भन्नाट कॅमेरा वैशिष्ट्यासह लवकरच लाँच होणार OnePlus Ace 5 Mini, मिळणार हे खास फीचर्स
लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी OnePlus लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन OnePlus Ace 5 Mini चीनमध्ये लाँच करणार आहेत. हा स्मार्टफोन कधी लाँच होणार याबाबत कंपनीने अधिकृतपणे कोणतेही डीटेल्स शेअर केले नाहीत. मात्र हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो, असं सांगितलं जात आहे. या नवीन स्मार्टफोनचे काही फीचर्स आणि स्पेसिकेशन्स देखील समोर आले आहेत. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन OnePlus Ace 5 आणि Ace 5 Pro सोबत लाँच केला जाऊ शकतो.
OnePlus Ace 5 आणि Ace 5 Pro हे दोन्ही स्मार्टफोन्स डिसेंबरमध्ये लाँच केले जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे OnePlus Ace 5 Mini देखील याच महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. OnePlus Ace 5 आणि Ace 5 Pro हे दोन्ही स्मार्टफोन्स OnePlus Ace 3 आणि OnePlus Ace 3 Pro चे अपग्रेड मानले जात आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने Weibo पोस्टमध्ये OnePlus Ace 5 Mini स्मार्टफोनची प्रमुख वैशिष्ट्ये शेअर केली आहेत. OnePlus Ace 5 Mini स्मार्टफोनमध्ये 1.5K रिझोल्यूशनसह 6.3-इंचाचा कस्टम-मेड डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. तसेच, फोनमध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट दिला जाऊ शकतो.
टिपस्टरनुसार, OnePlus Ace 5 Mini मध्ये हॉरिजॉन्टल रियर कॅमेरा लेआउट असू शकतो. हे Google Pixel स्मार्टफोनच्या कॅमेरा मॉड्यूलसारखे असू शकते. यात कदाचित 50-मेगापिक्सेलचा सोनी IMX906 प्राथमिक सेन्सर असण्याची शक्यता आहे. परंतु त्याला पेरिस्कोप लेन्स मिळणार नाही. टिपस्टरने उघड केले की OnePlus Ace 5 Mini ची चाचणी शॉर्ट-फोकस फिंगरप्रिंट सेन्सरसह केली जात आहे. हँडसेटमध्ये सिंगल-पॉइंट अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर असू शकतो. मात्र कंपनीने अधिकृतपणे अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
OnePlus Ace 5 आणि Ace 5 Pro हे दोन्ही स्मार्टफोन डिसेंबरमध्ये चीनमध्ये लाँच केले जाणार आहेत. हे आगामी फोन OnePlus Ace 3 आणि OnePlus Ace 3 Pro वर अपग्रेड म्हणून लाँच केले जातील. Snapdragon 8 Gen 3 चिपसेट बेस ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. तर, प्रो व्हेरियंटमध्ये क्वालकॉमचा नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर असेल.
बेस व्हर्जन जागतिक बाजारात OnePlus 13R म्हणून लाँच केले जाऊ शकते. चीनच्या 3C वेबसाइटवर प्रो व्हेरिएंट 100W सुपर VOOC वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, OnePlus Ace 5 लाइनअपचे ग्लोबल लाँच जानेवारी 2025 मध्ये केले जाईल.
OnePlus Ace 5 मालिका हँडसेटमध्ये BOE चा X2 8T LTPO डिस्प्ले 1.5K रिझोल्यूशनसह असण्याची अपेक्षा आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 6.78-इंचाची स्क्रीन असू शकते. फोन अलर्ट स्लाइडरने सुसज्ज असतील. OnePlus Ace 5 मध्ये 6,300mAh बॅटरी मिळू शकते. त्याच वेळी, प्रो व्हेरिएंट 6,500mAh बॅटरीसह येऊ शकतो. फोटोग्राफीसाठी, हँडसेटमध्ये 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा असण्याची शक्यता आहे.