Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या देशात नाही होणार iPhone 14 सह 3 मॉडेल्सची विक्री, कंपनीने का घेतला निर्णय? जाणून घ्या कारण

ॲपलने काही देशांमध्ये आपल्या 3 आयफोन मॉडेल्सची विक्री थांबवली आहे. या निर्णयामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागणार आहे. या निर्णयाचा अ‍ॅपलला फटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 29, 2024 | 09:00 AM
या देशात नाही होणार iPhone 14 सह 3 मॉडेल्सची विक्री, कंपनीने का घेतला निर्णय? जाणून घ्या कारण

या देशात नाही होणार iPhone 14 सह 3 मॉडेल्सची विक्री, कंपनीने का घेतला निर्णय? जाणून घ्या कारण

Follow Us
Close
Follow Us:

आयफोन युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. आयफोन बनवणारी कंपनी अ‍ॅपलने असा निर्णय घेतला आहे की, काही देशांमध्ये आपल्या आयफोनची विक्री थांबवणार आहेत. यामध्ये iPhone 14 सह 3 मॉडेल्सचा समावेश असणार आहे. 2024 मध्ये संपूर्ण वर्षात अ‍ॅपलच्या आयफोनने जगावर राज्य केलं आहे. लोकांमध्ये आयफोनची क्रेझ प्रचंड वाढली आहे. मग अशा परस्थितीत कंपनीने हा निर्णय का घेतला, असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे.

गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! OnePlus ने लाँच केले नवीन इयरबड्स, एवढ्या तासांचा आहे प्लेबॅक टाईम

ॲपलने युरोपियन युनियनमध्ये येणाऱ्या देशांमध्ये आपल्या 3 आयफोन मॉडेल्सची विक्री थांबवली आहे. कंपनीने युरोपातील बहुतेक देशांमध्ये iPhone 14, iPhone 14 Plus आणि iPhone SE 3 री जनरेशन आपल्या ऑनलाइन स्टोअरमधून काढून टाकली आहे. त्यामुळे युरोपियन युनियनमधील देशांमध्ये हे तीन मॉडेल्स आता ऑफलाइन स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार नाहीत. युरोपियन युनियन (EU) च्या नियमामुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे. या नियमानुसार, लाइटनिंग कनेक्टरसह उपकरणे विकण्यास बंदी आहे.   (फोटो सौजन्य – pinterest)

नवीन EU नियम काय आहे?

2022 मध्ये, EU ने निर्णय घेतला होता की त्याच्या सर्व 27 देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या फोन आणि इतर काही गॅझेट्सना USB-C पोर्ट असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक कचरा कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आयफोनने त्याच्या तीन मॉडेल्सची विक्री या देशांमध्ये थांबवली आहे. कारण iPhone 14, iPhone 14 Plus आणि iPhone SE 3rd जनरेशनमध्ये चार्जिंगसाठी USB-C पोर्ट नाही.

Apple गेल्या आठवड्यापासून स्टॉक काढून टाकत आहे

Apple गेल्या आठवड्यापासून या देशांमधील आपला जुना स्टॉक काढण्यात व्यस्त आहे. आतापर्यंत त्याने ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, इटली, नेदरलँड्स, स्वीडन आणि इतर अनेक देशांमधील स्टोअरमधून ही डिव्हाईस काढून टाकली आहेत. स्वित्झर्लंडमध्ये या तीन आयफोनची विक्रीही थांबली आहे. स्वित्झर्लंड हा युरोपचा भाग नसला तरी त्याचे अनेक कायदे EU सारखेच आहेत.

त्याचप्रमाणे, हे फोन यापुढे उत्तर आयर्लंडमध्ये देखील खरेदी करता येणार नाहीत. या निर्णयाचा अ‍ॅपलला फटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे. कारण अनेक देशांमध्ये आयफोनच्या विक्रीवर बंदी आल्याने कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागणार आहे.

Apple iPhone SE ला USB-C पोर्टसह करणार

गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरु आहे की, Apple पुढील वर्षी मार्चमध्ये USB-C पोर्टसह सुसज्ज iPhone SE 4th जनरेशन लाँच करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हा आयफोन लवकरच युरोपमध्ये पुनरागमन करू शकतो आणि लोकांना त्यासाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही. मात्र कंपनीने याबाबत अद्याप अधिकृतपणे घोषणा केलेली नाही.

OnePlus Smartphone: OnePlus चे दोन ढासू स्मार्टफोन लाँच, 16GB रॅम आणि 1TB स्टोरेजने सुसज्ज! मिळणार हे खास फीचर्स

भारतात ॲपलच्या व्यवसायात झपाट्याने वाढ

2024 मध्ये Apple ने भारतात खूप प्रगती केली आहे. ॲपलचा व्यवसाय झपाट्याने वाढला असून अनेक विक्रमही केले आहेत. गेल्या महिन्यात ॲपलची भारतातील उलाढाल 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली होती, हा 50 वर्षांचा विक्रम आहे. ॲपलच्या नवीनतम आयफोन 16 सिरीजने लोकांमध्ये लोकप्रियता मिळवली. कंपनीने भारतात एक वेगळी उपकंपनी तयार केली आहे. ते भारतात ॲपलच्या नवीन उत्पादनांवर संशोधन आणि विकास करेल. 2023 मध्ये Apple ने भारतात त्यांचे पहिले दोन Apple Store उघडले. यासह ॲपल आता भारतात आणखी चार नवीन स्टोअर उघडण्याच्या तयारीत आहे. ॲपलच्या उत्पादनांची असेंब्ली लाइन भारतात सुरू झाली आहे.

Web Title: Tech news apple iphone 14 and other two models will not sell in european union

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 09:00 AM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
1

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
2

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
3

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…

करोडपती होण्याची सुवर्णसंधी! iPhone हॅक करा आणि मिळणार करोडो रुपये! Apple घेऊन आलाय आतापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस
4

करोडपती होण्याची सुवर्णसंधी! iPhone हॅक करा आणि मिळणार करोडो रुपये! Apple घेऊन आलाय आतापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.