POCO चे हे दोन स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच! प्रिमियम डिझाईनसह मिळणार हटके फीचर्स
स्मार्टफोन कंपनी POCO लवकरच दोन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. या स्मार्टफोनच्या लाँचिंगबद्दल कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे. तसेच कंपनीच्या एक्स अकाऊंटवर देखील फोनच्या लाँचिंगचे टिझर पोस्ट करण्यात आले आहेत. पोकोचा हा स्मार्टफोन ओपो आणि विवोला टक्कर देणार असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनबद्दल युजर्सना प्रचंड उत्सुकता आहे.
Google Map Update: गुगल मॅप ठरतोय अपघाताचं कारण? सुरक्षित प्रवासासाठी लक्षात ठेवा या टीप्स
POCO आता भारतात POCO M7 Pro 5G आणि POCO C75 5G हे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. येत्या काही दिवसांत म्हणजेच 17 डिसेंबर रोजी हे दोन्ही स्मार्टफोन भारतात लाँच केले जाणार आहेत. याबाबत कंपनीने एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या मायक्रो साइट्स फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर लाइव्ह झाल्या आहेत. स्मार्टफोन प्रिमियम डिझाईन आणि हटके फीचर्ससह लाँच केले जाणार आहेत. (फोटो सौजन्य – X)
Poco M7 Pro 5G स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा GOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचे रिझोल्यूशन FHD+ असेल आणि रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. कंपनीने असा दावाही केला आहे की हा स्मार्टफोनमध्ये कंपनीच्या बजेट प्राइस सेगमेंटमधील सर्वात ब्राइट डिस्प्ले आहे, ज्याची कमाल 2100 nits ब्राइटनेस आहे. हे HDR10+ ला सपोर्ट करते ज्याचा कॉन्ट्रास्ट रेशियो 5,000,000:1 आहे.
Tech Tips: पॅन कार्डसाठी ऑनलाईन अप्लाय करताना घ्या ही काळजी; नाहीतर होईल लाखोंची फसवणूक
कंपनाीने सांगितलं आहे की या आगामी फोनचा डिस्प्ले TUV ट्रिपल सर्टिफिकेशनसह येतो, ज्यामध्ये SGS Eye Care डिस्प्ले आहे. पोकोच्या या फोनमध्ये स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूल असू शकतो, ज्यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यासोबतच, आगामी फोनमध्ये AMOLED डिस्प्ले असू शकतो जो अल्ट्रा-नॅरो स्क्रीन टू बॉडी रेशिओ सपोर्टसह येतो. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असेल, जो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह येतो. या पोको फोनच्या तळाशी सिम ट्रे, यूएसबी टाइप सी पोर्ट, मायक्रोफोन आणि स्पीकर ग्रिल देण्यात आले आहेत.
POCO C75 5G स्मार्टफोनमध्ये Sony चा कॅमेरा सेंसर दिला दिला जाऊ शकतो. यासोबतच हा फोन Qualcomm च्या Snapdragon 4s Gen 2 चिपसेट सह लाँच केला जाऊ शकतो. Poco चा हा फोन NSA (नॉन-स्टँडअलोन) 5G आर्किटेक्चरला सपोर्ट करणार नाही. म्हणजेच, या फोनवर 5G नेटवर्क वापरण्यासाठी वापरकर्त्यांना Jio सिम खरेदी करावे लागेल. Jio 5G साठी A (स्टँडअलोन) आर्किटेक्चर वापरते.
Poco चा आगामी फोन C75 5G स्मार्टफोन 4GB पर्यंत RAM सह ऑफर केला जाऊ शकतो. यासोबतच हा फोन 4GB पर्यंत टर्बो रॅमलाही सपोर्ट करेल. यासोबतच मायक्रो एसडी कार्डद्वारे फोनमधील स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनमध्ये टेक्सचर पॅटर्न डिझाइन आणि गोलाकार कॅमेरा मॉड्यूल असेल. फ्लिपकार्टचा टीझर सूचित करतो की M7 Pro 5G आणि C75 5G स्मार्टफोन 16,000 रुपये आणि 9,000 रुपये सेगमेंटमध्ये लाँच केले जातील.