून साठा संपेपर्यंत ही वैध राहील.
2. जगातील सर्वात लहान व वजनाने सर्वात हलका असलेला आणि कॅमेऱ्याला लावता आणि काढता येऊ शकतील अश्या फूल फ्रेम लेन्ससह येणारा हा व्लॉग कॅमेरा उत्तम गुणवत्तेची प्रतिमा व जबरदस्त बोकेह इफेक्ट मिळण्यासाठी उच्च दर्जाच्या इमेज प्रोसेसिंग युनिट व फूल फ्रेम बॅक- इल्युमिनेटेड सेन्सरसह तयार केला आहे:
3. व्लॉगचा मूड आणि लुक अजून समृद्ध होण्यासाठी यामध्ये सिनेमॅटिक व्लॉग सेटिंग आहे जे उत्तम आणि अगदी नैसर्गिक लुक सुनिश्चित करते:
4. कल्पक असे एआय प्रोसेसिंग युनिट आणि उत्कृष्ट अशी ओळखणारी ट्रॅकिंग ठेवणारी व वैशिष्ठ्ये
5. सहजपणे निरीक्षण करता यावे आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे उत्तम पद्धतीने हलता यावे यासाठी वॅरी अॅंगल टच एलसीडी स्क्रीन सारखी वापरण्यास सोपी वैशिष्ठ्ये. झेडव्ही-ई१ (ZV-E1) वापरण्यास सोपा असावा या अनुषंगाने तयार केला आहे.
6. अतिशय स्थिर अशी स्मार्टफोन कनेक्टीव्हिटी आणि अगदी नवीन असे क्रिएटर्स क्लाउड हे वैशिष्ठ्य सहज व विनात्रास कनेक्ट होण्याचा आणि कंटेन्ट शेअर करण्याचा अनुभव सुनिश्चित करते
किंमत आणि उपलब्धता
झेडव्ही-ई१ (ZV-E1) व्लॉग कॅमेरा हा संपूर्ण भारतभर ३ ऑगस्ट २०२३ पासून सर्व सोनी केंद्रांवर, अल्फा फ्लॅगशिप स्टोर्समध्ये, ई- कॉमर्स संकेतस्थळांवर (अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट) आणि महत्वाच्या इलेक्ट्रॉनिक दुकांनामध्ये उपलब्ध असेल.
मॉडेल किंमत उपलब्धता
झेडव्ही-ई१एल (ZV-E1L) (बॉडी आणि २८-६० एम एम झूम लेन्स) २४३,९९०/- ३ ऑगस्ट २०२३ पासून झेडव्ही-ई१ (केवळ बॉडी) २१४,९९०/- ३ ऑगस्ट २०२३ पासून