Tech Tips: पॅन कार्डसाठी ऑनलाईन अप्लाय करताना घ्या ही काळजी; नाहीतर होईल लाखोंची फसवणूक
भारतीयांसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. आपल्या सरकारी आणि महत्त्वाच्या कामांसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे महत्त्वाचे पुरावे मानले जातात. हे डॉक्युमेंट तयार करण्यासाठी किंवा ते अपडेट करण्यासाठी अनेकदा ऑनलाईन अप्लाय केलं जातं. कोणत्याही डॉक्युमेंटसाठी ऑनलाईन अप्लाय करताना योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा आपली लाखोंची फसवणूक होऊ शकते. अशीच एक घटना देखील अलीकडे समोर आली आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
डिजिटल युगात, घोटाळे आणि स्कॅमच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. लोकांना लुटण्यासाठी घोटाळेबाज रोज नवनवीन पद्धती अवलंबत आहेत. अलीकडेच, कानपूरमध्ये असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका व्यक्तीने आपल्या नातवाच्या पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ही सर्व प्रोसेस करत असताना काही क्षणातच त्याच्या खात्यातून 7.7 लाख रुपये कापले गेले. (फोटो सौजन्य – Pinterest)
वास्तविक, हा घोटाळा तेव्हा घडला जेव्हा ती व्यक्ती आपल्या नातवाच्या पॅन कार्डसाठी ऑनलाइन अप्लाय करण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी त्याला वेबसाईटवर एक कस्टमर केअर हेल्पलाइन नंबर मिळाला. संबंधित व्यक्तिने तो डायल केला. यानंतर फोनवरील व्यक्तिने आधारकार्ड, पॅनकार्ड आणि बँकिंग डिटेल्स मागितले. यानंतर काही वेळातच कानपूरमधील व्यक्तिच्या अकाऊंटमधून 7 लाखांहून अधिक रक्कम कापण्यात आली.
स्कॅमर्सनी पिडीत व्यक्तिकडून संपूर्ण माहिती गोळा केली आणि त्याच्या बँक अकाऊंटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर संबंधित व्यक्तिच्या अकाऊंटमधून 1,40,071 आणि 6,30,071 रुपयांचे नुकसान झाले. म्हणजेच या व्यक्तीचे एकूण 7.7 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीने सायबर सेलकडे तक्रार केली. या सर्व घटनांचा विचार करता तुम्ही पॅन कार्ड तयार करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्याचा विचार करत असाल, तर अशावेळी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा