Google Map Update: गुगल मॅप ठरतोय अपघाताचं कारण? सुरक्षित प्रवासासाठी लक्षात ठेवा या टीप्स
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बदाऊन येथे एक अपघात झाला होता. नदीत गाडी पडून तिघांचा मृत्यू झाला होता. हा अपघात गुगल मॅपने दाखवलेल्या चुकीच्या रस्त्यामुळे झाल्याचा दावा अनेकांकडून केला जात आहे. या अपघाताची चौकशी सुरु असतानाच दोन दिवसांपूर्वी पुन्हा एक अपघात झाला. या अपघातात तिघेजण जखमी झाले. हे दोन्ही अपघात गुगल मॅपने दाखवलेल्या चुकीच्या रस्त्यामुळे झाले, असा दावा अनेकांनी केला आहे. याबाबत चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे. मात्र या अपघातात खरच गुगल मॅपची चूक आहे का, असा प्रश्न आता अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
गुगल मॅप्स हे अतिशय उपयुक्त साधन आहे. पण सततच्या होणाऱ्या अपघातांमुळे गुगल मॅपच्या मदतीने प्रवास करावा तरी कसा, अशी शंका अनेकांनी उपस्थित केली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवासावेळी पूर्णपणे गुगल मॅपवर अवलंबून राहणंं चुकीचं आहे. प्रवास करताना जर तुम्ही गुगल मॅपचा वापर करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही प्रवासावेळी योग्य ती खबरदारी घेतली, तर तुम्ही सुरक्षितपणे तुमच्या लोकेशनवर पोहोचू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
अपडेटेड ॲप्स वापरा – तुमच्याकडे गुगल मॅपचे लेटेस्ट वर्जन आहे, याची खात्री करा.
स्ट्रीट व्यूचा वापर करा – जर तुम्ही अज्ञात ठिकाणी जात असाल तर त्या ठिकाणचे फोटो पाहण्यासाठी स्ट्रीट व्यू वापरा. हे तुम्हाला तुमच्या प्रवासातील मार्गाबद्दल चांगली कल्पना देईल.
इंटरनेट कनेक्शन तपासा – तुमच्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन असल्याची खात्री करा. खराब कनेक्शनमुळे तुम्हाला समस्या येऊ शकतात.
जवळपासच्या लोकांना विचारा – गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. तुम्हाला मार्गाबद्दल काही शंका असल्यास, स्थानिकांना विचारण्यास अजिबात संकोच करू नका.
तुमचे लोकेशन चालू ठेवा – गुगल मॅपला तुमचे लोकेशन शोधण्याची अनुमती द्या जेणेकरून ते तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकेल.
ट्रॅफिक अपडेट तपासा – तुम्ही कुठेतरी प्रवास करत असाल तर ट्रॅफिक अपडेट तपासा जेणेकरून तुम्हाला त्रास टाळता येईल.
तुमचा मार्ग सेव्ह करा – तुम्ही नवीन ठिकाणी जात असाल, तर तुमचा मार्ग आधीपासूनच सेव्ह करा जेणेकरून तुम्हाला तो नंतर सहज सापडेल.
गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ऑफलाइन गुगल मॅप डाउनलोड करा – जर तुम्ही अशा भागात जात असाल जिथे इंटरनेट कनेक्शन चांगले नाही, तर तुम्ही त्या भागाचा गुगल मॅप ऑफलाइन डाउनलोड करू शकता.
तुमचा फोन चार्ज ठेवा – तुमच्या फोनमध्ये पुरेशी बॅटरी असल्याची खात्री करा जेणेकरून तुम्ही गुगल मॅप वापरू शकता.
सुरक्षिततेकडे लक्ष द्या – गुगल मॅप वापरताना नेहमी सुरक्षिततेकडे लक्ष द्या. अंधाऱ्या किंवा निर्जन ठिकाणी एकटे जाऊ नका